कुरुळा ;विठ्ठल चिवडे
कुरुळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली असून जिल्हा परिषद सदस्या शोभाताई गोमारे,सरपंच अंकिता गोमारे व उपसरपंच शिवदर्शन चिवडे यांच्या हस्ते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
कुरुळा सर्कलमध्ये जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार लोकसंख्या असून दुसऱ्या दोन सर्कल मधील
जनतेची आरोग्यसेवा पुरवणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. यावेळी पात्र लाभार्थी वय वर्षे साठ पेक्षा जास्त असणाऱ्या नागरिकांना लसीकरण करण्यात आले.सर्वप्रथम मा.उपसरपंच हरिहर पाटील,मा.सभापती कालिदास गंगावारे,संग्राम गुंडाळे आणि नागरगोजे यांनी ही लस घेतली.
आरोग्य कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांनी लस घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण जाधव व डॉ. कोमल तांदळे यांनी केले आहे. लसीकरण केंद्र सोमवार, बुधवार, शुक्रवार अशा तीन दिवशी सुरू राहणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे. या लसीकरण केंद्रास अनेकांनी संपर्क करून कोवीड ची लस घेतली आहे .
कुरुळा प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊपलब्ध कोविड लस या भागातील जनतेने घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण जाधव आणि डॉ. कोमल तांदळे यांनी केली आहे . यावेळी रमेश गोमारे, माझी सभापती कालिदास गंगावारे, माजी उपसरपंच हरिहर पाटील, संग्राम गुंडाळे, डॉ. सुरेश नागरगोजे, बळवंत पाटील, तानाजी नाईक, गणेश किरपणे, माधव किरपणे, गणेश पिनाटे यांची उपस्थिती होती.