पंडित जवाहरलाल आणि कमला नेहरु यांचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते.१९नोव्हेंबर १९१७ला इंदिरा गांधी यांचा जन्म झाला.इंदिरा गांधीचे बालपण अलाहाबादमधील आनंदभवन येथे गेले. स्वातंत्र्यलढ्याच्या संस्कारातच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या.त्यांचे वडील जवाहरलाल नेहरु हे ब्रिटिश राजवटीत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे व्यक्तिमत्व होते.
वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलहाबादमध्ये मुलांची “वानर सेना”स्थापन केली.वानरसेची सभासद संख्या ६०,०००होती.त्यांच्या या सैनैचे सर्वत्र कौतुक झाले.मोर्चै काढणे,बंदी घातलेल्या गोष्टींची वाहातूक करणे या गोष्टी “वानर सेना”करत असत.इंदिराजींचा स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग होता.चळवळी,मोर्चे,सत्याग्रह,जखमींची सेवा,हे इंदिरांजीच्या जीवनाचे अंग बनले होते.त्याना दीनदुबळ्या लोकांविषयी आपुलकी वाटत होती. इंदिरांच्या लहानपणी त्यांचे वडील राजकीय कारणांमुळे दूर किंवा बहुतेक वेळेस तुरुंगात असत त्या वेळी त्या वडिलांना पत्राव्दारे संपर्क साधत.ती पत्रे खूप प्रसिध्द आहेत,तसे पाहाता इंदिरागांधी यांचे बालपण अस्थिर गेले.
इंदिरा गांधी यांचे मूख्यत:शिक्षण घरीच झाले.पदवी शिक्षणासाठी शांती शांती निकेतनच्या विश्वभारती विद्यापीठात प्रवेश घेतला.रविंद्र नाथ टागोर यांनी इंदिरा यांना “प्रियदर्शनी”हे या नाव बहाल केले.सर्वांकडे दयेनी पाहाणारी असा त्याचा अर्थ होतो.पूढे त्या प्रियदर्शनी या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.१९३६मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरु यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.यावेळी इंदिरायांचे वय केवळ १८वर्ष होते.१९४०च्या कालावधीत इंदिरा गांधी यांना फुफ्फुसाच्या आजाराने ग्रासले होते त्यावेळी त्या स्वित्झर्लंडमध्ये होत्या.
तेव्हा त्यांची ओळख फिरोज गांधी या तरुणाशी झाली.ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला.त्यांच्या विवाहाला जवाहरलाल नेहरु यांचा विरोध होता.भारतीय राष्ट्रीय काॅग्रेस चे फिरोज आणि इंदिरा दोघेही सदस्य होते.१९४२च्या स्वातंत्र्य लढ्यात दोघांनीपण भाग घेतला त्यावेळी दोघांना पण अटक झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इंदिरा गांधी ह्या भारतीय राजनीती मधील प्रमुख व्यक्ती ठरल्या.त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.त्यांना “आयर्न लेडी आॅफ इंडिया”म्हणूनही ओळखले जाते.१९५५मध्ये त्या काॅग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्या झाल्या.फेब्रुवारी १९५९मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या.नेहरु घराण्यातल्या या तिस-या अध्यक्षा.केंद्रिय मंत्रीमंडळात त्या १९६४साली प्रथम रुजू झाल्या.तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रीमंडळात त्या माहिती व नभोवाणी मंत्री होत्या.
याच दरम्यान मद्रास राज्यात हिंदीला”राष्ट्रीय भाषा”घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते.त्यावेळी त्यांनी मद्रासला भेट दिली.सामाजिक कार्यकर्त्याची भेट घेऊन त्यांचा राग शांतकरण्याचा प्रयत्न केला.१९६५मध्ये भारत-पाक युध्दाच्यावेळी त्या श्रीनगर मध्ये सुट्या व्यतीत करत होत्या त्यावेळी पाकीस्थानी सैनिक खूपच जवळ पोहचले आहेत हा संदेश मिळूनही त्यांनी दिल्लीला परत न जाण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्या.त्यांच्या या धाडसी निर्णयामूळे त्या जनसामान्यात खूपच लोकप्रीय ठरल्या.पाकीस्थानचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले.ताश्कंद येथे पाकिस्थानचे “आयूबखान”आणि लालबहादूर शास्त्री यांच्यात “शांतीसमझोता”झाला.पण,त्यानंतर काही तासातच त्यांना हृयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
त्यावेळी काॅग्रेस अध्यक्ष कामराज यांच्या पाठिंब्याने ३५५विरुध्द१६९मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करुन त्या २४जानेवारी १९६६रोजी त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या.इतिहासात या घटनेची नोंद सुवर्णअक्षरांनी केली गेली.इंदिरा गांधीकडे एक कणखर नेतृत्व म्हणून पाहिले जाते.त्यांची काम करण्याची एक विशिष्ट पध्दत होती.त्यांच्या कारकीर्दित त्यांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागला.पण त्या डगमगल्या नाहीत.ज्या प्रमाणे इंदिराजींना देशात सन्मान मिळाला त्याचप्रमाणे तो देशाबाहेरही मिळाला.१९५३साली अमेरिकेने त्यांना “मातृ”पारितोषिक दिले.१९६०साली येल विद्यापीठातर्फे”हालंड मेमोरिअल”हे पारितोषिक दिले.१९६५मध्ये रोममध्ये”इझाबेल डी एस्टे”नावाचे पारीतोषिक त्यांना मिळाले.
तसेच रोमन अकादमीकडून “राजधुरंधर महिला”म्हणून त्यांना सन्मानीत करण्यात आले.सतत भारतावर आक्रमण करणा-या पाकीस्थानच्या पूर्व बंगाल मधील गांजलेल्या प्रजेला स्वतंत्र्य करण्यासाठी लष्करी मदत घेऊन”बांगला देश”व “पाकीस्थान”असे दोन भाग केले,त्यांची असामान्य कामगिरीलक्षात घेऊन राष्ट्रपतींनी त्यांना १९७१मध्ये”भारतरत्न”किताबाने सन्मानित केले.भारतरत्न मिळवणा-या त्या पहिल्या महिला आहेत. फुटीरवादी प्रवृत्तीचा हवाला देत इंदिरा गांधीनी १९७५ते १९७७ दरम्यान आणीबाणी लागू केली होती,त्याच्या निर्णयामूळे त्यांना जनतेची नाराजगी सहन करावी लागली.
भारताला प्रगतीपथाकडे नेण्यासाठी इंदिरागांधीनी भरपूर परिश्रम घेतले.कुशल,कणखर,धाडसी,कर्तबगार व झुंजार नेत्या म्हणून त्यांच्या कामाचा ठसा राजकीय क्षेत्रावर उमटवला होता.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या ख-या आर्थाने महिला सक्षमीकरणाच्या आदर्श होत्या.तसेच त्या आंतरराष्ट्रीय नेत्या होत्या.बलाढ्य राष्ट्राच्या दादागिरीपुढेही त्या कधी झुकल्या नाहीत.क्षमाशीलता,समानता आणि सद्भावना यांना जीवनधर्म मानून राजकर्त्यांनी राजधर्म कसा पाळावा याचा आदर्श त्यांनी घालून दिला.स्त्रिया,दलित,वंचित,गरीब यांना सन्मानाने जगता यावे हा ध्यास त्यांनी घेतला होता,त्यांच्या कार्याचे विस्मरण म्हणजे देशाच्या शौर्याचे व तेजाचे विस्मरण होय.इंदिराजीचे योगदान आणि बलिदान हा देश कधीही विसरु शकणार नाही.गरीबीमुक्त भारत इंदिराजीचे स्वप्न होते.आजही ते स्वप्न साकार झाले नाही.
देशाची अखंडता टिकविण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली परंतू,तत्वांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही.”आॅपरेशन ब्लू स्टार”च्या माध्यमातून इंदिराजींना राजकीय अडचणींचा सामना करावा लागला.त्यातच३१आॅक्टोबर १९८४रोजी त्यांची निर्घृण हत्या झाली”मृत्यू जवळ वावरतो आहे,याची मला पूर्ण जाणीव आहे;पण,रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत मी देशसेवेचे व्रत सोडणार नाही!हे मृत्यूपूर्वी काढलेले उद्गार इंदिरांजीनी खरे करुन दाखविले.
*कणाकणाने ज्योत *जळाली,उजळीत तेजोधन*।
*ज्यास द्याया* शितलतेपन,झिजले हे चंदन।।
अचूक निर्णय घेणा-या,स्पष्टवक्त्या,धैर्यशील वृत्तीच्या,कणखर बाण्याला त्यांच्या जयंती निम्मित कोटी कोटी प्रणाम!
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१