कंधार तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर

आरक्षण सोडतीनंतर काही इच्छुकांचे मनोरे ढासळले तर काहींना दिलासा

कंधार : सय्यद हबीब


गाव पातळीवर अत्यंत महत्त्वाचे आणि तालुकास्तरावर राजकारण करणाऱ्या मंडळीसाठी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली काहीना अपेक्षित असलेले आरक्षण निघाले तर काहींना आरक्षणाने अडचण झाल्याने काहींच्या चेहऱ्यावर हास्य तर काहींचे चेहरे मात्र हिरमुसल्या चे पाहायला मिळाले.

कंधार येथील पंचायत समितीच्या कै.वसंतराव नाईक बचत भवनात तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत १९ नोव्हेंबर रोजी तहसीलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार ताटेवाड, नायब तहसीलदार नैना कुलकर्णी, नायब (प्रशिक्षणार्थी) तहसिलदार राकेश गिड्डे, गटविकास अधिकारी यु.टी. रहटिकर यांच्या उपस्थितीत सहा वर्षीय श्रेया ज्ञानेश्वर राखे या बालीकेच्या हस्ते ईश्र्वर चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आले.

सन २०२० ते २०२५ या पाच वर्षासाठी एकूण ११६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आले अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २३ गावचे आरक्षण निश्चित करण्यात आले त्यातील ११ महिलांसाठी राखीव झाले.

अनुसूचित जमातीच्या तीन जागा आरक्षित करण्यात आले त्यापैकी २ महिलांसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच पद राखीव करण्यात आले नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३१ गावाचे सरपंच पद ईश्वर चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आले असून त्यातील १५ महिलांसाठी राखीव झाले आहे खुल्या प्रवर्गासाठी ५९ गावांचे सरपंच पद सुटले आहे त्यातील २९ गाव महिलांसाठी राखीव असणार आहे.

** सरपंच पदासाठी सुटलेले आरक्षण पुढील प्रमाणे**

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सावरगाव नि,कळका, वरवंट, सावळेश्वर, फुलवळ, चिंचोली, बहादरपुरा, हटक्याळ, मजरे धर्मापुरी, खंडगाव ह, बाचोटी, पेठवडज, तेलुर, बामणी पक, बारूळ, मोहिजा, दैठना , दिग्रस बु, चिखली, हासुळ, पांगरा, घागरदरा, इमामवाडी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी घागरदरा, हटक्याळ, दिग्रस बु., धर्मापुरी, वरवंट, सावळेश्वर, इमामवाडी, तेलूर, चिंचोली प क, मोहिजा, बाचोटी

**अनुसूचित जमातीसाठी मंगलसांगवी, बोळका, शिरुर तर महिला प्रवर्गासाठी मंगलसांगवी आणि शिरूर***

नागरीकांचा मागास प्रवर्ग – ३१, शेल्लाळी, नवघरवाडी, उमरज, गोनार, राहाटी, जंगमवाडी, नवरंगपूरा, भुत्याची वाडी, धानोरा कवठा, तळ्याचीवाडी, राऊतखेडा, भूकमारी, भेंडेवाडी, तळ्याची वाडी, मंगनाळी, पानभोसी, संगमवाडी, गुंटूर, काटकळंबा, शेकापुर, दहिकळंबा, कंधारेवाडी, नंदनवन, चिखलभोसी, बिजेवाडी, हरबळ पक, मरशिवणी, कल्हाळी, वंजारवाडी पैकी १५ महिला प्रवर्गासाठी चिखलभोसी, वंजारवाडी, दहिकळंबा, भूकमारी, शेकापुर, कल्लाळी, शेल्लाळी, खुळ्याचीवाडी, भेंडेवाडी, संगमवाडी, राहाटी, बिजेवाडी, तळ्याचीवाडी, हरबळ प.क., जंगमवाडी

**खुल्या प्रवर्गातील ५९ आलेगाव, उमरगा खो, उस्माननगर, औराळ, कारतळा, कुरूळा, कोटबाजार, कवठा, गंगणबीड, गांधिनगर, गुट्टेवाडी, गुलाबवाडी, गऊळ, घोडज, चौकी धर्मापुरी, चौकी महाकाया, जाकापूर, तेलंगवाडी दाताळा दिग्रस खु. नागलगाव बालवाडी पोखरणी, घुबडवाडी, बाबुळगाव, बोरी खु, बोरी बु, भंडारकुमठ्याची वाडी, भोजूची वाडी, मसलगा, महालिंगी, मादळी, मानसिंग वाडी, मुंढेवाडी, येलूर, रामा नाईक तांडा, लाडका, लालवाडी, वहाद, वाकरड, शिरशी खू, शिराढोण, संगुचिवाडी, सोमठाणा, हनमंत वाडी, हाळदा, हिप्परगा शहा, नंदनशिवनी, गुंडा, मानसपुरी, पानशेवडी, लाट खुर्द, पातळगंगा, गोगदरी, रुई, अंबुलगा, देवी याची वाडी, हाडोळी, शिर्शी बु., पैकी २९ महिला प्रवर्गासाठी
घुबडवाडी, आलेगाव, मानसपुरी, पातळगंगा, बाभुळगाव, मादाळी, महालिंगी, जाकापूर, नागलगाव, उमरगा खो, येलूर, गंगनबीड, गांधीनगर, वहाद, घोडज, हिप्परगा शहा, संगुचिवाडी, कवठा, पोखरणी, गुट्टेवाडी, भोजुचीवाडी, हळदा, लाठ खुर्द, लाडका, गोगदरी, तेलंगवाडी, हनमंत वाडी, दिग्रस खुर्द, दाताळा निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच राजकीय पुढाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे त्यामुळे गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापायला लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *