जवळा जि.प.शाळेत संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन

नांदेड -प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांत भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात यावा असे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या जवळा येथील प्राथमिक शाळेत संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रास्ताविकेचे भित्तीपत्रके वाटप करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., संघर्ष गच्चे, सुजल राऊत, पवन नरवाडे, प्रवीण गोडबोले, सूक्षम ढगे, चंद्रकांत गोडबोले, सोनाली गोडबोले, नेहा थोरात, दीपाली गोडबोले, गीतांजली गोडबोले, प्राची गोडबोले, विद्या गोडबोले, हैदर मामू, शुभांगी गोडबोले, साक्षी गोडबोले, लक्ष्मी राऊत, शीतल पंडित यांची उपस्थिती होती. 

          कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक ढवळे जी. एस., यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाच्या प्रतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शाळेत सुरक्षित वावराचे नियम पाळून जमा झालेल्या मुला मुलींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर गावातील रस्त्यावरुन संविधानाच्या प्रतिची अंशकालीन मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने घोषणा दिल्या ; तसेच या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. समारोप प्रसंगी मुख्याध्यापक ढवळे यांनी संविधान दिन, संविधान निर्मिती, प्रास्ताविकेतील मुद्यांविषयी माहिती दिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुलांना दक्षता घेण्याचे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *