नांदेड प्रतिनिधी :
जुन्या नांदेड शहरातील चौफाळा भागांमध्ये गुरु-ता-गद्दी च्या काळात चौफाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दुरूस्ती करण्यात आले होते त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ओठ्याची बसवलेले फरशी गळून पडत असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची व परिसराची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी व छत्रपती शिवाजी महाराज परिसरात बंद अवस्थेत असलेल्या लाईट तात्काळ दुरुस्त करण्यात यावे .
त्या ठिकाणी नव्याने बसविण्यात यावेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भवत्ती गार्डन असून त्या गार्डनची रोज साफसफाई व पुतळ्याची साफसफाई करण्यासाठी त्याठिकाणी मनपाच्या वतीने तात्काळ कामगार नियुक्त करण्यात यावा जुन्या नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अत्यंत जुना असून त्या ठिकाणी पुतळ्या भवती लावलेल्या मोठमोठ्या फरश्या अनेक ठिकाणाहून गळून पडत आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ओट्याला अनेक ठिकाणी मोठमोठे तडे गेले आहेत,
त्यामुळे ओटाच्या अनेक मोठमोठ्या फरश्या गळून पडताहेत त्यामुळे तात्काळ जुन्या नांदेड शहरातील असलेल्या चौफाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची तात्काळ दुरुस्ती करून पुतळा परिसराचे रंगरंगोटी व गार्डनमध्ये हराळी व एलईडी लाईट लावण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मनपाचे आयुक्त यांना शिवराजे युवा संघटनेचे जिल्हाप्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी त्याच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.