कंधार; प्रतिनिधी
भारतीय सैनिक म्हणटले की आठवते,शौर्य,वीरता,धाडस,,पराक्रम गाजवणारे निधड्या छातीचे,करारी बन्याचे वीर.देशावर निर्सर्गीक वा कृत्रिम अपत्ती आल्यास पहिल्यांदा मदतीला धावून जातो तो भारतीय सैनिक.डोळ्यात तेल घालून अहोरात्र भारत मातेची सेवा करतांना आपल्या परिवारा पासून कोसोदुर राहून जो त्याग करतांत त्या त्यागमय जीवनाला सर्व भारतीय त्यांच्या कार्याला नतमस्तक होतात.पानभोसी येथील भा दे.भ. सेवानिवृत्त माजी सैनिक नाईकवाडे यांच्या सत्कार सोहळ्यात या सेवानिवृत्त बहाद्दर कर्नल यांनी मन्याड खोर्यातील स्फूर्तिदायक 3333 राख्या व 3333 सदिच्छा पत्रांचा उल्लेख करुन या उपक्रमात जणु उर्जा भरली.संकट कृत्रिम असो वा नैसर्गिक भारतीय सैनिक वीर सेवेसाठी तयारच असतात.
15 जानेवारी रोजी कंधार तालुक्यातील 82 ग्राम पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्या भारतीय सैन्यदलात आपले कर्तव्य बाजावून सेवानिवृत्त झालेल्या वीरांनी 15 जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिन म्हणून साजरा होतो.1949 रोजी फिल्ड मार्शल के.एम.करियप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बचर यांचे कडुन सुत्र स्विकिरले.तेंव्हापासून भारतीय सेना दिवस नवीदिल्ली येथे दरवर्षीच बहाद्दर सेनानींना सलामी देत साजरा केला जातो.
कंधार तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुक व्यवस्थित पार पडावी.यासाठी कंधार पोलिस स्टेशनच्या कर्तृत्वदक्ष पोलिस बांधवांच्या खांद्याला खांदा लावून माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्षा सहित अनेकजणांनी विनामुल्य सेवा देवून भारतीय सेना दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत आपल्या सेवादक्षतेची जणुकांही साक्ष दिली.कोरोनाच्या महासंकटात देखोल या माजी सैनिक संघटनेच्या बहाद्दरांनी कंधार पोलिस स्टेशनच्या पोलिस बांधवासह आपली सेवा देवून देशप्रेमाची प्रचिती दिली त्याबद्दल सेवा बजावणाऱ्या सर्व माजी सैनिक जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभाराभिनंदन करण्यात येत आहे.
यात भारत मातेचे बहाद्दर शूरवीर माजी सैनिक जिल्हाध्यक्ष भा.दे.भ.बालाजीराव चुकलवाड(पाताळगंगा),भा.दे.भ.गोविंदराव जायभाये(बोरी खु.) भा.देवून.उमाजी पंदीलवाड(), भा.द.भ.हणमंतराव केंद्रे (देवईचीवाडी),भा.दे.भ .शिवाजीराव कोटाळे (बहाद्दरपुरा)भा.दे.भ.संभाजीराव गीते (बाभुळगाव),भा.दे.भ.राहुलराव कांबळे (कंधार),भा दे भ बापुराव शेवाळे (पानभोसी) या सर्व माजी सैनिक बांधवानी ग्राम पंचायत निवडणुकीत आपली सेवा देवून मन्याड खोर्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.मन्याड खोर्यातील स्फूर्तिदायक उपक्रम व सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारच्या वतीने बहाद्दर माजी सैनिक बांधवाच्या कार्याला मानाचा मुजरा!