भंडाऱ्यावरुन चिवचिवाट आणि टिवटिवाट

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे १० चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. भंडाऱ्यातील घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीची चौकशी पूर्ण झाल्यावर रिपोर्टच्या आधारे दोषींवर कारवाई करू. राज्यातील सर्व रुग्णाललयात फायर ऑडिट, स्ट्रक्टरल ऑडिट केलं जाईल,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आगीच्या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

तर “भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या घटनेची उच्च स्तरीय चौकशी जाहीर करण्यात आली आहे. आगीच्या कारणांची चौकशी तज्ज्ञ मंडळी करत आहे. जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

“मुलांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आग कशामुळे लागली याचं कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भंडारा घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. “ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असं अजित पवार म्हणाले.

तसंच, अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

“आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अशा घटना टाळण्यासाठी ‘हे’ करता येईल
याबाबत बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्टृचे अध्यक्ष डॅा अविनाश भोंडवे सांगतात राज्य सरकारने तीन महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे.

रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांसाठी कडक मापदंड असले पाहिजेत. रुग्णालयातील इलेक्ट्रिक सर्किटसंदर्भात वारंवार तपासणी झाली पाहिजे
इन्क्युबिटरसारख्या उपकरणांमध्ये अचानक बिघाड होण्याची शक्यता असते. यात स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे या उपकरणांची योग्य तपासणी करण्यात आली पाहिजे.
“अनेकवेळा सरकारी रुग्णालयांमध्ये उपकरणांच्या किंमतींवर तडजोड केली जाते. याचा थेट परिणाम अत्याधुनिक उपकरणांच्या दर्जावर फरक पडतो. ही उपकरणं थेट रुग्णांच्या जीवाशी संबंधित असतात. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे” असं डॅा भोंडवे पुढे म्हणाले.

महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भंडाऱ्यातील घटनेबाबत सहवेदना व्यक्त केल्या आहेत. भंडारा येथील घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. आगीत दगावलेल्या १० नवजात बालकांच्या परिवाराच्या दु:खाची कल्पनाही करता येत नाही. बातमी ऐकल्यापासून मन सुन्न झालंय. या आगीत जखमी झालेल्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूयात. केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी भंडारा घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.

Fire at Maharashtra’s Bhandara district hospital & subsequent death of infants in the unfortunate incident is horrific & heart wrenching to say the least. My deepest condolences to the parents & families of children who lost their lives. Om Shanti!

या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी!

भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी भंडाऱ्यातील घटनेबाबत ट्वीट केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या पालकांप्रती त्यांनी सहवेदनाही व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भंडारा घटनेबाबत सहवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आवाहन सुद्ध राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारला केलं आहे.

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भंडारा घटनेत मृत्यमुखी पडलेल्या बालकांना श्रद्धांजली अर्पण केली.

“महाराष्ट्रातल्या सगळ्याच सरकारी दवाखान्यांमध्ये वाईट परिस्थिती आहे. गरीब जनतेला तिथं जावं लागतं. आयसीयूमध्ये 10 बाळांचा जीव जातो, तर मला हॉस्पिटल अधिकाऱ्यांना विचारायचं आहे की, आग लागल्यानंतर अलार्म कधी वाजला? यात नेमकी चूक कुणाची आहे. बालकांच्या जीवाशी खेळणं बंद करा. भंडारा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा,” अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलीआहे.

मृत बालकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मृत बालकांपैकी सात जणांचा मृत्यू धुराने गुदमरून तर तिघं आगीत होरपळून मरण पावले आहेत. बालकांचे मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशीत दोषी आढळलेल्यांवर निश्‍चितच कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

या दुदैवी घटनेवर बोलताना, प्रगतीशील महाराष्ट्रात दहा नवजात बालकांचा मृत्यू आयसीयूमध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही. मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखाची मदत द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही काळी घटना आहे. फायर ऑडिट का झाले नाही? याची चौकशी व्हावी. यावर राजकारण करायचं नाही मात्र ज्यापद्धतीने दावे केले जात आहेत. त्यात अर्थ नसून ते चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले.

