कंधार
सकाळचे तालुका बातमीदार हफीज घडीवाला यांची कंधार येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शालेय समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. शेकापचे वरिष्ठ नेते, जेष्ठ स्वतंत्र सेनानी, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व संचालक, माजी खासदार व आमदार डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या आदेशान्वये ही निवड प्रक्रिया पार पडली.
तालुक्याच्या शैक्षणिक जडणघडणीत शहरातील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची महत्वाची भूमिका आहे. गेल्या ७० वर्षात या विद्यालयाने असंख्य कर्तबगार घडविले. डॉ. धोंडगे यांनी ७० वर्षांपूर्वी लावलेले हे रोपटे आज वटवृक्षाचे रूप धारण केले आहे. नवनवीन उपक्रम राबवून या विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेसर असणाऱ्या या विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीत घडीवाला यांना स्थान देण्यात आले आहे.
या निवडी बद्दल श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे सचिव माजी आमदार गुरुनाथ कुरुडे, अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, शालेय समितीच्या अध्यक्षा प्रा. लीलाताई आंबटवाड, उपाध्यक्ष भगवानराव जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक सदाशिवराव आंबटवाड, तहसीलदार विजय चव्हाण, प्राचार्य डॉ. अशोक गवते, प्राचार्य डॉ. गंगाधर तोगरे, मुख्याध्यापक संभाजी उंद्रटवाड, मंजूर अहमद, हरिहर चिवडे,युगसाक्षी चे संपादक दिगांबर वाघमारे, मराठी पत्रकारसंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अड. दिगंबर गायकवाड, तालुकाध्यक्ष सत्यनारायण मानसपुरे, भाजपचे शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, पत्रकार महोम्मद अन्सारोद्दीन, योगेंद्रसिंह ठाकूर, दयानंद कदम, एन. डी. दाभाडे, बाबुखान पठाण यांनी घडीवाला यांचे अभिनंदन केले आहे.