लोहा ( प्रतिनिधी)
राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेता कामेश्वर वाघमारे चे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी मंत्रालयात पुष्पगुच्छ देऊन कामेश्वर वाघमारेचे अभिनंदन केले,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रधान सचिव विकास खारगे यांच्या सोबत कामेश्वरची भेट यावेळी लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी घडवून आणली होती,
, कामेश्वर वाघमारे या मुलाने मन्याड नदीत बुडणाऱ्या दोन मुलांचा जीव वाचवला होता, कामेश्वरच्या धाडसाने त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत होते. लोहा-कंधार मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी धाडसी कामेश्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळवण्यासाठी मुंबई ,दिल्ली दरबारी वेळोवेळी तळमळीने प्रयत्नही केले होते व आमदार शिंदे यांच्या प्रयत्नाला अवघ्या दहा महिन्यात यश आले होते, 22 जानेवारी 2021च्या केंद्रीय महिला व बालविकास विभागाने धाडसी कामेश्वर ला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार घोषित झाल्याचे आमदार शिंदे यांना एका पत्रकान्वये कळविले होते, मुंबई येथे काल आमदार शामसुंदर शिंदे यांनी बाल शौर्य पुरस्कार विजेता कामेश्वर वाघमारे व त्यांचे वडील जगन्नाथ वाघमारेला प्रजासत्ताक दिनी आमदार शिंदे यांनी मुंबईला सोबत घेऊन गेले होते.यावेळी मुंबई येथे आमदार शिंदे यांनी कामेश्वर वाघमारे ला सोबत घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची भेट घडऊन आणली, या वेळी कामेश्वर वाघमारे चे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी कामेश्वरचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून कामेश्वर च्या पाठीवर शाबासकीची थाप देत कामेश्वर चे कौतुक करण्यात आले यावेळी लोहा-कंधार चे आमदार श्यामसुंदर शिंदे उपस्थित होते.