पूर्व विदर्भातील भंडारा येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर प्रत्येक जण शोक व्यक्त करीत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगेच राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्याची घोषणा केली. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा रुग्णालयांचे ऑडिट करण्याची मागणी केली. वास्तविक लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार आजवर जे ऑडिट करण्यात आले त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अशा परिस्थितीत ऑडिट झाले तरी याचा काहीही फायदा होणार नाही.

नियमानुसार दरवर्षी सरकारी इमारती व रुग्णालयांचे ऑडिट होत असल्याचे अग्निशमन विभागातील वरिष्ठ अधिकारी सांगतात. संबंधित अग्निशमन विभागाकडून हा ऑडिट रिपोर्ट पाठविला जातो. वरिष्ठस्तरावर ऑडिट रिपोर्ट बघून त्रुटी दूर करण्याची आशा बाळगली जाते. सोबतच अग्निशमन विभागाशी संबंधित नियमानुसार निर्माण व्हावे, अशी अपेक्षा केली जाते. परंतु बहुसंख्य ऑडिट रिपोर्ट हे फाईलमध्येच पडून असल्याचे वास्तव आहे.

ऑडिट कोण करणार?

विदर्भातील सर्व सरकारी रुग्णालयांचे ऑडिट करण्यासाठी सक्षम अग्निशमन अधिकारीच नाहीत. पूर्व विदर्भाचा विचार केला तर फक्त नागपुरात महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके व उप मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे दोनच अग्निशमन अधिकारी उपलब्ध आहेत. अन्य कोणत्याही जिल्ह्यात अग्निशमन अधिकारी कार्यरत नाही. सर्व ठिकाणी ही पदे रिक्त आहेत.

कोविडने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढले असतानाच भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशूंच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत दहा अर्भकांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला. तीन नवजात होरपळून मरण पावले तर सातजणांचा गुदमरून अंत झाला.
या दुर्घटनेने उभा महाराष्ट्र तसेच देशही हादरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देतानाच मृत शिशूंच्या पालकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. राज्यातील सरकारी इस्पितळांचे फायर ऑडिट करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. जग पाहण्याच्या आधीच जगाचा निरोप घ्यावा लागणाऱ्या बालकांच्या मृत्यूचे राजकारण करणे हा विषय नाही. परंतु आगीमागचे कारण स्पष्ट होणे व दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यासाठी सखोल चौकशी करावी आणि या आगीत मृत्युमुखी पडलेल्या बालकाच्या परिवाराला दहा लाख रुपये द्यावे, अशी मागणी भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांनी केली.

ही घटना दु:खदायक आहे. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई व्हावी, चौकशीअंती सर्व कळेलच. हलगर्जीपणा आहे की आणखी काय हे लवकरच कळेल, असे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी सांगितले.

मी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. निष्काळजीपणामुळेच ही घटना घडली. रुग्ण कल्याण समितीने दुरुस्तीची मागणी केली. प्रस्ताव गेला. परंतु दुरुस्ती झाली नाही. केवळ निष्काळजीपणा याला जबाबदार आहे. सरकारने चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत बालकांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदत द्यावी, तसेच अशा घटना महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी, असे भंडाऱ्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली घटना सुन्न करणारी आहे. निष्पाप चिमुकल्यांचा यात बळी गेला. या प्रकरणात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे तसेच बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेला अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली.

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून दहा नवजात बालकांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेमुळे नवजात बालकांच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. या संकटातून सावरण्याची त्यांना शक्ती देवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशी घडली, याची चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल. या संपूर्ण घटनेकडे राज्य शासनाचेसुद्धा गांभीर्याने लक्ष आहे. सदर घटनेसंदर्भात अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा केली. त्यांना तातडीने सामान्य रुग्णालयाला भेट देऊन कारवाईसंदर्भात सांगितले, असे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत दगावलेल्या दहा नवजात शिशूंना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या मृत्यूमुळे मातांसह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ईश्वर त्यांना दु:ख सहन करण्याची शक्ती प्रदान करो. ही घटना अतशय दुर्दैवी आहे, असे गोंदियाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सांगितले.

मात्र भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे सुपूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट झालेलं नाही हे लक्षात आले. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिले. मुळात ह्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही. अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की ते कुणालाच जुमानत नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय
११.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *