शॉर्ट सर्किटमुळे कंधार तालुक्यातील वळसंगवाडी येथील शेतकऱ्याचा सव्वाशे टन ऊस जळून खाक ; महावितरणचे लोबणा-या ताराकडे दुर्लक्ष

कंधार ; प्रतिनिधी

कंधार तालुक्यातील शेतकरी बालाजी श्रीहरी जाधव राहणार वळसंगवाडी यांचा ऊसाच्या शेतात सर्किटमुळे दिनांक 5 डिसेंबर रोजी आग लागून अंदाजे साडेतीन लाख रुपये किमतीचा ऊस जळून खाक झाला आहे.

कोरोनामुळे संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामध्ये बोगस बियाणे व अवेळी पावसाने झालेले नुकसान यामुळे तर मेटाकुटीला शेतकरी आला आहे.पाऊस भरपुर झाल्याने शेतकऱ्यांनी ऊसाचे क्षेत्रफळ वाढवले आहे.

बागायत पिकावर आता मदार असताना कंधार तालुक्यातील वळसंगवाडी येथील शेतकरी बालाजी श्रीहरी जाधव यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत वितरणाच्या तारामुळे शॉर्टसर्किट झाल्याने बालाजी श्रीहरी जाधव यांच्या शेतातील अंदाजे तीन एकरांतील ऊस अंदाजे जवळपास सव्वाशे टन ऊस जळून खाक झाला असून यामध्ये सुमारे साडेतीन लाखाचे नुकसान झाले आहे .

घटनेची खबर तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना देण्यात आली त्यावरून तलाठी व पंचानी प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. पंचनाम्याच्या अहवालावरून शेतकरी बालाजी जाधव यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *