माझा भारत देश हा विश्वात ओळखल्या जातो,तो कृषीप्रधान म्हणुन.आज पर्यंतच्या भुतकाळात अणित दिवाळ्या पण..ईडा टळली नाही अन् पिडा मुक्तही झाली नाही….तर बळीच्या राज्याचा प्रश्नच नाही.पुर्वी म्हटल्या जायचे.उत्तम शेती, कनिष्ठ व्यापार,दुय्यम नोकरी हे सर्वांच्या ओठावर होते.आता समिकरण बदलले आहे.
उत्तम व्यापार,कनिष्ठ नोकरी,दुय्यम शेती याचा बोलबाला दिसतो आहे.निसर्गाच्या बदललेल्या शेडुलमुळे माझा शेतकरी राजा अडचणीला सामोरे जावे लागत आहे.शेतकर्यांना कायमस्वरुपी कांही तरी उपाय योजना न करता फक्त कर्जमाफीच्या लाॅलीपाॅप देत सध्या शेतकरी जीवमुठीत घेवून जगत आहे.सध्या केंद्राने शेतकर्यांना पिकांचा इंश्युरन्स(विमा) काढुन त्यांच्या बॅक खात्यावर जमा करण्याची सोय सुरु करुन त्यांना अधार देण्याचा उत्तम पर्याय शोधला आहे.
पुर्वी किती शेतकरी बांधवांचे काम बॅन्केत पडत असत हे शोध घेण्याची गरज आहे.पण जनधन खात्याने दलाल संस्कृतीच हद्दपार केली.सरळ प्रत्येकांच्या वैयक्तीक खात्यावर शासनाची मदत सरळ बॅन्केत जमा होत असल्याने पैसा इतरत्र मुरल्या जात नाही.तरी शेतकर्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत.शेतकरी बांधव शेतीमाल पिकवतो खरा…पण त्यांच्या मालाला त्यांच्या अपेक्षे एवढा भाव मिळत नाही.यात राबणार्या बळीराजाला सेवानिवृती पेंन्शन नाही.
त्यांची सेवा वयाच्या पाच वर्षा पासून आरंभ होवून त्यांचे शरीर साथ देई पर्य॔त हा अखंड सेवा चालते.इकडे नोकरीत 20-22 वर्षा पासुन सेवा आरंभ होते ती वयाची 58 वर्ष किंवा सेवेची 38 वर्ष तरीही सेवानिवृती पेंन्शन मिळते.आज ती योजना शासनाने खंडीत केली. सेवानिवृत्तीचे पेंन्शन विषयीचे शासन व कर्मचारी यांच्या चर्चा सुरु आहे.प्रत्येक सत्ताधारी निवडणुकीत शेतकरी राजाला आश्वासनाची वाल्गना करत सत्तेवर येतो खरे,पण सत्ता मिळवताच मात्र काना डोळा करतो.तर विरोधी पक्ष फक्त मीच शेतकर्यांचा कळवळा असलेला पक्ष म्हणुन सत्ताधार्यांना बेंबीच्या देठापासुन विरोध करतो.
विरोधी पक्ष पुढील निवडणुकीत सत्तेवर येताच मागच्या सत्ताधार्यां सारखेच वागतो.परत सत्तेतून पायउतातर झालेला पक्ष मीच शेतकर्यांचा तारणहार म्हणुन घेत पुन्हा सत्तेसाठीच्या संघर्षासाठी पेटुन उठतो.
