कंधार ; दिगांबर वाघमारे
कंधार तालुक्यातील नंदनवन येथील वड समाज बांधव आपल्या वसाहतीकडे ये जा करणाऱ्या रस्त्यासाठी गेली चाळीस ते पन्नास वर्षापासून वाट पाहत होते.परंतु रस्त्याचा प्रश्र्न आजपर्यंत प्रलंबीत होते. ही अडचण लक्षात घेत नंदनवन येथील भूमिपुत्र योगेश पाटील नंदनवनकर यांनी स्वखर्चातून रस्ता उपलब्ध करून दिल्याने वड समाजबांधवांच्या वतीने योगेश पाटील नंदनवनकर यांचे आभार मानले जात आहे,
कंधार तालुक्यातील नंदनवन या गावात सामान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेला कोणतेही राजकीय पिंड नसतानाही समाजाचे आपण काहीतरी देणे आहोत ही भावना मनात ठेवून योगेश पाटील नंदनवनकर हे कोणत्याही राजकीय पदावर नसतानाही सतत विविध सामाजिक उपकरणे राबवत असतात. त्यात भीम गीताचे कार्यक्रम असो, सामाजिक उपक्रमे, शेतकऱ्यांचे दिन दुबळ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात.
गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून चा नंदनवन ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वड समाज बांधवांच्या वस्तीकडे ये जा करण्यासाठी मुख्य मार्गाला जोडणारा रस्ता नसल्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होते. ही अडचण लक्षात घेत योगेश पाटील नंदनवनकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत येथील नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावत
समाज बांधवाच्या वसाहतीसाठी ५ फूट रुंद व ५० मीटर लांब रस्त्यासाठी लागणारी जागा स्वखर्चातून विकत घेऊन देत सामाजिक काम करण्यासाठी पैशाची गरज नसून मन लागतो हे दाखवून दिले.
त्यांनी केलेल्या या सामाजिक कार्याने येथील वसाहतीतील नागरिकांनी योगेश पाटील नंदनवन कर यांचे आभार मानून सरकार केले यावेळीमानिका पाटील भागानगरे शिवाजी साहेब भागानगरे, दत्ता पवार साहेब,गंगाधर भागानगरे ,पंडित शिंदे ,सुरेश शिरसे ,पंढरी बेलदार, कचरू बेलदार, गणेश बेलदार, बापूजी हुंबाड, ईरबा हुंबाड, तानाजी हुंबाड ,चेअरमन बालु पाटील, दत्ता पाटील जाधव, माधव वाघमारे, शिवानंद वाघमारे ,दिनाजी शिंदे, सुधाकर शिंदे अदी उपस्थित होते.
***video News**
५० वर्षापासुन प्रलंबीत असलेला ओड समाजाच्या रस्त्याचा सोडवला प्रश्न