जन्मदिवस म्हणजे खुडदिवस

भारतीय परंपरेत औक्षण करण्याची पध्दत अनादी काळापासून अस्तित्वात आहे.औक्षण करतांना पंचारतीने ओवाळून सुवासिनी महिला करतात.आपला जन्मदिवस साजरा करतांना पंचारतीच्या ताटात कुमकुम,अक्षता,प्रज्वलित दो पणती घेवून औक्षण करतांना दीप न विझवता करतात.पण गोर्यां इंग्रजाच्या विदेशी परंपरेत वाढदिवस साजरा करतांना प्रज्वलित कॅडल(मेनबत्ती) तोंडाच्या फुंकराने विजवून औक्षणाची पध्दत आपल्या संस्कृतिच्या विरुध्दच वाटते.

….त्या सोबत केक म्हणजे,ख्रिसमस म्हणजे नाताळ येशूख्रितजी यांचा Happy Birthday साजरा करत असतात.त्या दिनाच्या औचित्याने ख्रिश्चन बांधव अगदी नोव्हेंबर पासूनच या Birthdayच्या तयारीत असतात.  ख्रिसमस वृक्षांवर विद्युत रोषणाई केली जाते.सर्व जगभर वाढदिवस साजरा केला जातो.पर्यांयाने इंग्रजांची इंग्लिश Birthdayची संस्कृती जगभर पसरली आहे.भातातत देखील Birthday चे फॅड वाढत चालले आहे.पण आपल्या भारत देशात तर हयात नसलेल्या व्यक्तींचा जन्मदिवस हा जयंतीदिन म्हणुन साजरा करतात.पण इंग्रजांच्या विदेशी संस्कृतित प्रेषित गाॅड येशूख्रिस्तजींचा Birthday केक कापून पेटती कॅडल तोंडाच्या फुंकराने विझवून टाळ्यांच्या गजरात सांताक्लाॅजच्या हस्ते चाॅकलेट(खाऊ) वाटप करुन साजरा केला जातो.

आपल्याकडे वाढदिवसाचे पेव इंग्रजांच्या गुलामगिरी पासून आपल्या भारतात रूढ झाले आहे.कारण भारतीय संस्कृती प्रमाणे एखाद्याचे औक्षण करत असतांना मेणबत्ती विझवत नाहीत तर त्या पणतीस प्रज्वलित करुन औक्षण केले जाते.ही परंपरा अनादी कालापासून रुढी परंपरे प्रमाणे सुरु आहे.हल्ली मात्र सोशल मिडीयाच्या अतिरेकाने तर या जन्मदिवसास हिडीसपणे आपण साजरा करतोत.जो केक वाढदिवसास कापला जातो तो केक आजकालची तरुणाई ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या तोंडाला फासण्यासाठी करत आहे.जन्मदिवस दर वर्षी येत असल्यामुळे आपल्या आयुष्यातला एक दिवस कमी होत असतो.

पण वयाची संख्या जरी वाढत असली तरी आयुष्य एका वर्षाने कमी होते हे मात्र नक्कीच असते,…… पणतीची ज्योत ती प्रज्वलित ठेवून औक्षण करत असतात. पण वाढदिवसाच्या अतिरेका  तर आपण मेणबत्ती प्रज्वलित ही तोंडाच्या फोन कराने विझवून केक चाकूने कापल्या जातो ही संस्कृती आपली नसून ही गोरी इंग्रजांची संस्कृती आहे. पण हल्लीच्या या युगामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमामुळे वाढदिवसाचे प्रस्त अधिकाधिक वाढत आहे. मला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये येणारा वाढदिवस हा “वाढदिवस” नसून तो “खूडदिवस” म्हणुन आपण साजरा करायला पाहिजे, कारण आपल्या आयुष्यातील एक एक वर्ष हे कमी कमी होत जाते. ही वास्तवीकता मात्र कुठेतरी हरवल्या सारखी वाटते आहे.आपण अर्धा ग्लास भरलेला नेहमी पाहतो,पण अर्धाग्लास रिकामा कधीच पाहत नाही.वाढ दिवसाचे अगदी तसेच आहे.

आपल्या सर्वांचा वाढदिवसाकडे पाहण्या दृष्टीकोण अगदी तसाच आहे.आपल्या जीवनाचे वय मात्र वाढते.पण आयुष्यातील एक-एक वर्ष हा कमी कमी होतोय हे मात्र नक्की आहे.वाढदिवस म्हणजे या एक फॅड निघाले……आज कालचे पुढारी कार्य-कतृत्वाने मोठे न होता बॅनरबाजीने प्रसिध्द होण्याच्या स्पर्धेत टिकून आहेत.पुर्वीच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व धारातिर्थी महापुरुष कार्याने अजरामर आहेत.त्यांनी बॅनरबाजी करुन मोठे झालेले नाहीत.पण हल्ली मात्र बॅनरबाजी मोठे होता येते असेच वाटते.कांही जणांनीतर महिना-महिन्याचा वाढदिवस साजरा करतांना हल्ली आपण पाहतो.एक महिन्याच्या नवजात अर्भका पासून ते वयाचे शतक पार केलेल्या वृध्दां पर्यतचे वाढदिवस पाहतोय!कांही व्यक्तींचे वाढदिवस साजरा करतांना अनेक अनाथांना मदत,गरजुंना वस्तू वाटप,दिव्यांगाना कृत्रिम अवयव वाटप,अशा समाजोपयोगी कार्यक्रमांनी आपला वाढदिवस साजरा करतांना,या सामाजिक बांधीलकीचे भान ठेवतात. ही वाब अभिनंदनिय आहे.

