कंधार येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून 60 तरुणांनी केले रक्तदान ; तारकेश तपासे मित्रमंडळाचा उपक्रम

कंधार ; प्रतिनिधी

येथिल तारकेश तपासे मित्रमंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.26 जानेवारी रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सुमारे 60 तरुणांनी रक्तदान करुन उपक्रम राबवीला.

तारकेश तपासे मित्रमंडळाच्या वतीने
आयोजित रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे उदघाटक कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्ही.व्हि.घोबाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून हेडगे कॉलेज आकलकोट येथिल प्राचार्य किसन झीपरे,माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड,माजी सैनिक गणेश बारुळे,पी.व्ही वाघमारे ,गोविंदराव सुर्यवंशी,बापुराव कल्याणकर,पत्रकार दिगांबर वाघमारे ,ॲड.गंगाप्रसाद यन्नावार,निलेश गौर ,मारोती पंढरे,ॲड.सागर डोंगरजकर आदीची यावेळी उपस्थिती होती.

गुरु गोविंदसिंग ब्लडबँक नांदेड चे आनंद लोणे व हर्षद महाजन,सिद्धार्थ सर,रवि होनराव यांनी रक्त संकलीत केले.

यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश मठपती,अनिकेत कदम,अभि ससाणे,अमोल जोंधळे,युनूस शेख,अभि सुर्यवंशी ,पवन ढवळे,प्रसन्न ढवळे,शुभम संगनवार,स्वप्नील बसवंते,शिवराज गोरे,सुमित वाघमारे ,ध्रुपत फुलोरे,ओंकार नागरगोजे,कुणाल कांबळे,निखील ढवळे,प्रदिप फुके,रुत्वीक ढवळे,सुजित वाघमारे ,बिलवाराज लंगोटे,गणेश बनसोडे,बालाजी निकम,ओम बोबले,संतोष तोल्डी,सौरंभ बिडवई आदीसह तपासे मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *