कंधार शहरातील सहा दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचे साहित्य खाक ; शॉर्टसर्किटने झाली सदरील घटना

कंधार ;प्रतिनिधी

शहरातील बाजारपेठेमधील सहा दुकानाला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक झाले असून सदरील घटना स्थळी माजी आमदार व खासदार डॉ. भाई केशवराव धोंडगे, जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे आदींसह विवीध संघटनेच्या पदाधिका-यांनी भेट देवून पाहणी केली.

दिनांक 26 जानेवारी रोजी पहाटे शहरातील मुख्य रस्त्यावरील वेलकम सह सहा दुकानाला शॉकसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. सदरील दुकानांमध्ये बाजारपेठेतील गुलाब नबी वेलकम फँन्सी फुट वेअर,अफसर यांचे मेन्स फुटवेअर, रुकसार तबसुम यांचे वेलकम जनरल स्टोअर, महंमद रियास यांचे वेलकम गिफ्ट सेंटर आणि रामेश्वर बनसोडे यांचे शिव कृपा जनरल स्टोअर्स ,शेख कलीम यांचे सुलेमान बँगल्स अशा सहा दुकानात आग लागल्याची घटना घडली.

यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.घटनास्थळी माजी आमदार व खासदार डॉ.भाई केशवराव धोंडगे, सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शामसुंदर शिंदे,महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा चित्ररेखा गोरे ,कंधार नगरपालिका उपाध्यक्ष जफर बाहोद्दिन, भाजपा शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, निलेश गौर, राजहंश शहापुरे, आदीसह कार्यकर्त्यांनी भेट दिली .

प्रशासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावे असे प्रणिता ताई देवरे चिखलीकर यांनी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांची भेट घेऊन मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *