हॅपी प्रदुषणमुक्त दिपावली

दिपावलीचा आनंददायी सण कोरोनाच्या सावटाखाली पण उत्साहात सुरू झाला आहे. दोन दिवस झाले आहेत. सर्वत्र आनंदी वातावरण आहे. फटाके फुटत आहेत. दिवाळ सणाच्या युगसाक्षीच्या सर्व वाचकांना आॅनलाईन शुभेच्छा!! या काळात सण साजरा करण्याची नियमावली सरकारने घालून दिलेली आहे. तिचे पालन आवश्यक आहे. तरच आपण एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा स्विकारार्ह असतील.

कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा, १८९७ तरतुदीनुसार राज्यात लॉकडाऊन ३० नोव्हेंबरपर्यत वाढविण्यात आला आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्याु संसर्गजन्यक परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा १२ नोव्हेंबर २०२० पासून साजरा करण्यात येणारा दिपावली उत्स‍व साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानेच घेतला असून त्याबाबतचे आदेश राज्यभरातील जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत.

अद्यापही कोरोनाचे रूग्ण मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी कोविड या संसर्गजन्या रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्यात आलेले सर्वर धर्मीय सण/उत्सचव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. या वर्षीचा दिपावली उत्सव कोविड कालावधीत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सववांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंतत साध्या पदधतीने साजरा करावा.

कोवीड संसर्गामुळे बंद करण्यायत आलेली राज्यातील धार्मीक स्थतळे अद्याप खुली करण्यातत आलेली नाहीत. त्यामुळे साजरा केला जाणारा दिपावली उत्स्व घरगुती स्वरूपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्याआत यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्यायचे शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठया प्रमाणात एकत्रित येऊ नये, मास्कलचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.

दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठया प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्याोमुळे वायु व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे, त्यांचा त्रास होऊ शकतो. त्याऐवजी दिव्यांची आरास मोठया प्रमाणावर करून उत्सव साजरा करावा.

या उत्सवादरम्याान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम,कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करण्यात येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाईन केबल नेटवर्क, फेसबुक इत्यायदी माध्यमांद्वारे त्याचे प्रसारण करावे. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे उदा. रक्त्दान, आयोजीत करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्यादवारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मयक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठया प्रमाणावर एकत्रित येऊ नये. याची दक्षता घ्यावी. कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्यात मदत व पुर्नवसन, आरोग्या, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्याव नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती्, संस्था, अथवा समुह, भारतीय दंडसंहिता १८६०, साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ व आपत्तीस व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सद्भावनेने केलेल्याय कृत्यासाठी कोणत्यालही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसंच संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.

नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामुहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधु-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात, असं आवाहन पवार कुटुंबाने केलं आहे.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आपापल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी. कोरोनाला हरवल्यानंतर पुढची दिवाळी मात्र, पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करुया, असं विनंतीवजा आवाहन पवार कुटुंबीयांच्या वतीने राज्यातील जनतेला व हितचिंतकांना करण्यात आले आहे.

शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबीयांच्यावतीने संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले असून बारामती येथे परंपरेनुसार दरवर्षी होणारा सामुहिक दिवाळी उत्सव तसेच पाडव्याचा स्नेहभेटीचा पारंपारिक कार्यक्रम कोरोनामुळे यावर्षी रद्द करावा लागत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

दरवर्षी दिवाळीला पवार कुटुंबीय बारामतीत येऊन बारामतीकरांसह एकत्रितपणे दिवाळी साजरा करतात. पाडव्याला राज्यभरातून लाखो सहकारी, हितचिंतक बारामतीत येऊन पवार कुटुंबीयांना भेटतात. दिवाळीच्या शुभेच्छा देतात. हा कार्यक्रम सर्वांचा आनंद, उत्साह वाढवणारा असल्याचं पाहायला मिळतं. आस्था, आपुलकी, स्नेहपूर्ण वातावरणात होणाऱ्या या कार्यक्रमाची ओढ आपल्या सर्वांनाच असते. परंतु, कोरोना संकटकाळात नागरिकांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी अनेक दशकांची सामुहिक दिवाळीची परंपरा यंदा खंडीत करावी लागत आहे. त्यामुळे इच्छा असूनही यंदा भेटता येणार नाही, याचं दु:ख निश्चितच आहे, अशा भावना पवार कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केल्या आहेत.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करायचे असल्याने, कोरोनाला लवकरात लवकर हरवण्याचा निर्धार असल्याने आपल्याला यावर्षी एकत्र येता, भेटता येणार नाही, हे समजून घेतले पाहिजे. कोरोनाला हरवण्यासाठी आणखी काही काळ संयम आणि नियम पाळावे लागतील. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण सर्वांनी आपापल्या घरी, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सुरक्षितपणे साजरी करुया. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवूया, असे आवाहन करत समस्त पवार कुटुंबीयांनी राज्यातील जनतेला संयुक्त निवेदनाद्वारे दिवाळीच्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यात कोरोनाचे संक्रमण कमी झाले असले तरी खबरदारीचे उपाय राबविले जात आहेत. याआधी गणेशोत्सव, रमजान ईद, नवरात्रोत्सव या सणावेळी जनतेने सरकारचे नियमांना पाठिंबा दिला. तसेच साधेपणाने हे सण साजरे केले. त्या अनुषंगाने आता दिवाळीसाठीही राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. दिवाळी सण साधेपणाने साजरा करताना नागरिकांनी फटाके टाळून दिव्यांची आरास लावण्यावर भर देण्यास सांगितले आहे.

राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्येष्ट नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी स्वतःहूनच फटाक्यांचा कमी वापर करण्यास सांगितले गेले आहे. राज्य सरकारने सहा मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

काल पासुन प्रारंभ झालेल्या दिपावली महोत्सवाची तयारी पुर्ण झाली असून दिपावली महोत्सवाच्या स्वागतासाठी व्यापार पेठ, सज्ज झाले आहे. तथापी कोरोनाचे संकट लक्षात घेता. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार हा दिपावली महोत्सव साजरा करण्याचा संकल्प नागरिकांनी घेतला आहे. दिपावली महोत्सवासाठी आवश्यक असणार्‍या आकाश कंदील फटाके आदी साहित्यांची दुकाने थाटली आहेत. यंदा पावसाने योग्य साथ दिल्याने ही दिवाळी शेतकर्‍यांच्या दृष्टीने समाधानकारक म्हणावे लागेल.

दरवर्षी दुष्काळाशी सामना करणार्‍या शेतकरी व सामान्य नागरिकांना यंदा निसर्गाने उत्तम साथ दिली आहे. परिणामी पावसाने दिलेल्या सहकार्यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे. परंतु कोरोनाचे संकट दुर होण्यास तयार नाही. या संकटाशी सामना करत सामान्य नागरिक आपले जीवन व्यथीत करत आहेत. या दिपावली महोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने त्याची पार्श्‍वभूमी लक्षात घेता. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार साध्या पद्धतीने दिपावली महोत्सव साजरा करण्याचा संकल्प नागरिकांनी केला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनाने शेतकर्‍यांच्या खात्यात मदत जमा करण्याचा निर्णय घोषित केल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण झाला आहे. त्याच बरोबर बाजारात विविध आकर्षक आकाश कंदील, फटाके, रांगोळी अशा विविध वस्तुंची दुकाने थाटली आहे. दिपावली महोत्सवाच्या स्वागतासाठी व्यापार पेठ सज्ज झाली असून कोरोनाचे सावट असले तरी ग्राहकांची गर्दी हळुहळु वाढत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे मात्र अद्यापही काहीसा कायम आहे. यातच राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यास शासनाने बंदी घातली आहे. यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहूनच यंदाच्या वर्षी सर्व सणउत्सव साजरे करावे लागणार आहे. यातच लाखो करोडोंचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील साई दरबार, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने शनिवार दि. १४ नोव्हेंबर २०२० रोजी दिपावली लक्ष्मीपुजन उत्सव साजरा करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे.त्यामुळे शनिवार दिनांक उद्याचा साजरा करण्यात येणारा दिपावली लक्ष्मीपुजन उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे.

तसेच उत्सवाच्या रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात येणार्‍या लक्ष्मीपुजनाचे वेळी पूजेकरीता गांवकरी, साईभक्तांकडून पैसे अथवा नाणी पाकीटे स्विकारण्याकामी मंदिर परीसरात व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.

यावेळी पुढे बोलताना कान्हूराज बगाटे म्‍हणाले की,”यावर्षी जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना विषाणूच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने ताळेबंदी जाहीर करण्‍यात आली होती. दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे शनिवार दिनांक १४ नोव्‍हेंबर रोजी साजरा करण्‍यात येणारा दिपावली लक्ष्‍मीपुजन उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे. तसेच या उत्‍सवाच्‍या रुढी परंपरेनुसार लक्ष्‍मीपुजनाचे वेळी पूजेकरीता गांवकरी व साईभक्‍तांकडून पैसे अथवा नाणी पाकीटे स्विकारली जातात.त्‍याअनुषंगाने गांवकरी व साईभक्‍तांकडून लक्ष्‍मीपुजनाचे वेळी पूजेकरीता पैसे अथवा नाणी पाकीटे स्विकारण्‍याकामी मंदिर परिसरातील गेट नंबर ०४ येथील देणगी कार्यालय व मारुती मंदिराशेजारील साईकॉम्‍पलेक्‍स देणगी कार्यालय या ठिकाणी काऊंटर्सची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. तरी गांवकरी व साईभक्‍तांनी दिनांक १४ नोव्‍हेंबर रोजी सकाळी १०.०० ते सायं.०४.३० यावेळेत लक्ष्‍मीपुजनाकरीता आपली पाकीटे सिलबंद करुन त्‍यावर स्‍वतःचे नाव,पुर्ण पत्‍ता व मोबाईल नंबर टाकुन सदर काऊंटर्सवर जमा करुन टोकन ताब्‍यात घ्‍यावे. ज्‍या साईभक्‍तांनी लक्ष्‍मीपुजनाकरीता आपली पाकीटे जमा केली आहेत अशाच साईभक्‍तांनी स्‍वतः आपली पाकीटे त्‍याच दिवशी दि.१४ नोव्‍हेंबर रोजी सायंकाळी ०७.३० वाजता त्‍याच काऊंटरवर टोकन जमा करुन पाकीटे ताब्‍यात घ्‍यावी.

तसेच सर्व गांवकरी व साईभक्तांनी लक्ष्मीपुजनाकरीता पाकीटे देतांना आणि घेतांना मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतरासंदर्भातील नियमांचे पालन करावे. तसेच संस्थानचे संरक्षण व पाकीटे स्विकारणारे कर्मचार्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

उद्याचे लक्ष्मीपुजनाचे सर्व ठिकाणचे कार्यक्रम अशाच प्रकारे साजरे होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही फटाकेमुक्त आणि प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु काही कडव्या धार्मिक विचारसरणीच्या लोकांनी इस्लामचा द्वेष करत जेव्हा बकरी ईद बकरी शिवाय साजरी होईल तेव्हाच दिपावलीचा सण फटाक्याशिवाय साजरी होईल असा धार्मिक उन्माद दाखविला आहे. सगळे नियम आणि निर्बंध हे हिंदू संस्कृती, चालीरीती सण उत्सवावरच का येतात असा सवालही केला गेला आहे. अनेकवेळा मागणी आणि आंदोलने करुनही मंदिरे उघडली गेली नाहीत, याबाबत भक्त जनतेचा सरकारवर रोष आहे. मात्र, हिंदू असो वा मुस्लिम वा कोणत्याही जाती, धर्माचा वा पंथाचा त्याने जो कुणी असेल तथा समाज असेल अशा सर्वांनीच परिस्थिती ओळखायला हवी. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. लोक ऐकत नाहीत. लघवी करु नये असे जिथे लिहलेले असते तिथे विसर्जन केले जाते. गर्दी करु नये असे आवाहन केले जाते नेमक्या त्याच ठिकाणी गर्दी केली जात आहे. परवानगी नाही दिली तरी जागा दिसेल तिथे फटाका स्टाॅल लागलेले दिसत आहेत. दिपावलीचे फटाके गेले दोन-चार दिवस आधीपासूनच फुटत आहेत. कोरोनाची दुसरी लाट आपल्यावर फुटू नये म्हणजे मिळवली!

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
१३.११.२०२०

🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *