मौनात शब्द गेले जीवास घोर झाला
सोडून दे सखे तू हा राग अन अबोला
हे बंध रेशमाचे नात्यात बांधलेले
नाते तुझे नि माझे ह्रुदयात कोरलेले
ना बोललो जरी मी, तू ही अबोल आहे
प्रेमातल्या कडीचे नाते सखोल आहे
सांगून होत नाही ठरवून होत नाही
ह्रुदयात स्पंदनांची गर्दी कुठून होई
झाले कितीक झगडे प्रेमात राग रुसवे
तितकेच घट्ट होती नाजूक बंध हळवे
दावा कशास खोटा सारे सुरेल आहे
प्रेमात भांडणाची मज्जाच और आहे
सैलावली मिठी अन स्वप्नास जाग आली
विरहात एक आशा अंधूक भासलेली
■■■
© विजो
विजय जोशी
डोंबिवली (मालवण – सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२
११/११/२०२०
https://www.facebook.com/vijayjoshi20/
Do visit my facebook page.