कंधार ता. प्र
कोरोना बाधित रुग्णांची झपाट्याने दिवसान दिवस संख्या वाढत आहे. आगामी काळात मानवाची महामारीचे संकट टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार संघाचे निवडणूक प्रक्रिया थांबून नागरिकांच्या कर्मचारी अधिकारी व त्यांच्या कुटुंबाच्या जिवाशी खेळ सुरू असलेल्या थांबवण्याची मागणी कंधार पंचायत समितीचे सदस्य सत्यनारायण मानसपुरे यांनी निवेदनाद्वारे कंधार तहसीलदार यांच्या मार्फत निवडणूकआयोगा कडे केली आहे.
देशात कोरोना महामारी संकट अजूनही थांबले नाही दिवसंदिवस झपाट्याने रुग्णाची वाढ होत आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे मधल्या काळात कोरोना संसर्ग वाढताना दिसत आहे. मतदारांसाठी वेगवेगळ्या उमेदवाराकडून मेळावा घेऊन संपर्क साधला जात आहे या ठिकाणी शासनाने आणि आरोग्य विभागाने नागरिकासाठी जे काही मार्गदर्शक सूचना आणि निर्देशन दिले आहेत .त्याचे पालन होताना दिसत नाही यामुळे शहरी भागात ग्रामीण भागात संसर्गाचा धोका वाढताना दिसत आहे दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. पुन्हा एक डिसेंबरला राज्यातील मतदार एकत्र बोलून निवडणूक घेत असल्यामुळे पुन्हा महामारी चे संकट आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका निवडणूक आयोगाने रद्द करून होणारे निवडणुकीची तारीख वाढवावी मतदार अधिकारी कर्मचारी नागरिकांच्या आरोग्य बांधा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी
अन्यथा सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र निवडणूक आयोग राहील याची दखल घेऊन निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्याची निवेदनाद्वारे मागणी कंधार पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे, पंचायत समिती सदस्य दिगंबर पाटील वडजे, कंधार पंचायत समिती सभापती प्रतिनिधी पंडित देवकांबळे, सामाजिक कार्यकर्ते माधव पाटील कळकेकर यांनी कंधार तहसीलदार विजय चव्हाण यांना देण्यात आले.