कंधार ; प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानशेवडी केंद्र फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आसल्या मुळे आदेशानुसार आज *दिनांक 06 मार्च 2021 रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय पोषण आहाराचे * धान्यादी मालाचे वाटप करण्यात आले.तसेच गावचे नुतन सरपंच, उपसरपंच, सदस्य,यांचा शाळेच्या व व्यवस्थापन समीती यांच्या वतीने शाल हार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावच्या सरपंच सौ गेनूबाई लक्ष्मणराव चव्हाण,प्रमुख पाहुणे उपसरपंच सौ कचरुबाई मोरे,कोंडीबा पाटील मोरे,तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य,फुलवळ केंद्राचे केंद्र प्रमुख श्री केंद्रे बि एन,शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष श्री साहेब अल्ली शेख , व्यस्थापण समिती सदस्य, व शाळेचे मुख्याध्यापक सौ यंबल एन जी, शाळेतील शिक्षक ,शिक्षिका,शा पो आ मदतनीस स्वयंपाकी,पालक विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी देशावर आलेल्या कोरोना संकटाचे भान ठेवून सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले व विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी शिस्तिमध्ये शालेय गणवेश व शालेय पोषण आहार धान्यादी स्वीकार केला.
सुत्र संचलन श्री मुंडे डि आर यांनी तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री ताटे डि के,श्री मरशिवने डी जी,श्री कैलास गरुडकर,श्री शिंदे पी वाय,श्री केंद्रे आर एन,सौ उमाटे ए आर,या सर्वांनी परीश्रम घेतले.