त्यामुळे हल्लीच्या युगामध्ये वाढदिवसाची पध्दत जी कांही चालू झाली आहे.या वाढदिवसाचे जणुकांही वेड लागल्यागत साजरा करत आहेत.राजकारणातील नेते मंडळी व गर्भश्रीमंत मंडळीस हा वाढदिवस म्हणजे आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याचे एक तंत्रच सापडले आहे असेच वाटते.त्यातच या संगणकाच्या डिजीटल युगात तर मोठमोठ्या होर्डिंगने म्हणजे विशालकाय प्रसिध्दी फलका व्दारे आपल्यासह आपल्या अनुयाय्यांची प्रसिध्दीचे माध्यम वाटते आहे.कांही शौकिनानीं तर आपल्या श्वानांच्याही वाढदिवसाचे बॅनर लावून त्यावर कहरच केलेला दिसतोय.जेवढे मोठे बॅनर तेवढी सदिच्छा मोठी अशी भावना सध्या दिसते आहे.

सोशल मिडियावर तर ………दररोज वाढदिवसांच्या सदिच्छांच्या पोस्टचे जणुकांही रतिबच दिसते आहे.यामुळे आजची तरुणाई पार्टी संस्कृतिचे पुजक बनली आहे असेच वाटते.सर्वजण चिमुकल्यांचे दहा-पंधरा वर्षा पर्य॔तचे जन्मदिवस अगदी आवडीने,15-30 वर्षा पर्यंतचे जन्मदिवस पार्टीच्या आवडीने,31-50 वर्षा पासूनचे जन्मदिवस कुटंबाच्या सवडीने,51 वर्षा च्या पुढीलच्या नेत्यांचे जन्मदिवस कार्यकर्त्यांच्या अतीउत्साही वृत्तीने पार पाडले जातात.ज्या कार्यकत्यांचा मोठा स्वार्थ साधता आला.त्यांच्या भलामोठा पुष्प किंवा पर्णहार पाहायला मिळतो.अशी मांडणी जन्मदिनाची करता येईल.

पण आयष्याच्या गणतीतील एक-एक करुन वर्ष कपात होते,अन् आपण मात्र माझा वाढदिवस म्हणुन आनंदी असतो.जर आपल्या आयुष्यातली वर्ष खुडतांना, वय वाढत असल्याचा आनंद घेवून जीवनात मार्गस्थ असतो!

जन्मदिवस साजरा करतांना,

आयुष्यातले वर्ष खुडत असतात!

वाढदिवसाचा केक कापतांना,

पेटती मेनबत्ती फुंकीने विझवतात!

भारतीय संस्कृतित औक्षण करतांना,

पंचारती करुन ओवाळत असतात!

खुडदिवस फक्त वाढदिवस समजुन,

वय वाढीचे जणु स्वागतच करतात!….

सध्याच्या जगी मानव हा शानशौकाच्या अधिन जावून भौतिक सुविधेत मश्गुल आहेत.वाढदिवसाच्या निमित्याने आपण भारतीय संस्कृतिचा विसर पडुन दिडशे वर्ष गुलामगीरीत ठेवणार्यांच्या संस्कृतिचे अंधानुकरण करतांना वाढदिवसाचे शौकीन दिसत आहेत.सध्या चाळीशी पार केलेल्या जवळपास 90% जणांचा वाढदिवस हा खरा नसुन प्राथमिक शाळेतील गुरुजींना प्रवेशासाठी योग्यती तारीख घेतली तीच तारीख ही जन्मतारीख गणल्या गेली.

जवळपास जुन-जुलै आणि दिवाळी सुट्या नंतर नोव्हेबर मासात वाढदिवस जास्तीने येतात ही सत्यता आहे.म्हणुन जीवनाचा वाढदिवस साजरा करतांना आयुष्याचा मात्र आपण खुडदिवस साजरा करत असतो.फक्त आजपर्यंत वाढदिवस अंगवळणी पडला पण खुडदिवसाकडे जाणुनबुजुन दुर्लक्ष झालेले आपण पाहतो.मानवाच्या जगण्याचे वय 100 वर्ष हल्लीच्या संकरीत वाणाच्या अन्नामुळे त्यांची मर्यादा आता 50 शित आली आहे असेच वाटते.वाढदिवसाचा उदो-उदो होतांना अप्रत्यक्षपणे आपण खुडदिवसाकडे कानाडोळा करत आहोत.हे मात्र नक्की…….!

                                  दत्तात्रय एमेकर गुरुजी

                                  क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

                                     9860809931

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *