राजकीय वादात अडकले घनकचऱ्याचे टेंडर अखेर ….सना स्वयं रोजगार म.सहकारी संस्थेला सुटले
कंधार ;प्रतिनिधी
कंधार शहरातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले घनकचऱ्याचे टेंडर राजकीय वादात अडकले असल्याने राजकीय वाद निर्माण झाला होता. या टेंडरमुळे बऱ्याच राजकीय घडामोडी ही झाल्या.एकमेंकाच्या कठ्ठर विरोधात असलेले दोस्त झाले तर रोज एका ताटात जेवणारे कट्टर दुश्मन झाले होते.
त्यामुळे शहरातील घनकचऱ्याचा विषय लवकर मिटेल असे वाटत नव्हते .परंतु या वादावर पडदा पडला आणी अखेर वाद मिटला व घनकचऱ्याचे टेंडर सना स्वयं रोजगार म.सहकारी संस्थेला सुटले असले तरी शहर स्वच्छता बाबत “पहीले पाढे पंच्चावन” अशी गत होणार तर नाही ना ? याकडे या संस्थेला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
मागिल ठेकेदाराची मुदत मार्च २०२० मध्ये संपल्याने नगरपरिषद कंधारच्या वतीने एप्रिल २०२० मध्ये निविदा काढण्यात आले होते. पण तांत्रिक अडचणी मुळे ते निवीदा रद्द करण्यात आली होती,त्या नंतर दुसरी निविदा सप्टेंबर २०२० मध्ये काढण्यात आली पण एका सामाजिक कार्यकर्त्यांकडून सदर काढलेल्या निविदा मधील एका शर्ती अटी विरुद्ध आक्षेप नोंदवला होता तो मान्य करून ते तेही निवीदा रद्द करण्यात आली होती, तिसरी निवीदा आक्टोबर २०२० ला काढण्यात आली होती .
या मध्ये एकुण सहा ठेकेदारांनी निवीदा भरले असल्याने हा टेंडर कोणाला सुटेल याची उत्सुकता वाढली होती.आखेर दि.(९) नोव्हेंबर रोजी सर्वात कमी दराने भरणाऱ्या सना स्वंयरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या.पानभोसी ता.कंधार या ठेकेदाराने सर्वात कमी किमतीचे २३ टक्के कमी दराचे निवीदा भरले असल्याने गेल्या आठ ते नऊ महिन्या पासून अडकलेले कंधार शहरातील घनकचऱ्याचे टेंडर अखेर सुटले असल्याने शहरातील एन सनासुगीच्या काळातील अती महत्वाचे साफसफाईचा प्रश्न मिटल्याने नागरिकांनमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.