आम्ही भारताचे लोक’ कवितासंग्रहाचे थाटात प्रकाशन
कळमनुरी – मानवी मनाला विचारांचे खाद्य लागते. कोणत्याही व्यक्तिला वैचारिक भूमिका असली पाहिजे. वाचनाने माणूस बौद्धिक दृष्टीने प्रगल्भ होतो तर चांगल्या विचारांनी माणूस सुसंस्कृत होतो असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांनी तालुक्यातील डोंगरकडा येथील ‘आम्ही भारताचे लोक’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक पंडित तर प्रमुख पाहुणे म्हणून समीक्षक गंगाधर ढवळे, युवा नेते शिवाजीराव अडकिणे, शेतकरी नेते पराग अडकिणे, श्रीगोंदा साईकृपा महाविद्यालयाचे डॉ. प्रा. प्रदीप पंडीत, डोंगरकडा सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी निवृत्ती लोणे, मुख्याध्यापक बंडू सितळे, कवी रणजीत गोणारकर, अक्षरोदय साहित्य मंडळाचे अध्यक्ष सदानंद सपकाळे, ग्रामविकास अधिकारी शैनोद्दीन शेख, बापुराव देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन बोंद्रे यांची उपस्थिती होती.
डोंगरकडा येथील कै. बापुराव देशमुख विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक बाबुराव पाईकराव यांच्या ‘आम्ही भारताचे लोक’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मार्केट यार्ड परिसरात थाटात संपन्न झाला. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेला पुष्पहार अर्पण करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कवितासंग्रहाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने पाईकराव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या वतीने, माजी विद्यार्थी गणेश धाबे, कवी सदानंद सपकाळे, सुमेध चौदंते यांनीही पाईकराव यांचा सपत्नीक हृद्य सत्कार केला. यावेळी प्राचार्य नितिन बोंद्रे, डॉ. प्रदिप पंडित, पराग अडकिणे, समीक्षक गंगाधर ढवळे यांनी कवितासंग्रहावर भाष्य केले. मनोगत व प्रास्ताविक कवी बाबुराव पाईकराव यांनी केले तर सूत्रसंचालन व आभाराची धुरा सहशिक्षक एम. टी. गायकवाड यांनी सांभाळली.
कोव्हिड परिस्थितीनुसार सर्व नियम पाळून प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. दिलीप लोखंडे, अनुरत्न वाघमारे, गंगाधर ढवळे यांनी यांनी प्रकाशनपूर्व पुस्तक परीक्षण केले होते. ते छापून आलेल्या दैनिकांचे विमोचनही सदरील सोहळ्यात करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाऊराव पाईकराव, तुषार पंडीत, मारोती पंडीत, पवन पंडीत, राजू आम्ले, शुभम अटकोरे, संतोष केदारे, शिवशंकर वाघमारे, प्रसाद खांडरे, आकाश गवळी, राजू गवळी, सुबोध पाईकराव, सौरभ पाईकराव, सुयश पाईकराव, सृष्टी पाईकराव, कुणाल ढोले, गंगाधर वाघमारे, दीक्षा गवळी, सुलक्षणा पाईकराव, पूनम पाईकराव, मुकुंदराव नरवाडे, गोविंदराव पाईकराव, अविनाश सोनुले, सिद्धार्थ गायकवाड, बालाजी कांबळे, राहुल सितळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी गावातील लहान बालक बालिका, स्री – पुरुष गावकरी तसेच साहित्यप्रेमींची उपस्थिती होती.