नांदेड ;प्रतिनिधी
घरातील व्यक्ती आजारी असल्यामुळे दिवाळी साजरी न करू शकणारे रुग्णांचे नातेवाईक तसेच रस्त्यावरील निराधारांना दिवाळीचा फराळ देऊन आणि दिवाळीचे चार दिवस दररोज मिष्टान्न भोजन असलेला लॉयन्सचा डबा वाटप करून लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलने अभिनव पद्धतीने दिवाळी साजरी केली.
रयत रुग्णालय व श्री गुरुजी रुग्णालय येथे गेल्या दोन वर्षापासून
लॉयन्सचा डबा हा उपक्रम सुरू आहे. श्री गुरुजी रुग्णालयात तर आगामी दोन वर्षाची आगाऊ नोंदणी अन्नदात्यांनी केली आहे. कोलकता येथील प्रमोदसिंह यांच्यावतीने रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच रस्त्यावरील निराधारांना दिवाळीचा फराळ धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर अर्णवसिंह राजपूत, नरेंद्र पटवारी, मन्मथ स्वामी, राजेशसिंह ठाकूर यांनी वाटप केला.सणांचा राजा असलेल्या दिवाळीचे चार दिवस दररोज वेगवेगळे मिष्ठान्न लॉयन्सच्या डब्यात देण्यात आले. पहिल्या दिवशी पूर्वा शोभित जैस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच डॉ. व्ही. एम. सहस्त्रबुद्धे यांच्यातर्फे पुरणपोळी देण्यात आली.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम व दिलीप ठाकूर यांच्यातर्फे बेसन चक्की डब्यात देण्यात आली.बुंदीचे लाडू सह जेवण तिसऱ्या दिवशी कै. सुभानजी संभाजी गंगासागरे उमरी यांच्या स्मरणार्थ तसेच मामोडे परिवारातील पूर्वजांच्या स्मरणार्थ नंदलाल गोकुळजी मामोडे यांच्यातर्फे वाटप करण्यात आले.भाऊबीज व पाडव्याचे औचित्य साधून कै. सत्यनारायणजी भारतीया तसेच कै. चंद्रभानलाल जयकिशनलाल अग्रवाल तामसा यांच्या स्मरणार्थ शिरा पुरी व मसाला भात डब्यात देण्यात येणार आहे.
रयत रुग्णालयात तिसऱ्या वर्षासाठी एक जानेवारी पासून नवीन नोंदणी करण्यात येत आहे. लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने मायेची ऊब हा रस्त्यावर कुडकुडत झोपलेल्या निराधारांना ब्लॅंकेट वाटपाचा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला असून दानशूर नागरिकांनी याही उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन लॉयन्स प्रथम उपप्रांतपाल लॉ. दिलीप मोदी,अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल, झोनल चेअरमन लॉ. डॉ. विजय भारतीया व लॉ.योगेश जैस्वाल,सचिव लॉ. ॲड. उमेश मेगदे, कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू,
व प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण लॉ. ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.
(छायाः व्यंकटेश वाकोडीकर)