भक्तीस्थळ, अहमदपूर ; प्रा.भगवान अमलापुरे
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने भक्तीस्थळ, अहमदपूर ते श्री क्षेत्र कपिलधार पालखी आणि पादुका महारथ यात्रा २०२० चे प्रस्थान आज दि २९ नोव्हेंबर २० रोजी सकाळी १०:३० वाजता झाले.
राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर दरवर्षी मौजे चापोली येथून कपिलधार पदयात्रेचे आयोजन करत होते. राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे शिवैक्य दि ०१ सप्टें २० रोजी झाले. राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या माघारी शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनात भक्तीस्थळ ते कपिलधार ( मांजरसुंभा ) ता जिल्हा बीड येथे जाणारी ही पहिलीच पालखी आणि पादुका रथयात्रा होय.
सकाळी ०८ : ३० च्या सुमारास प्रा मनोहर धोंडे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भक्तीस्थळावर आगमन झाले. त्यांनी राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले. दुरवरुन आलेल्या भक्तांच्या उपस्थितीत पालखी आणि पादुका विधीवत रथात ठेवण्यात आल्या.राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय, संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ स्वामी महाराज की जय, हर हर महादेव, माऊली, माऊली, गुरुराज माऊली, च्या जयघोषात, भजन गात, पाऊले खेळत रथयात्रा मुख्य रस्त्यावर आली.
या रथयात्रेत आचार्य गुरुराज महाराज अहमदपूरकर, १०८ सदगुरू सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदेकर, तेलंगणा, सोबत गायक बस्वराज मंडगीकर, प्रा मनोहर धोंडे सर,बालाजी पाटील येरोळकर, शि.भ.प मन्मथ अण्णा डांगे,शि भ प लखादीवे गुरुजी, शि भ प मोहन कावडे गुरुजी हासनाळीकर, शि भ प कैलास महाराज जामकर डोंगरगाव,बदक महाराज,उमाकांत अप्पा शेटे, पुणे, वैजनाथ अण्णा तोनसुरे,धन्यकुमार शिवणकर, परभणी, विठ्ठलराव ताकबीडे, संजय कोठाळे, इंजी अनिल माळगे, शेवडी बाजीराव येथील चेअरमन गणपतराव चपटे,गायक लक्ष्मण अप्पा डोंगरे, म्रदंगाचार्य बस्वराज लाटकर, सुधीर जाकापुरे, वैजनाथ चपटे, उन्नकेश्वर राईकवाडे आणि भजनी मंडळ शेवडी ( बाजीराव ) सहभागी होते.
दरम्यान मौजे मिशन कल्लाळी ,बिचकुंदा मंडळ, तेलंगणा येथून स्कुटीवर आलेले सदभक्त अमोल पाटील ( ८४६४९४२३७२ ) आणि बालाराज दायालावार ( ८३२८६८०६०५ )यांनी पण भक्तीस्थळावर राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन कपिलधारकडे रवाना झाले.
यावेळी शिवम धोंडे, प्रा चंद्रकांत आमलापूरे, राजकुमार पिलोळे, संगमेश्वर चपटे, सोनखेड सरकल प्रमुख, प्रा भगवान आमलापूरे,भक्तीस्थळावरील विनेकरी महादेव गुराप्पा कुठार, अमोल पाटील , बलराज दहेलवार आणि परमेश्वर बुक सेंटरचे मालक आणि सहकारी उपस्थित होते.