आज सप्तरंगी साहित्य मंडळ राज्य कार्यकारिणीच्या वतीने स्वच्छतेचे पुजारी, लोकशिक्षक, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त विष्णूपुरी येथील कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व महाविद्यालयासमोरील परिसर स्वच्छता करून गाडगेबाबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे राज्याध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, महासचिव कवी, नाटककार पांडूरंग कोकुलवार, सहसचिव शीघ्र कवी निवेदक कैलास धुतराज, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, राज्य संघटक तथा स्तंभलेखिका रुपाली वागरे वैद्य, स्वराली वैद्य, हेमंत वागरे, जिल्हा पदाधिकारी रणजीत गोणारकर यांच्यासह अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, रुग्णालयातील मॅस्को सुपरवाईझर सुभेदार परघणे, सुरक्षारक्षक वसंत राठोड, एस. बी खाडे, एच. एल. बनसोडे, रेखा गच्चे, यशोदा नवघरे, बी. टी. भोरगे, बी. व्ही. सोनवळे, ए. व्ही. कानोडे, आरोग्य सहाय्यक बालाजी हंबर्डे आदींची उपस्थिती होती.
नांदेडच्या सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्रच्या वतीने विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयासमोर ‘नो प्लास्टिक’ अभियान राबविण्यात आले.संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला साहित्य मंडळाच्या कार्यालयात अभिवादन करुन अभियानास प्रारंभ करण्यात आला. रुग्णालयाचे प्रवेशद्वार आणि परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात अजैविक कचरा जमा होतो. काचेच्या बाटल्या, विविध खाद्यपदार्थांच्या वस्तूचे वेष्टन, रॅपर्स, रिकाम्या पाणी बाॅटल्स, प्लाॅस्टिकचे ग्लास, पाणी पाऊच, कॅरीबॅग, हँडग्लोव्हज, मास्क, वापरलेले कन्डोम्स, इतर प्लास्टिक वेस्टेजेस अशाप्रकारच्या कचऱ्याला एकत्रित करून नष्ट करण्यात आले. मंडळाच्या महिला संघटनक तथा या अभियानाच्या समन्वयिका रुपाली वागरे वैद्य यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात आले. आज संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून साहित्य मंडळाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या ‘नो प्लास्टिक अभियानात सहभाग नोंदवला.
दरम्यान, सप्तरंगी साहित्य मंडळाचे ‘नो प्लास्टिक’ अभियान राबविण्यात येत असतांनाच उपक्रमस्थळी कै. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी भेट दिली. मंडळाच्या कार्याचे कौतुक करुन आभार मानले. साहित्यिकांनी केवळ घरातच बसून शब्दांचा खेळ न करता प्रत्यक्षात शब्दांना कृतीची जोड देण्याचे त्यांचे कार्य स्पृहणीय आहे असे ते म्हणाले. भविष्यात मोठ्या प्रमाणावर अनेक अभियान राबविण्यात येणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.
या अभियानाच्या समन्वयिका रुपाली वागरे वैद्य यांनी आजच्या उपक्रमाची प्रेरणा एका आजीबाईंकडून घेतली असल्याचे सांगितले. त्या म्हणतात, ‘एके दिवशी रुग्णालयाच्या परिसरात एक आजीबाई कचऱ्याच्याच ठिकाणी जेवण करीत बसली होती. याचे कारण विचारले असता त्यांनी हा कचरा कुणी केला, तुम्हीच ना? असा प्रतिप्रश्न केला. यावरून मी विचारात पडले. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या आॅनलाईन बैठकीत हा विषय ठेवला. या उपक्रमासाठी सर्वांनी मान्यता दिली. आज संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा छोटासा भाग होऊन काही करता आलं, याचे समाधान आहे. एकाच दिवशी हे राबवून थांबता येणार नाही. यात सातत्य ठेवले जाईल.’
अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान औचित्याचा मुद्दा ठरतो. लोक ऐकत नाहीत. घाण करीत राहतात. कचरा जमा होतच राहतो. स्वच्छतेच्या महत्त्वाचे महत्व कितीही कंठशोष केला तरीही लोकांत याबाबत बदल घडून येणे कठीणच असते. महत्व पटणे कठीणच! कोरोनासारखा नव्हे तर त्यापेक्षा अधिक भयंकर रोग येऊन गेला तरी लोकांच्या वर्तनात, मानसिकतेत बदल घडून येत नाही. प्लास्टिकवर बंदी असूनही इतक्या मोठया प्रमाणावर प्लास्टिक कसे कचऱ्यात जमा होते, हा प्रश्नच आहे. महात्मा गांधींच्या १५० व्या जन्म शताब्दीनिमित्त स्वच्छ भारत हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल” असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी राजपथ, नवी दिल्ली येथे २ ऑक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात करताना म्हटले. स्वच्छ भारत अभियानाला देशव्यापी एका चळवळीचे स्वरुप देण्यात आले.
स्वच्छतेच्या या चळवळीचे नेतृत्व करताना जनतेने महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे जनतेला आवाहन केले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी स्वत: हाती झाडू घेऊन दिल्लीतील मंदीर मार्ग पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ केला. रस्त्यावर लोकांनी घाण करु नये व इतरांनाही त्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन त्यांनी केले. जनतेला पंतप्रधानांनी “ ना गंदगी करेंगे, ना करने देंगे” चा मंत्र दिला. याप्रसंगी पंतप्रधानांनी नऊ व्यक्तींना स्वच्छता मोहिमेचे दूत म्हणून घोषीत केले तसेच या व्यक्तींना आणखी नऊ व्यक्तींना स्वच्छतेचे दूत बनवण्यास सांगितले.
जनतेच्या सहभागामुळे स्वच्छ भारत अभियानाचे रुपांतर एका राष्ट्रीय चळवळीत झाले. या अभियानामुळे लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. लोकांच्या सक्रीय सहभागामुळे महात्मा गांधींचे स्वच्छ भारत हे स्वप्न लवकरच आकार घेण्याच्या मार्गावर आहे.
पंतप्रधानांनी स्वत:च्या उक्ती व कृतीतून जनतेला स्वच्छ भारत अभियानाचा संदेश दिला आहे. पंतप्रधानांनी वाराणसीमध्येही स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत त्यांनी गंगा नदीच्या अस्सी घाटावर अभियानाची सुरुवात केली. स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. याप्रसंगी पंतप्रधानांनी स्वच्छतेची महती विशद करत देशातील अनेक कुटुंबांमध्ये शौचालये नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांविषयी प्रबोधन केले.
स्वच्छतेसाठीच्या या जनचळवळीमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग होता. सरकारी कर्मचारी, लष्करी जवान, सिने कलाकार, खेळाडू, उद्योजक, अध्यात्मिक गुरू सर्वजण या कार्यासाठी पुढे सरसावले. स्वच्छता अभियासानासाठी देशभरात विभिन्न सरकारी विभाग, अशासकीय संस्था व स्थानिक समाज केंद्रांनी आयोजित केलेल्या उपक्रमात लाखो लोकांनी सहभाग घेतला. संगीत, नाट्य, पथनाट्याच्या माध्यमातून देशभरात स्वच्छेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
स्वच्छ भारत अभियानात लोकांचा सहभाग, विविध विभाग, संघटनांनी राबवलेले उपक्रम याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसोद्गार काढले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी समाज माध्यमातून (सोशल मिडियाच्या) माध्यमातून लोक सहभागाबद्दल नेहमीच प्रशंसा करत आले आहेत. स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून ‘#MyCleanIndia’ हा उपक्रम समाजमाध्यमांवर (सोशल मिडियावर) सुरू करण्यात आला.
लोकांच्या प्रतिसादामुळे स्वच्छ भारत अभियानला जनचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. लोकांनी उत्स्फूर्त सक्रीय सहभाग नोंदवत स्वच्छ व निटनेटक्या भारताची शपथ घेतली.
रस्ते साफ करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, शौचालयांची स्वच्छता व निरोगी वातावरण यासाठी हाती झाडू घेणे हा स्वच्छ भारत अभियानाचा भागच बनला आहे. लोकांनी ही चळवळ पुढे नेत “ईश्वराचे दुसरे रुप म्हणजे स्वच्छता” हया संदेशाच्या प्रसारात मदत केली आहे.
भारताच्या ४,००० हून अधिक शहरांच्या, रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरु केलेला राष्ट्रीय पातळीवर अभियान आहे. हे अभियान २ ऑक्टोबर २०१४ रोजी राजघाट, नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरु झाले. त्यांनी स्वत: रस्त्याला स्वच्छ केले. मोदी म्हणाले,”महात्मा गांधींना सर्वात मोठे स्मारक म्हणजे २०१९ मध्ये त्यांच्या १५० व्या जयंतीला त्यांची स्वच्छ भारताची इच्छा साध्य करणे होय. हे भारताच्या स्वच्छतेसाठी सर्वात मोठे अभियान आहे. यात ३० लक्षाहून अधिक सरकारी कर्मचारी व शाळेतल्या व कॉलेजमधल्या मुलांनी भाग घेतला आहे.”[ संदर्भ हवा ] विशेष म्हणजे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात राबविले जाते आहे.स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) हे पेयजल व स्वछता मंत्रालयांमार्फत व स्वच्छ भारत अभियान (शहरी) हे शहर विकास मंत्रालयमार्फत राबविले जात आहे .२ ऑक्टोबर २०१४ ला ग्रामीण भागासाठी निर्मल भारत अभियानाची पुर्नरचना करून स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) सुरु करण्यात आले . तर शहरी भागात ते संपूर्णपणे नव्याने सुरु करण्यात येत आहे
२०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील ३२.७०% ग्रामीण कुटूंबांनाच शौचालयाच्या सुविधा होत्या , तर २०१३ मधील नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन च्या पाहणीनुसार ग्रामीन भागातील ४०.६%ग्रामीण कुटूंबानाच शौचालयाच्या सुविधा होत्या, स्वच्छ भारत अभियानाने ‘२०१९’पर्यंत स्वच्छ भारत ‘ साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे , यासाठी ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या पातळीत सुधारणा करणे व गावे हागणदारीमुक्त करणे हे साधारण उद्दिष्ट ठेवले आहे . यासाठी ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालये , सार्वजनिक स्वच्छतागृहे , सामुदायिक स्वच्छतागृहे , शाळा व अंगणवाड्यामध्ये शौचालये , घन व द्रव कचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारून कार्यक्रमाच्या प्रभावी अंलबजावणीवर भर देण्यात येत आहे .
निर्मल भारत अभियानात खालील सुधारणा करून स्वच्छ भारत अभियान कार्यरत आहे. वैयक्तिक शौचालयाची किंमत १०,०००रु . ऐवजी १२,०००रु. ठरविण्यात आली आहे .
वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी केंद्र – राज्य वाटा ७५:२५ व ईशान्यपूर्व राज्ये व जम्मू -काश्मीरसाठी ९०:१० असाच आहे.
भविष्यात इंदिरा आवास योजना लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठीची मदत इंदिरा आवास योजनेतून मिळेल (सध्या ती स्वच्छ भारत अभियानातून दिली जाते ).
शाळांमधील शौचालयांच्या उभारण्याची जबाबदारी मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे तर अंगणवाड्यामधील शौचालय उभारणीची जबाबदारी महिला व बालविकास मंत्रालयाकडे देण्यात आली आहे .लोकसहभाग व मागणी वाढली पाहिजे यासाठी ‘ स्वच्छतागृहांचा वापर करणे व लोकांच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल करणे ‘ यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. योजनेचे लक्ष्य ‘निर्मल भारत ऐवजी ‘स्वच्छ भारत ‘ असे झाले आहे व योजनेचे साध्य वर्ष २०२२ ऐवजी २०१९ झाले आहे.
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे.
या अभियानास वाढता प्रतिसाद मिळत आहे. घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहिल… गाव स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहिल… शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहिल, पर्यायाने देशही स्वच्छ राहिल. स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत देश स्वच्छ करण्याचा संकल्प स्वच्छ भारत अभियानातून मांडला आहे. त्यांचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्राचा हातभारही मोठ्या प्रमाणात लागत आहे. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत संकल्पाला आता महाराष्ट्राने आणखी व्यापक स्वरुप देण्याचे ठरविले आहे. त्यातूनच आता राज्यातील नागरी भागात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यास सुरूवात होणार आहे.
येत्या पाच वर्षांत भारत हा स्वच्छ देश म्हणून ओळखला जावा, यासाठी केंद्राने राबविलेली योजना महत्त्वपूर्ण आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी राज्याचा हातभारही लागणे आवश्यक आहे. त्यासाठीच महाराष्ट्र शासनाने नागरी भागातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून यादृष्टीने व्यापक प्रयत्न करण्यात आले आहेत. यापुढील काळातही या अभियानाची व्याप्ती वाढवून संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे त्यातलेच एक पाऊल आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यांमधील सर्व शहरांमधील उघड्यावर शौचालयास जात असलेल्या कुटुंबांना शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी व शहरांमधील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्यामध्ये ‘नागरी स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसारच नगरविकास विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत हे अभियान २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत राबविण्यात आले.
अभियानाचा आराखडा या अभियानातील घटकांची अंमलबजावणी नगरविकास विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत पुढील प्रमाणे संयुक्तपणे करण्यात येणार आहे.
वैयक्तिक घरगुती शौचालय, सामुहिक शौचालय व सार्वजनिक शौचालय बांधकाम : नगरविकास विभाग सर्व महानगरपालिका तसेच ‘अ’ वर्ग व ‘ब’ वर्ग नगरपालिकांमधील शौचालय बांधकाम व त्यासाठी आवश्यक क्षमता बांधणी, प्रचार, प्रसार व प्रसिद्धी आणि जनजागृती. पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग
‘क’ वर्ग नगरपालिका व नगरपंचायतीमधील शौचालयांचे बांधकाम व त्यासाठी आवश्यक क्षमता बांधणी, प्रचार, प्रसार व प्रसिद्धी आणि जनजागृती. नागरी घनकचरा व्यवस्थापन :
संपूर्णपणे नगरविकास विभागामार्फत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) ची राज्यामधील अंमलबजावणी: अभियानाचा उद्देश उघड्यावरील शौचविधी बंद करणे. हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांना या कामातून मुक्त करणे. नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करणे. स्वच्छतेच्या चांगल्या पद्धतीच्या अनुषंगाने सवयींमध्ये बदल करणे.
स्वच्छतेविषयी जागरूकता निमार्ण करणे आणि त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड घालणे. स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य हेतू हा होता कि, ग्रामीण खेड्या गावातील आणि शहरी भागात स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे.
तसेच प्रत्येक गावात आणि शहरी भागात शौचालय बांधणे इ. त्याच बरोबर भारत देशातील रस्ते व पायाभूत सुविधांची साफ – सफाई करणे हे आहे.
स्वच्छ भारत अभियान योजनेमधून त्यांनी सर्व लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. ही मोहीम पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय पातळीवर राबवली आहे. तसेच नागरिकांना भाग घेण्यास आवाहन दिले. नरेंद्र मोदींजी नी आपल्या भाषणात जनतेला स्वच्छतेचे पालन करणे ही केवळ सरकारची नाही तर प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. जिथे स्वच्छता असे तिथे लक्ष्मीचा सहवास असतो. कधी – कधी काही लोक धार्मिक स्थळांवर कार्यक्रम आयोजित केले जातात. तिथे जाऊन बरेच लोक कुडा – कचरा टाकतात आणि त्या जागेला प्रदूषित करतात. त्यामुळे विविध प्रकारचे आजार पसरतात. या सगळ्याचा जास्त परिणाम हा मनुष्याच्या शरीरावर होतो.
सर्वांनी सार्वजनिक स्थळावर गेल्यास बाटल्या, खाद्य पदार्थांची पाकिटे आणि अन्य कुडा – कचरा एका कागदात जमा करून कचरा कुंडीत फेकावा. तसेच ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून कचरा नगरपालिकेच्या कचरा जमा करणाऱ्या गाडीत टाकावा. कोणीही व्यक्ती अगर रस्त्यावर कचरा टाकत असेल या थुंकत असेल तर त्याला रोकले पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेची सुरुवात ही स्वतपासूनच करायला हवी. स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणे आवश्यक आहे. जर व्यक्ती स्वच्छता ठेवेल तर इतर रोगांपासून मुक्त राहील. तसेच आपल्या घराबरोबर देशाची पण साफ – सफाई करणे गरजेचे आहे. या भारत देशाला स्वच्छ भारत बनवण्यास प्रयत्न केले पाहिजे. या देशातील प्रत्येक व्यक्तीला असे वाटले पाहिजे कि, आपले शहर हे आमचे प्रयत्न आणि आमची प्रगती ही देशाची प्रगती. म्हणून सगळ्यांनी मिळून स्वच्छ भारत निर्माण करण्याचा संकल्प करूया |
देश हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने राज्यात 2001 मध्ये राज्य शासनाने संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम सुरू केला. हे राज्यात अभियान सुरू झाल्यापासून साडेतीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर या योजनेचे नाव संपूर्ण स्वच्छता अभियान, निर्मल भारत ग्राम आणि 2014 मध्ये “स्वच्छ भारत मिशन’ असे करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या विभागातून महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त झाले. पाणी व स्वच्छतेच्या बहुमूल्य कामांमुळे राज्याने अनेक पारितोषिकेही प्राप्त केली. अनेकदा राज्याचा सत्कारही करण्यात आला. अनेक अधिकाऱ्यांना पाणी व स्वच्छतेच्या कामामुळे जिल्हाधिकारी पदांवर बढत्या मिळाल्या.
राज्य हागणदारीमुक्तीसाठी अहोरात्र सेवा
राज्यातील हागणदारीमुक्त करण्याची मोलाची कामगिरी स्वच्छ भारत मिशनमधील कर्मचाऱ्यांनी केली. आयुष्याच्या उमेदीच्या दिवसांत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गाव आणि राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी अहोरात्र सेवा दिली आहे. पाणीपुरवठ्याबाबत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गावागावांत लोकांना शुद्ध पाणी मिळण्यापासून तर पाणीपट्टी भरणे, पाणीपट्टी भरण्याबाबत जनमत तयार करणे, पाणी व स्वच्छताबाबतचे मार्गदर्शन करण्याचे काम केले.
स्वच्छता ही आपली पहिली आणि प्राथमिक जबाबदारी आहे. सगळ्यांना समजले पाहिजे की अण्णा आणि पाणी या प्राथमिक गरजे बरोबर स्वच्छता सुद्धा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही स्वच्छता ही प्राथमिक गर्जन पेक्षा सुद्धा आता महत्त्वाची आहे. आपण तेव्हाच निरोगी राहू शकतो जेव्हा आपण साफ-सफाई करण्याची सवय आचरणी लावू . बालपण हा सगळ्यांच्या जीवनातील सुखद काळ असतो, बालपणी आपल्याला चालणे बोलणे, वाचणे, खाणेपिणे इत्यादी गोष्टी शिकवल्या जाऊ लागतात. त्याच वेळी मुलांना स्वच्छता या गोष्टीची सुद्धा शिस्त लावली पाहिजे.
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वच्छते संदर्भात वेगवेगळ्या विषयावर खूप काही गृहपाठ निबंध प्रकल्प कार्यानुभव परिसर अनुभव या गोष्टी द्वारे स्वच्छतेविषयी जागृत ठेवले पाहिजे. आजच्या घडीला आहे एक महत्त्वपूर्ण विषय आहे, कारण एक मोठा लोकसंख्या असलेला देश स्वच्छतेच्या अभावी आजारी होण्याचे प्रमाण वाढून रोगी जीवन जगत आहे. म्हणून आपल्याला जीवनात स्वच्छते बाबत जागृत होणे अत्यंत गरजेचे आहे, समृद्ध आणि निरोगी राष्ट्र निर्माण करण्याकरता आपणा सर्वांना पुढाकार घेऊन स्वच्छतेकडे वाटचाल करायची आहे. आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी चे अभियान सुरु केले त्याला स्वच्छ भारत अभियान म्हटले जाते. भारतीय नागरिक या नात्याने आपण सर्वांनी या अभियानात सहभागी होऊन त्याचा उद्देश्य याचे ध्येय त्याचे लक्ष १००% पूर्ण करण्यासाठी सक्रीय स्वरूपाने सहभाग घेणे आवश्यक आहे.
गंगाधर ढवळे ,नांदेड
संपादकीय
२०.१२.२०