एक रिपब्लिकन : अर्णव गोस्वामी (भाग एक)

अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी तुरुंगात आहेत. उच्च न्यायालयानेही जामीन न दिल्याने दुसऱ्य़ा दिवशीही गोस्वामी यांना अलिबागच्या मराठी शाळेत रहावे लागले. मुंबई पोलिसांनीही महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविलेला असताना आता आणखी अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार समितीची गुरुवारी बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये अर्णब गोस्वामींच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यावर चर्चा करण्यात आली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात अपमानजनक भाषा वापरल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. यासाठी १६ सप्टेंबरला महाराष्ट्र विधानसभेत अर्णब गोस्वामीविरोधात हक्कभंग प्रस्ताव देण्यात आला होता. अशाच प्रकराचा आणखी प्रस्ताव आमदार मनिषा कायंडे यांनी विधान परिषदेतही दिला होता. या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. हक्कभंग प्रस्तावावर समितीने गोस्वामी यांना चारवेळा हजर राहण्याची नोटीस पाठविल्या आहेत. मात्र, ते समितीसमोर हजर झाले नाहीत. शेवटची नोटीस १६ ऑक्टोबरला दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी अर्णबला देण्यात आली होती. त्यांना दुपारी ३ वाजता केवळ १० मिनिटे विधानसभेत हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी महाराष्ट्र सचिवालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये अर्णबला १६ सप्टेंबरपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. 

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधात भारतीय जनता पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर्स लावले आहेत. यावर ‘आणीबाणी 2.0’ असा उल्लेख असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. आणीबाणी 2.0 मध्ये तुमचं स्वागत आहे, असा मजकूर बग्गा यांनी लावलेल्या पोस्टर्सवर आहे.

अर्णब गोस्वामी यांना अंतरिम दिलासा देण्यास मुंबईउच्च न्यायालयाचा नकार दिला आहे. फिर्यादी आज्ञा नाईक, राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना न्यायालयाने नोटीस बजावली. दुसऱ्या दुपारी ३ वाजता अर्णब यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी घेण्यात आली.

 रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर अर्णब गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. तर दुसरीकडे अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामींना पोलीस कोठडी मिळावी म्हणून सेशन कोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे अखेर अर्णब यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

 अर्णव गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी अलिबाग नगरपालिकेच्या प्राथमिक शाळा क्रमांक १ आणि २ मध्ये काढावी लागली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोपींना अलिबाग व इतर जेलमध्ये न नेता त्यांना प्रथम क्वारंटाईन सेंटरप्रमाणे सबजेलमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे अर्णबला क्वारटांईन सेंटर असलेल्या या शाळेमध्ये ठेवण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयाकडून अर्णबच्या जामिनाचा अंतरिम दिलासा मिळाला नसल्याने त्यांना या शाळेतच रात्र काढावी लागली. या शाळेत अन्य गुन्ह्यातील ४२ आरोपी क्वारंटाईन करण्यात आले.

एका तुरुंग अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात १५८ कैदी आणि २८ जेल अधिकाऱ्यांना कोरोना झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यात २३ शहरांत ३० तात्पुरते जेल्स शाळा, घरे, होस्टेल्स आणि कॉलेजेस स्वरूपात तयार करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आर्थर कारागृहात नवीन कैद्याला प्रवेश देण्यात आलेला नाही. 

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेने बुधवार सकाळपासून गोंधळाचे वातावरण निर्माण केले. पाेलिसांशी दीड तास हुज्जत घातल्यानंतर गोस्वामी यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून अलिबागला नेण्यात आले. या वेळी सरकार आणि पोलिसांवर टीका करत वाहनातूनही ‘पूछता है भारत’चा त्यांचा नारा सुरू होता.

सकाळी पाच वाजता मुंबई गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रभारी सचिन वाझे यांच्या नेतृत्वात मुंबई पोलिसांचे पथक आणि रायगड पोलीस गोस्वामी यांच्या वरळी येथील घरी धडकले. सुरुवातीला बराच वेळ पोलिसांना दारातच ताटकळत ठेवण्यात आले. वकिलांशी बोलल्यानंतर गोस्वामी यांनी पथकाला आत येऊ दिले. पुढे पोलिसांनी रीतसर सर्व कागदपत्रे, यापूर्वी दिलेल्या नोटीस त्यांना दाखवून सोबत येण्यास सांगितले. मात्र गोस्वामी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे व्हिडीओ शूटिंग सुरू केले. या वेळी जवळपास दीड तास पाेलिसांशी हुज्जत घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना हात धरून बाहेर नेण्यास सुरुवात करताच, गोस्वामी यांनी तब्येत बरी नसल्याचे सांगितले. त्यातही टीव्हीवर लाइव्ह अपडेट करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत त्यांना घरातून बाहेर काढत पोलीस वाहनात बसविले. वाहनातूनही सरकार आणि पोलिसांवर त्यांचे टीका करणे सुरू होते. आठच्या एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात डायरी नोंद करत त्यांना अलिबागला नेण्यात आले.

बुधवारी अटके दरम्यान पोलिसांना धक्काबुकी, शिविगाळ करत सरकारी कागदपत्रे फाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यासह ५ जणांविरुद्ध एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्ता कायद्याच्या अधिनियम प्रतिबंधक भादवि कलम ३५३, ५०४, ५०६,  ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रायगड पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. यात, गोस्वामी यांची पत्नी आणि मुलासह अन्य दोन व्यक्तीचा समावेश आहे.

अन्वय नाईक कोण होते?

कॉनकॉर्ड डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमूद यांनी २०१८ मध्ये रायगडमध्ये आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येस अर्णब गोस्वामी, फिरोझ शेख आणि नितीश सारडा जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. या तिघांनी आपले ५.४० कोटी रुपये थकवल्याचं अन्वय यांनी सुसाईट नोटमध्ये म्हटलं होतं.

अर्णब गोस्वामी यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीला रामराम केला. मी सहा महिन्यांत माझी नवी वाहिनी सुरू करेन, असं आव्हान गोस्वामींनी टाईम्स नाऊमधून बाहेर पडताना जैन यांना दिलं होतं. एखादी वाहिनी सुरू करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागतो. पण गोस्वामी यांनी ६ महिन्यांत वाहिनी सुरू करता यावी यासाठी अन्वय नाईक यांच्यामागे स्टुडियोचं काम लवकर पूर्ण करण्याचा तगादा लावला. अन्वय यांना ६ महिन्यांत काम पूर्ण न करता आल्यानं अर्णब यांनी त्यांच्याकडे असलेलं काम काढून घेतलं. त्यांना स्टुडिओच्या परिसरात येण्यासही मज्जाव केला. यानंतर गोस्वामींनी स्टुडिओचं काम कोलकात्यातील एका इंटिरियर डिझाईनरकडून पूर्ण करून घेतलं!

२०१८ मध्ये अन्वय आणि त्यांची आई कुमूद यांचे मृतदेह रायगडमधील काविर गावी आढळून आले. अन्वय यांचा मृतदेह घराच्या पहिल्या मजल्यावर लटकलेल्या स्थितीत सापडला. तर कुमूद यांचा मृतदेह तळमजल्यावर आढळला. अन्वय यांच्यावर डोक्यावर मोठं कर्ज होतं आणि त्यांना कंत्राटदारांची देणी देणं कठीण जात होतं, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली.

या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी २०१८ मध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र २०१९ मध्ये पोलिसांनी प्रकरणाची फाईल बंद केली. यानंतर अन्वय यांच्या मुलीनं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर देशमुखांनी प्रकरणाच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले. देशमुख यांनी मे महिन्यात ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली होती.

अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांनी ऑगस्टमध्ये ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत गोस्वामी यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली. ‘अर्णब गोस्वामी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरून आरडाओरड करत आहेत. पण गोस्वामी यांच्यामुळे आत्महत्या केलेल्या माझ्या पती आणि त्यांच्या आईचं काय? आमच्या कुटुंबाला न्याय कधी मिळणार? या प्रकरणात आतापर्यंत कोणतीही कारवाई का झाली नाही?,’ असे प्रश्न अक्षता यांनी विचारले होते.

अर्णब गोस्वामी यांना या प्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर आत्महत्या करणाऱ्या अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता आणि मुलगी आज्ञा यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केला.

अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा म्हणाली, बाबा आणि आजीने मे २०१८ मध्ये आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये तिघांची नावे लिहिली होती. यामध्ये अर्णब गोस्वामी, फिरोज शेख, नितीन सारडा अशा तिघांची नावे आहेत. हा माझ्या वडिलांचा शेवटचा प्रोजेक्ट होता आणि त्यासाठी माझ्या वडिलांनी खूप मेहनत घेतली होती, पैसे खर्च केले होते.अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता यांनी म्हटलं, माझ्या पतीला कामाची जी रक्कम येणार होती ती केवळ अर्णब गोस्वामीमुळे मिळाली नाही. ती रक्कम जर मिळाली असती तर माझे पती आज जिवंत असते. आम्ही एक नागरिक म्हणून पोलिसांवर विश्वास ठेवतो आणि एफआयआर करतो पण ती एफआयआर कचऱ्याच्या डब्यात का जाते?

आम्हाला सतत धमक्या दिल्या जात होत्या
माझ्या वडिलांना सातत्याने धमकी दिली जात होती. तुला पैसे मिळणारच नाहीत आणि जे पैसे मिळाले आहेत ते परत कसे वसूल करतो हे मी पाहिलं अशी धमकी दिली जात असे. इतकच नाही तर तुझ्या मुलीचं करिअर बर्बाद करु असंही धमकावलं जात होतं. २०१७ मध्ये स्टूडिओचं काम पूर्ण केलं होतं. ६ कोटी ४० लाखांचं कंत्राट होतं. त्यातील ८३ कोटी रुपये येणं बाकी होते. ते पैसे येत नव्हते. कामगारांचे पगार द्यायचे होते. इतरही काहींची देणी शिल्लक होती. थकलेले पैसे येणं तसेच धमक्या या सर्वांमुळे बाबा तणावात होते असंही अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा हिने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. पोलिसांनी म्हटलं की, ‘कॉन्कॉर्ड डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड’चे मालक अन्वय नाईक यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले की, गोस्वामी, ‘आयकॅस्टेक्स / स्कीमीडिया’ चे फिरोज शेख आणि ‘स्मार्ट वर्क्स’चे नितीश सारडा यांच्याकडून पैसे येणं बाकी होतं.

अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच आपल्या पतीने आत्महत्या केली. अन्यथा ते आज जिवंत असते असा गंभीर आरोप अन्वय यांच्या पत्नीने केला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत होती. अन्वय यांच्या मुलीने सांगितले, की संबंधित लोकांनी आपल्या पतीचे ८३ लाख रुपये थकवले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी न्याय देणे अपेक्षित होते. आम्हाला राजकारणात पडायचे नाही. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही याआधी सर्वाना विनंती केली, तपास अधिकाऱ्यांनी दबाब आणला. आज झालेली अटक आधीच होणे गरजेचे होते. वडिलांनी अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीन सार्डा या तीन जणांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिले होती. हा वडिलांचा शेवटचा प्रोजेक्ट होता.

इंटीरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद यांना कथितपणे आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रिपब्लिक टीव्हीचे मुख्यसंपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. या हाय-प्रोफाइल प्रकरणासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या नेतृत्वातील राज्याच्या गृह विभागाने अर्णब यांच्या अटकेसाठी कोंकण रेंजचे आयजी संजय मोहिते यांच्या नेतृत्वात ४० सदस्यांची उच्च स्तरीय टीम तयार करण्यात आली होती.

इंटीरियर डिझायनर अन्वय आणि त्यांच्या आईने दोन वर्षांपूर्वी केलेल्या कथित आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास करण्यसाठी केस पुन्हा ओपन करण्याच्या रायगड पोलिसांच्या परवानगीनंतर, ‘ऑपरेशन अर्णब’ची तयारी सुरू झाली. यासाठी मुंबई आणि रायगडहून एकूण ४० पोलीस कर्मचाऱ्यांना एकत्र करण्यात आले होते.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अर्णब यांच्या अटकेची योजना मोहितेंनी तयार केली होती. तर हाय प्रोफाईल एनकाउंटर स्पेशालिस्ट सचिन वाजे यांच्याकडे अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. कॅबिनेटमधील एका वरिष्ठ सदस्याने सांगितले, ‘अर्णब प्रचंड शक्तिशाली पत्रकार आहे. अशात मोहिते यांच्या नेतृत्वातील चमूसाठी हा प्लॅन प्रत्यक्षात आणणे अत्यंत आव्हानात्मक होते. अम्ही अत्यंत सावधगिरीने काम करत होतो. चिथावण्याचे अनेक प्रयत्न केल्यानंतरही चमूतील प्रत्येक सदस्याने सय्यम बाळगला.’

त्यांनी सांगितले, की ‘या प्रकरणाच्या सुरुवातीच्या तपासातच, आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात अर्णबही सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. हे एक सीक्रेट मिशन होते. आमच्या लोकांनी अर्णबच्या इमारतीला अनेक चकरा मारल्या. ही गोष्ट लिक झाली, तर अटकेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अर्णब शहरही सोडू शकतात,’ याची आम्हाला भीती होती.

या ऑपरेशनसाठी अगदी पूर्णपणे तयारी करण्यात आली होती. छोट्यातल्या छोट्या गोष्टींवरही लक्ष्य ठेवण्यात आले होते. दरवाजा कोन वाजवणार? हेही निश्चित करण्यात आले होते. एवढेच नाही, तर अर्णब आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कोण बोलेल, विरोध झाल्यास कशा पद्धतीची अॅक्शन करण्यात येईल, अर्णब यांनी प्रतिकारही केला. वाजे यांनी त्यांना तपासात सहकार्य न करण्यासंदर्भातील कायदेशीर पैलूही समजावले. सर्वकाही आरामात पार पडले.

यासंदर्भात, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस सरकारवर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे. ते म्हणाले, ‘मी जेव्हा विधवा आणि त्यांच्या मुलीची व्यथा ऐकली, तेव्हा मला धक्का बसला. असे महाराष्ट्रात होऊ शकते यावर मला विश्वासच बसला नाही. नाईक कुटुंबीयांना आम्ही न्याय देऊ.’ एवढेच नाही, तर भाजपने कुठलाही पुरावा नसताना सुशांत प्रकरणाचे राजकारण केले. पण, येथे तर स्पष्टपणे सूइसाईड नोट आहे, असेही देशमुख म्हणाले.

सुसाइड नोटनुसार, रिपब्लिक टीव्हीकडून नाइक यांना ८३ लाखांचं देणं होतं, तर , IcastX कडून ४ कोटी आणि Smartworks कडे ५५ लाख बाकी होते. दरम्यान, रिपब्लिक टीव्हीने एक निवेदन जारी करून सर्व आरोपांचे खंडन केले होते. त्यांनी असाही दावा केला होता की, रिपब्लिक टीव्हीकडे ते सर्व चेक डिटेल्स आहे जे नाईक यांना आधीच देण्यात आले होते. त्यामुळे हे आरोप निरर्थक असल्याचं चॅनलनं म्हटलं होतं.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अलिबाग पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. त्यानंतर कलम ३०६ अंतर्गत अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता. आता याच प्रकरणी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केलं आहे. दरम्यान, अलिबागला पोहचताच अर्णब गोस्वामी यांना रितसर अटक झाली.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
१०.११.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *