सगरोळी येथील जलस्वराज्य-२ सात कोटी रुपयाचे पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे होत आसल्यामुळे चौकशी करा– शंकर महाजन
बिलोली ;
सगरोळी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांच्यामार्फत पाणी पुरवठा योजनेचे ७कोटी ६३ लक्ष ६४ हजार ४०० रुपये चे काम मागील सन २०१६-१७ पासून सुरुवात करण्यात आले. पण सदरील काम करत असताना गुत्तेदार आहे मनमानी निकृष्ट दर्जाचे काम करत आहे. संबंधित बोगस कामा संदर्भात गावातील काही नागरिकांनी तक्रारी दाखल केल्यावर ही संबंधित विभागाचे अधिकारी कोणतीही चौकशी न करतात काम योग्य प्रकारे होत आहे. आपल्या तक्रारीत तथ्य नाही असे पत्र पत्र दिनांक ३-१०-१७ रोजी देऊन संबंधित गत्तेदाराच्या बोगस कामाला पाठीशी घालण्याचे काम संबंधित अधिकार्याकडून होत असल्याचे आरोप महाराष्ट्र नवनिर्मान सेने चे ता.अध्यक्ष शंकर महाजन यानी केली.
संबंधित गुत्तेदार याचाच फायदा घेऊन विहीरीचे काम करत असताना अत्यंत बोगस कंपनीचे सिमेंट वापर केले. आहे तर रेती व गट्टीचे प्रमाण जास्त प्रमाणात वापर केले. लोखंडी रॉड ची साईज बारीक वापरण्यात आली. ठरावीक अंतर सोडून लोखंड कमी प्रमाणात वापरल्यामुळे विहीर बांधकाम करत असताना चार ते पाच रिंगा फुटून गेले होते. यानंतर याचे काम डबल करण्यात आले तसेच सदर पाणीपुरवठा कडे जाणारा रस्ता फक्त दहा टिप्पर मुरूम टाकून तयार करण्यात आले त्यापैकी बरसे मुरूम आज रोजी उखडून गेले आहे. तसेच विहीर ते पाणी टाकी साठी जाणारे अंतर्गत पाईप लाईन बऱ्याच ठिकाणी दोन ते अडीच फुटावर टाकण्यात आले. असे का विचारले विचारल्यास पाईपलाईनच्या वरच्या भागावर सिमेंट व काँक्रीटचे बांधकाम टाकायचे आहे. असे सागीतले गेले पण वरच्या भागावर सिमेंटचे कोणतेच काम करण्यात आले नाही. तसेच पाणीपुरवठा ते गावातील अंतर्गत पाईप लाईनही ही बऱ्याच ठिकाणी दीड ते दोन फुटावर करण्यात आले असे का विचारले आत्ता तुम्हाला काय करायचे करा असे उत्तर देत आहेत. तसेच योजना कोट्यावधी रुपयाची असल्यामुळे बऱ्याच कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप शंकर महाजन यानी करत सदरील कामाची चौकशी समिती नेमणुक करुन तक्रारदार यांना सोबत घेऊन चौकशी केल्यास अनेक भ्रष्टाचार बाहेर येईल असे ही आरोप शंकर महाजन यानी केली.आतातरी चौकशी समिती नेमणुक करून चौकशी करतील की गुत्तेदार याना पाठीशी टाकतील या कडे गावकर्याचे लक्ष लागले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कामाची यांची एम.बी करण्यात येऊ नये व चौकशी न करता बिल अदा केल्यास आपल्या कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना बिलोली च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा शंकर महाजन यानी जिल्हाधिकारी,जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी याना निवेदना द्वारे दिली आहे.