२०१८ साली देशातील ज्या १८ बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील नदाफ एजाझ अब्दुल रौफचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ जानेवारी २०१८ रोजी या शूरवीर बालकांना गौरविले गेले.
नांदेड जिल्हय़ातील पार्डी (मक्ता) येथील एजाझने धाडस दाखवून दोन मुलींना तलावात बुडण्यापासून वाचविले होते. त्याने दाखविलेल्या साहसाची नोंद घेत त्याला हा पुरस्कार जाहीर झाला.
३० एप्रिल २०१७ रोजी पार्डी गावातील काही महिला व मुली येथील बंधाऱ्यावर कपडे धुन्यासाठी गेल्या असता त्यातील एका मुलीचा पाय घसरून ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी तिच्या मैत्रिणीने पाण्यात उडी घेतली. मात्र, बंधाऱ्यात त्या दोघी बुडायला लागल्या. हे चित्र पाहून दोन अन्य मुलींनी बुडणाऱ्या मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण त्यांनाही पोहता येत नव्हते. बुडणाऱ्या मुलींचा आवाज ऐकून लोक तलावावर मदतीसाठी गेले. या वेळी शेताकडे निघालेल्या इजाजने बंधाऱ्याजवळील लोकांचा जमाव बघत तिकडे धाव घेतली. त्याने प्रसंगवधान व धाडस दाखवून पाण्यात उडी घेतली. २० फूट खोल पाण्यात तो मुलींचा सतत शोध घेत राहिला व त्याने यातील तब्बसुम आणि आफरीन या दोन मुलींचे प्राण वाचवले. दुर्दैवाने यातील दोन मुलींचा मृत्यू झाला. इजाज हा पार्डी येथील राजाबाई हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यलय येथे दहावीत शिकत असून लष्करात रुजू होऊन देशाची सेवा कराण्याची त्याची इच्छा आहे.
७ मुली आणि ११ मुले अशा एकूण १८ बालकांना वर्ष २०१७च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये ३ बालकांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चार श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे. पुरस्कारप्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
तद्वतच आता पुन्हा नांदेडच्याच कामेश्वर या शाळकरी मुलाला प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार जाहीर झालाय. कंधार तालुक्यातील घोडज इथल्या कामेश्वर वाघमारे या मुलाला हा पुरस्कार जाहीर झालाय. गेल्यावर्षी नदीत बुडणाऱ्या दोन मुलांचे प्राण कामेश्वरने वाचवले होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने केलेल्या या धाडसाचे चीज व्हावे यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शासन दरबारी प्रयत्न केले. आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने कामेश्वरला प्रधानमंत्री बाल शौर्य पुरस्कार जाहीर केलाय. अत्यंत हलाखीची परिस्थिती असणाऱ्या कामेश्वरला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आमदार शिंदे यांनी त्याचा सत्कार केलाय. त्यासोबतच घोडज इथल्या गावकऱ्यांनी आमदार शिंदे यांचे आभार मानले.
कोणतीही व्यक्ती आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवते ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे कामेश्वर वाघमारे यानं दाखवलेल्या धाडसाचं कौतुक व्हाव म्हणून प्रयत्न केले. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री, नांदेडचे जिल्हाधिकारी, महिला व बाल आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न केल्याचं आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी सांगितले. कामेश्वर वाघमारे यानं दाखवलेल्या धाडसामुळे त्याला पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कार मिळाला आहे.याचा त्याला निश्चितच फायदा होईल, असं आमदार शिंदे म्हणाले.
जीव वाचवलेल्या मुलांनी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानं पोलिसांकडून सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी माझा सत्कार केला. प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार मिळाल्यानं आनंद वाटत असल्याचं कामेश्वर वाघमारे यांनं सांगितलं. अडचणीत असलेल्या व्यक्तींच्या मदतीला धावून गेले पाहीजे, असंही कामेश्वर वाघमारे म्हणाला. गावकऱ्यांसमोर आमदारांच्या हस्ते सत्कार झाल्यानं वाघमारे याचे कुटुंबीय आनंदी झाले होते.
कंधार तालुक्यातील घोडज गावाजवळ 22 फेब्रुवारी 2020 रोजी मन्याड नदीत 3 मित्र पोहण्यासाठी गेले होते. ओम मठपती, गजानन श्रीमंगले आणि आदित्य डुंडे असं या तिघांचं नाव होतं. ते पोहण्यासाठी नदीत उतरले, मात्र या तिघांना नीट पोहता येत नव्हतं. ते बुडत असताना कामेश्वर वाघमारे या मुलाने पाहिलं. कामेश्वरने जीवाची बाजी लावत गजानन आणि आदित्यला वाचवलं. मात्र, यावेळी ओम मठपती या मुलाचा मृत्यू झाला.
कंधार, जि. नांदेड: घोडज येथील कामेश्वर जगन्नाथ वाघमारे (घोडजकर) या बालकाने जीवाची बाजी लावत मानार नदीच्या अथांग पाण्यात बुडणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांचे प्राण वाचविले होते. त्याच्या या धाडस, शौर्याची दखल घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या निवडीसाठी लोकमतसह खासदार, आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार आदींनी पाठपुरावा केला होता. घोडज, ता. कंधार येथील मनोविकास विद्यालयात शिकणारे तीन विद्यार्थी २२ फेब्रुवारी २०२० रोजी ऋषी महाराज मंदिरात दर्शनासाठी आले होते. तत्पूर्वी आंघोळीसाठी तिघे जण जवळच असलेल्या मानार नदीवरील धोबीघाटावर गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडत होते. बुडत असताना होणारा आवाज जवळ असलेल्या म. फुले माध्यमिक विद्यालय, शेकापूर, ता. कंधार येथे इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या कामेश्वर वाघमारे याच्या कानावर पडला. क्षणाचाही विलंब न करता त्याने पाण्यात उडी मारली. पाण्यात बुडत असलेल्या आदित्य दुंडे व गजानन श्रीमंगले या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दाढेतून जीवाची बाजी लावून कामेश्वर याने बाहेर काढले. मात्र ओम मठपती या विद्यार्थ्याचे प्राण वाचविता आले नसल्याचे शल्य कामेश्वर याला बोचत राहिले.
तत्कालीन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास जाधव, व्ही.आर. राठोड, सुनील पत्रे आदींनी कौतुक करत सहकार्य केले. हा विषय हाती घेऊन पुरस्काराचा प्रस्ताव तयार करावा, यासाठी लोकमतने पाठपुरावा केला. ग्रामपंचायत घोडज, स्वच्छतादूत राजेश्वर कांबळे यांनी निवेदनाद्वारे पुरस्कार देण्याची मागणी केली. खा. प्रताप पा. चिखलीकर यांनीही प्रस्तावासाठी पाठपुरावा केला. आ. श्यामसुंदर शिंदे यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदींनी कौतुक करत प्रस्ताव सादर करण्यास संबंधितांना सांगितले. तत्कालीन तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी जिल्हाधिकारी, महिला व बालविकास विभागाकडे विहित नमुन्यात अर्ज सादर केला होता.कामेश्वर वाघमारे याने ११ महिन्यांपूर्वी केलेल्या साहसाची दखल केंद्र सरकारने घेतली. २२ जानेवारी २०२१ रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी त्याची निवड केली आहे. हे वृत्त धडकताच घोडजसह जिल्हाभरातून कामेश्वरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्यापेक्षा उंच व वजनाने जास्त असलेल्या २ मुलांचे प्राण वाचविणाऱ्या कामेश्वरला आर्थिक आधार देऊन उच्च शिक्षणासाठी मदतीची गरज आहे.
आपल्या जिवाची पर्वा न करता दोन मुलांचा जिव वाचविणार्या घोडज येथील कामेश्वर वाघमारेची केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कारासाठी निवड केली आहे. या पुरस्कारासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
त्याच्या या धाडसी व जिगरबाज कार्याची दखल लोहा- कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी घेतली व कामेश्वर वाघमारेचा त्यावेळी आ. शिंदे यांनी सत्कार करुन कौतूक केले होते. आ. श्यामसुंदर शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अशोकराव चव्हाण, जिल्हाधिकारी यांना भेटून कामेश्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्याची मागणी वेळोवेळी आ. शिंदे यांनी मंत्रालय स्तरावर केली होती.
आ. शिदे यांच्या सततच्या तळमळीच्या पाठपुरावाला अखेर यश आले असून केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने ता. 22 जानेवारीच्या पत्रकान्वये घोडज येथील धाडसी कामेश्वर वाघमारेला प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार घोषीत केला असल्याने लोहा- कंधार मतदार संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. धाडसी कामेश्वर वाघमारेला एका शानदार कार्यक्रमात ता. २५ जानेवारी २०२१ रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आ. श्यामसुंदर शिंदे आणि सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंद यांनी दिली.
कंधार तालुक्यातील घोडज येथे नदी पात्रात पोहण्यास उतरलेल्या तिन मुलापैकी एकाचा मृत्यू झाला ही दुर्दैवी बाब आहे.घोडज येथिल कामेश्वर वाघमारे या आठवी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या १४ वर्षीय शालेय विद्यार्थांने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन दोघांचा जीव वाचवण्याचे कार्य केले.हे बहादुरीचे काम आहे ,शौर्याचे काम आहे.या धाडशी मुलाचा लोहा येथे केंद्रित राज्यमंत्री मा.ना.श्री. रावसाहेब दानवे साहेब यांच्या हस्ते दि.२५ रोजी सत्कार आयोजित केला आहे.राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींवर चर्चा करुन राष्ट्रीय बाल शौर्य मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच्या प्रतिक्रिया खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यावेळी दिल्या.
आठवीतील दि.२२ फेब्रुवारी रोजी मानार नदीच्या पाण्यात बुडत असलेल्या, दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला. कामेश्वरीने नदीत उडी घेऊन मोठ्याधाडसाने या दोघा मुलांना नदीतून बाहेर काढले. या कौतुकास्पद कार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि.१४ मार्च रोजी विधान भवनातील त्यांच्या दालनात धाडसी कामेश्वरचा सत्कार केला व त्याचे कौतुक केले. लोहा मतदार संघांचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पुढाकारातून हा सत्कार सोहळा ठिकठिकाणी झाला.
कंधार येथिल मनोविकास माध्यमिक शाळेतील, इयत्ता दहावीत शिकत असलेले, ओम विजय मठपती, आदित्य कोंडीबा दुंडे, गजानन विश्वनाथ श्रीमंगले हे तिघे विद्यार्थी घोडज येथील ऋषी महाराज मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिराजवळ असलेल्या माणार नदीत अंघोळ करून ते दर्शनाला जाणार होते. नदीपात्रातील पाणी पायर्यांपर्यंत आल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, तिघेही विद्यार्थी पाण्यात बुडत असताना ओरडण्याचा मोठा आवाज आला, हा आवाज कामेश्वर वाघमारे च्या कानावर पडला. रामेश्वर ने मोठ्या साहस व धाडसाने यातील दोघांना वाचवण्यात यश मिळवले, परंतु ओम मठपती याला वाचवण्यात तो अपयश झाला. या धाडशी कामगिरी बद्दल कंधार च्या तहसीलदारानी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी कामेश्वर वाघमारे यांच्या नावाची शिफारस जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे. दि.१३ रोजी त्याचा सत्कार मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार,विधानसभा अध्यक्ष माननीय नाना पटोले,नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आदीनी केला.
कंधार तालुक्यातील घोडज येथील कामेश्वर वाघमारे याला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरवावे अशी मागणी कंधार येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते यांनी घटना घडल्यानंतर चारच दिवसांनी केली होती. तालुका प्रशासनाने या संबंधीचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून वरिष्ठ पातळीवर पाठवावा व राज्य सरकारने विहित पद्धतीने योग्य प्रकारे प्रस्ताव करुन केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा आणि वेळोवेळी पाठपुरावा करावा, आणि कामेश्वरला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली होती.
अतिशय लहान वयात कामेश्वर या बालकाने अवर्णनीय कामगिरी करीत पाण्यात बुडणाऱ्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा जीव वाचविला. त्याची दखल घेऊन गौरव करणे गरजेचे आहे. त्यामुळे या धाडसाची, साहसाची इतरांना प्रेरणा मिळते. त्यामुळे केंद्र सरकारकडे राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे असे खा. प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले होते. तसेच तत्कालीन तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी अचूक प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे सांगितले होते. आज सर्वांच्याच प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसते आहे.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
२५.०१.२१