कंधार ; प्रतिनिधी
१२ वर्षापूर्वी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे दहशतवादी हमला होवून अनेक पोलीसांनी आपले प्राण गमावले होते.त्या विरांना आदरांजली म्हणून कंधार येथिल पोलिस स्टेशन येथे हरहुनरी कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांच्या संकल्पनेतून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.संजिव मेहत्रे तर प्रमुख अतिथी कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यु.एम.कस्तुरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव,सदाशिव आंबाटवाड,साहित्यिक प्रा.सु.द.घाटे, साजिद इंस्टीट्युटचे संचालक प्रा.शेख साजीद,माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड,पोचीराम वाघमारे ,आनंद नवघरे,राजहंश शहापुरे,मनोज गाजरे ,मंहमद सिंकदर ,महेश मोरे आदीची यावेळी उपस्थिती होती.
प्रथम संविधान ग्रंथकार विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रास माल्यार्पण करुन,मुंबईवर अतिरेकी हल्ल्यात धारातीर्थी शहीदवीर हेमंत करकरे,अशोक कामटे, विजय साळसकर, संदीप उन्नीकृषणन्,तुकाराम ओंबले यांचे सहित निष्पाप नागरिकांना आदरांजलि अर्पण करुन कंधार पोलिस स्टेशनचे पोलिस इन्स्पेक्टर कस्तूरे साहेब यांचे सहित सर्व पोलिस बांधवानाचा पुष्पहाराने सन्मान करण्यात आला.या वेळेस पीआय कस्तूरे साहेब यांनी आपल्या मनोगतात संविधान दिनाचे महत्त्व सांगुन मुंबईवर अतिरेक्यांच्या भ्याड हल्ला झाला त्यावर प्रकाश टाकत सुंदर अक्षर कार्यशाळा व माजी सैनिक संघटनेचे जिल्हा संघटनेचे स्वागत करुन आभार समारोप करतांना संजीव मेहेत्रे यांनी अतिरेक्याच्या भ्याड हल्ल्याचे वर्णन करुन संविधानाचे महत्त्व विशद केले.मान्यवरांच्या हस्ते पोलीसांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीसांच्या वतीने गणाचार्य यांनी मनोगत व्यक्त केले ,पोलीस सुनिल पत्रे सह ,जाधव ,राठोड ,कठारे ,चव्हाण आदीसह पोलीस बांधव यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड यांनी केले.तर सुत्रसंचलन वाघमारे डी.जी.यांनी मानले.