सध्या व्यापारी वृत्तीचे जग दिसते आहे,माणुसकी पेक्षा अर्थाजन की महत्वाची वाटते!शेतात पिकलेले फळ व पालेभाज्या सहित सर्व शेतीमालाचा भाव केला जातो,पण तोच माल व्यापारात पॅकेट मधुन आल्यास “एकच भाव अन् कितीही खाव!”या उक्ती प्रमाणे अव्वाच्या सव्वा करुन विकतांना पाहतो अन् विकतही घेतो.कोरोना काळ वगळता बरं..!कोरोनाचा देशात लाॅक डाउन असतांना माझा शेतकरी राजा काबाड कष्ट करुन आपल्या घामांच्या धारांनी शेतीची मृदा ओलीचिंब करत होते!सर्व व्यवहार ठप्प अन् माझ्या शेतकरी राजांची अंगमेहनत महासंकटात सुरुच होती.
पुराणाच्या कथानका नुसार उधार दिलाचा बळीराजा आपल्या दानत्वाने सुप्रसिध्द होता,एकदा भगवान विष्णु यांच्या वामन अवतारात बळीराजाची कपटनीतीने परीक्षा घेण्याचे ठरविले.बटु वामनाने बळीराजास त्यांच्या राज्यात तीन पाऊलं ठेवण्यासाठी जागा मागीतली.बळीराजाने कोणताही विचार न करता त्यास त्यांनी होकार दिला.पाहतो तर काय कपटी वामनाने आपले असली रुप परीधाऑ करुन बटु वामनाचे महाकाय रुप धारण करुन एक ळीपाऊलात पृथ्वी व्यापली.दुसरे पाऊलाने ब्रम्हांड व्यापले नंतर बळीराजास म्हणाले सांग आता तिसरे पाऊल ठेवू कुठे!त्यावेळी बळीराजाने सांगीतले माझ्या डोईवर ठेवा.
वामनाने बळीच्या डोईवर पाऊल ठेवताच त्या दानशूर वृत्तीच्या बळीराजाला पाताळी दडविल्यामुळे बळीराजांचे राज्य कपटनीती पाळीत गाढले.त्यांना पासून आपण दीपावलीच्या सणात चौथ्या दिवशी बळीप्रतिपदेच्या दिनी म्हणतो”ईडा-पिडा टळू दे,अन् बळीचं राज येवू दे!”ज्या दिनी राज्य कपटनीतीने पाताळात घातले,पण माझा बळीराजाचे राज्य आता पर्यंत कधीच आलेले दिसत नाही.ही खरी शोकांतिका अनेक दिवसापासून आहे.फक्त दिवाळी सणात ते तोंडाने उच्चारतांना चांगले वाटते.पण…..बळीराजांचे राज्य अनेक दशके,अनेक शतके गेली अन् बळीप्रतिपदा या दिनापुरते उरले आहे.
नांदेड जिल्ह्यात चळवळीच्या कंधार तालूक्यात क्रांतिनगरी बहाद्दरपुरा हे विद्रोही विचारवंत,क्रांतिच्या विचाराचे व्यक्तीमत्व म्हणजे मुक्ताईसुत डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतून बहाद्दरपुरा,शिक्षक काॅलनी लोहा व पालम तालूक्यातील केरवाडी(भोपाळगड)या तिनही ठिकाणी बलीप्रतिपदेच्या दिनी कपटी वामनाचे दहन करुन बळीराजावर पुराणा काळात अन्याय कसा केला याची आठवण समाजाला व्हावी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.पण दरवर्षी फक्त दीपावलीतील बळीप्रतिपदेला म्हटल्या जाते.”ईडा-पिडा टळू दे,अन् बळीचं राज्य येवू दे!” पण बळीराजाचे राज्य कधी येईल ही प्रतितिक्षा अनादी काळापासून सुरु आहे.
शेतकर्यांना कर्जबाजारी जीन जगण्यापेक्षा आत्मनिर्भर माझ्या देशात स्वयंपुर्ण शेतकरीराजा बनण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजनांची नितांत गरज लागते आहे.पण यासाठी पाहिजे ती राजकिय इच्छाशक्ती.मोजीजींच्या काळात बांधावरला शेतकरी बॅन्केच्या आवारात दिसतोय..त्यांच्या पिकाला विमा मिळतो आहे.त्यांच्या मशागतीतून पिकणार्यां सोन्याला हमी मीळढे आवश्यक आहे.पण आमच्या देवात सोने या धातुला तोळा-माशाची किमंत आहे.शेतकरी राछाचे पिक जर पॅकेटमध्ये पॅक केल्यास त्याचा दाम दसपट होतो जर शेतकरी राजा विकण्यास बसतो त्यावेळी भाव ठरवल्या जातो.तोच माल एखाद्या माॅलमध्ये विक्रीसाठी ठेवल्यास ग्राहक मुकाट्याने प्रिंट केलेला भाव ना हुज्जत विकत घेतो.
आपला भारत देश कृषीप्रधान असला तरी माझ्या शेतकरी राजाला सर्वेच्च असा भारतरत्न पुरस्कार आज पर्यंत मिळालेला नसल्यामुळे सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारच्या माध्यमातून मला “कृषिभारतरत्न”पुरस्कार माझ्या शैतकरी राजाला मिळावा या उद्देश्याने ही मागणी गेल्या वर्षी महामहिम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांना केली होती.जगाचा पोशिंदा शेकर्यांना म्हणतो पण…अन्याय त्यांच्यावर का होतो?या पुर्वी अनेक शतकरी बांधवांनी कर्जाच्या बोजा असह्य झाल्यामुळे स्वतःच्या गळ्याला फास लावून स्वतःचे जीवन संपवून आत्महत्या केली.
फक्त दिवाळीत “ईडा-पिडा टळू दे,बळी राज येवू दे!”
हे वाक्य शोभते..वर्षानुवर्ष फक्त ऐकुण समाधान वाटते.पण कायम स्वरुपी शेती व्यवसायात काळानुरुप सुधारणा शासन स्तरावर होवून,कधीच शेतकरी राजाला कर्जावर अन् अवलंबुन राहण्याची गरज पडता कामा नये,तर शेतकरी राजाला आत्मनिर्भर होण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकरी हा वयाच्या सहा ते सात वर्षापासून शेतीच्या कामास सुरुवात करतो.पण त्यांच्या कामातून त्यास सेवानिवृत्ती नाही.शरीर साथ देईल तो पर्यंत शेतीच्या कामात राबत असतो.शासनाने शेतकरी राजासाठी समुपदेशन केंद्रे तालूकास्तरावर निर्माण करुन जमीन कोणती ,कोणते पिक घ्यावे,शेतीत पिक घेतांना त्याचे प्रमाण एकुण शेतजीमीन पैकी सर्व पिके सारखे राहावीत पण आमच्या येथे एक पिक एकाने घेतले तर अनेक जण तेच वाण घेतात म्हणुन उत्पादन वाढले की मागणी कमी होते अन् किंमत ठासाळते,हे आर्थशास्त्रीय नियम आहे.मग शेकर्यांची ओरड होते मालाला किमंत नाही.हे कुठेतरी थांबले पाहीजे.
सर्वांनी कृषिसमुपदेशन केंद्राच्या मार्गदर्शनात रब्बी व खरीप पिकांच्या संदर्भात मार्गदर्शन करुन शेती उत्पादन विक्रमी होवून सर्व पिकांना योग्य तो भाव मिळण्याची शक्यता अधिक राहते.अधुनिक शेती वृषभरांच्या मेहनती शिवाय यंत्राव्दारे होत आहे.ही क्रांतिच म्हणावी लागेल.पण…सध्याच्या युगात मानव कितीही कमविले तरीही असमाधानी दिसतो आहे.शेतकरीच काय प्रत्येक भारतीय टॅक्स भरणारा सुध्दा पैश्यांच्या लोभात जगतो आहे.या कोरोना काळात पैश्यांच्या श्रीमंती पेक्षा आरोग्यदायी जीवनसंपत्ती लाख मोलाची वाटतेआहे.
लेखन
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा