शेतशिवार जळीत प्रकरणी तात्काळ आर्थिक मदत करा-भगवान राठोड

कंधार ; प्रतिनिधी

कंधार तालुक्यातील पानशेवडी व तळ्याचीवाडी परिसरातील आठ तांड्यावरी शेतीस आग लागून 2500 हेक्टर शती जळून खाक झाली आहे याचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी असे निवेदन तहसीलदार कंधार यांना भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी केले आहे.

दि ७ मार्च रोजी कंधार तालुक्यातील पानशेवडी व तळ्याच्या वाडी परिसरातील ढाकु तांडा,खेमा तांडा, रामा तांडा,या सह जवळपास सात ते आठ तांडा परिसरातील2500 हेक्टरच्या जवळ पास जळुन खाक झाली आहे.या आगीत शेतकऱ्यांचे प्रचंड 25हजार कडबा जळुन खाक झाला आहे. या आगीत   पशु प्राण्याचा ही मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे.काही भागात शेतकऱ्यांचे आवजारे ही जळुन खाक झाले आहेत.शेतकऱ्यांनी जनावरासाठी शेतात ठेवला असलेला कडबा पुर्णपणे जळुन गेला आहे तर परिसरातील गवत ही पुर्णपणे जळुन गेले आहे.आज जनावरांना चारण्यासाठी शेतकऱ्यांकडे काहीच शिल्लक राहीले नाही.त्यामुळे सदरील घटनेचा पंचनामा करुन या पिडित शेतकऱ्यांना अर्थिक मदत द्यावी.व जनावरासाठी जुलैय महिण्या पर्यंत छावण्या उभारण्यात यावे असे निवेदन तहसीलदार कंधार यांना देण्यात आले या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,कंधार भाजपा शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार,श्रीराम जाधव,फुलसिंग राठोड,भगवान राशिवंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *