कंधार ; प्रतिनिधी
covid-19 मुळे बंद झालेल्या शाळा आता 27 जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून इयत्ता पाचवी ते आठवी वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दिनांक 25 जानेवारी रोजी नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन शहरातील खाजगी शाळांची सॅनिटायझरने फवारणी करा अरावे असे निवेदन शहरातील खाजगी मुख्याध्यापकांच्या वतिने देण्यात आले आहे.
इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा दिनांक 27 जानेवारी पासून सुरू कराव्यात असे प्रशासनाच्या वतिने आदेशित करण्यात आले आहे. त्यामध्ये शिक्षकांची तपासणी, शाळा सँनिटायझर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत .
त्यामुळे कंधार शहरातील खाजगी मुख्याध्यापक आणि बैठक घेऊन निवेदन तयार केले असून सदरील निवेदन नगरपालिका मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना देण्यात आले. तात्काळ सदरील मागणीची दखल घेऊन Covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दोन दिवसात शहर कंधार शहरातील खाजगी शाळांना सँनिटायझरची फवारणी करून देण्यात येईल असे आश्वासन मुख्याध्यापकांच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक महासंघाचे मराठवाडा सचिव हरीहर चिवडे, तालुका अध्यक्ष भास्कर कळकेकर, शिक्षक नेते राजहंश शहापुरे,दिगांबर वाघमारे , लक्ष्मण मुंडे,परदेशी,प्रदीप कदम सर आदीसह शहरातील खाजगी शाळांचे मुख्याध्यापक व प्रतिनिधीची यावेळी उपस्थिती होती.