शेतकरी आंदोलनावर दडपशाही करणाऱ्या केंद्राच्या सरकारचा जाहीर निषेध – शंकर अण्णा धोंडगे

कंधार ; दिगांबर वाघमारे

केंद्र सरकारच्या कृषी विषयक बिलाच्या विरोधात उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनात सामील झालेल्या शेतकऱ्यावर अमानूष लाठीमार व अश्रुधूर चा वापर करुन मोठी दडपशाहीचे धोरण केंद्र सरकार कडून घेतले या कृतीचा महाराष्ट्रातील शेतकऱ्याकडून मोठया प्रमाणावर धिक्कार व निषेध होत आहे. राष्ट्रवादी किसान सभेच्या वतीने शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी या कृतीचा दि.28 रोजी जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

स्वातंत्र्यानंतर न्याय व हक्कासाठी जेव्हा जेंव्हा शेतकरी रस्त्यावर उतरला बऱ्याचदा सरकारानी सांमज्याची व तडजोडीची भुमिका घेतली. एकाद्या सरकारने जर आडमुठे पणा केला असेल तर भविष्यात त्यांचे राजकीय दृष्टया नुकसान झाले आहे. असा इतिहास
असतांना यावेळी केंद्रातील भा.ज.पा.प्रणीत सरकारने कृषी विषयक बिलाच्या बाबत आम शेतकऱ्यांचे नुकसान करणारी भुमिका समजावून न घेता सविनय व शांततेच्या मार्गाने राजधानी
दिल्लीत सरकारच्या या नितीच्या विरोधात धरणे अंदोलनासाठी जात असणाऱ्या शेतकऱ्यावर पोलीसा करवी दमण शक्तीचा वापर केला यातून या सरकारची शेतकरी विरोधी भावना व निती स्पष्ट होते.

2 ऑक्टोबर 1989 साली दिल्ली बोट क्लब वर किसान जवान पंचायत झाली होती. पण त्यावेळच्या कॉंग्रेस सरकारने तडजोडीची भुमिका घेतली होती. त्या वेळच्या आयोजक आम्ही होतो. सध्या शेतकऱ्यांनी उभा केलेल्या लढयास आमचा पाठींबा असून वेळ
पडल्यास आम्हीही प्रत्यक्ष लढयात उतरु अशी भुमिका शंकर धोंडगे यांनी जाहीर केली आहे.

****** Video News******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *