नांदेड प्रतिनिधी :
नांदेड आरटीओ मध्ये बनावट पावत्या देऊन गैरव्यवहार करून पैसे कमावणार्या अधिकार्याची तात्काळ चौकशी करण्यात यावी चौकशी अंती त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आरटीओ कार्यालयांमधील शासन नियमाप्रमाणे बदली झालेल्या कर्मचारी व अधिकारी यांना कार्यमुक्त करण्यात यावे बदली झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांची ज्या ठिकाणी बदली झालेली आहे त्या ठिकाणी त्यांना तात्काळ पाठविण्यात यावे आरटीओ विभागाकडून बनावट व खोट्या पावत्या तेही 80 हजाराची बनावट पावती दिली आहे व दिलेल्या पावत्यांची आरटीओ विभागाकडे देखील नोंद नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे त्यामुळे आंधळं दळतं कुत्र पिठ खाते अशी अवस्था आरटीओ विभागाची झालेली आहे.
भाजपाचे दक्षिण विधानसभा अध्यक्ष बालाजी पाटील पुणेगावकर यांनी आरटीओ कार्यालयासमोर आज दि १०.११.२०२० पासून आमरण उपोषण सुरू केले असून त्या आमरण उपोषणाला शिवराज्य युवा संघटना नांदेड जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देऊन मा प्रादेशिक परिवहन अधिकारी साहेब उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड श्री राऊत साहेब यांची प्रत्यक्षात भेट घेऊन आपल्या कार्यालयात चाललेल्या आंधळ्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन त्यांना सक्षम भेटून दिलेले आहे दिलेल्या निवेदनात प्रत्येकी खिडकीला कोडच्याच एजंटांचीच कामे होतात व हीच लोक सायंकाळी हजार रुपयाचा केलेल्या भ्रष्टाचारात राधा तुम्हारा हमारा म्हणत संध्याकाळी हा वाटा’घाटी चा कारभार चालत असतो असे कारभार तात्काळ थांबविण्यात यावे टी आर ऐवजी लायसन्स साठी ट्रायल डबल घेणे बंद करण्यात यावेत हाएवा व छोट्या टिप्पर वरलोड गाड्यांना हप्ते घेऊन चालविणे तात्काळ बंद करण्यात यावे.
स्कूल बसेसना हजार रुपये घेणे बंद करणे ओटीपी च्या नावाखाली ड्रायव्हिंग स्कूल हे जनसामान्यांकडून ५०० ते १००० रुपये वाढ घेऊन त्यांची लूट केले जाते ते बंद करण्यात यावे RME च्या कामाची अडवणूक विलम लावणे तात्काळ थांबविण्यात यावे जी फार्म च्या नावाखाली होत असलेल्या पैशाचा भ्रष्टाचार तात्काळ बंद करण्यात यावा आरटीओ कार्यालयात सात अधिकारी असे आहेत की त्यांची बदली होऊन सुद्धा वर्षापासून नांदेड आरटीओ मध्येच आहेत अशा लोकांची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेच अधिकार्याची बदली झाल्यावर तो अधिकारी नांदेड आरटीओला कार्यरत राहत असतो ही बाब शासनाची फसवणूक करणारी आहे त्यामुळे यात अनेक अवैद्य वाळू वाहतूक म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त लोड वाहतूक करणाऱ्या प्रत्येक गाडीला पाच हजार रुपये घेतले जातात व ऐखादी गाडी पकडल्यास ती गाडी आपल्या यादी क्रमांक मध्ये आहे ती गाडी तात्काळ सोडण्यात यावे असे सांगितल्यानंतर ती गाडी ताबडतोब सोडले जाते असे अनेक प्रकार आरटीओ ऑफिस कडून केले जातात या मागणीसाठी भाजपाचे नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष बालाजी पाटील पुणेगावकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे .
त्या उपोषणास शिवराज्य संघटना नांदेड जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा दिलेला आहे दिलेल्या निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख नांदेड प्रदीप पाटील हुंबाड जिल्हाप्रमुख नांदेड व ओमराजे पाटील शिंदे छावा संघटना उपजिल्हाप्रमुख नांदेड भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाप्रमुख यांच्या स्वाक्षर्या आहेत.