महाराष्ट्र हळहळतोय…; दीपाली चव्हाण Deepali Chavan

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण Deepali Chavan आत्महत्याप्रकरणी निलंबित डीएफओ विनोद शिवकुमार याला धारणी न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ९ वाजता अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी सायंकाळी धारणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने तोंडातून ‘ब्र’देखील काढला नाही. शनिवारी त्याला प्रथम न्यायाधीश एम. एस. गाडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीश गाडे यांनी आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्याला कडक बंदोबस्तात धारणी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

आरोपी शिवकुमार याने दीपाली चव्हाण Deepali Chavan यांना गर्भावस्थेत जंगलात पायीव फिरविले. त्याचप्रमाणे शिवकुमारलादेखील वाहनातून न नेता पायीच न्यायालयात न्या, असा आग्रह वनविभागातील महिला कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी धरला. मात्र, जनसंताप पाहता शिवकुमारला पोलीस व्हॅनमधून आणण्यात आले.

शिवकुमारबद्दलचा संताप अनावर झाल्याने लोक शिवकुमार मुर्दाबादचे नारे गुंजले. न्यायालयाबाहेर एकच गर्दी झाली होती. कर्मचाऱ्यांसोबतच परिसरातील लोकही आले होते.

शिवकुमारमुळे दीपाली चव्हाण Deepali Chavan यांचा गर्भपात झाला. त्या आत्महत्येवेळी गर्भवती होत्या. त्यामुळे ते एक नव्हे तर तीन जीव जाण्यास जबाबदार आहेत. शिवकुमारला फाशीच द्यावी, अशी मागणी वनकर्मचाऱ्यांनी केली.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण Deepali Chavan यांनी आज व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दिपाली यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाकला जाणारा दबाव व मानसिक त्रासाला कंटाळून दिपाली यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत २०१५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या दिपाली चव्हाण Deepali Chavan या मराठवाड्यातील मूळ रहिवासी होत्या. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागात हरिसाल येथे गेल्या पाच वर्षांपासून त्या कार्यरत होत्या. एक कर्तव्यकुशल व तडफदार अधिकारी असलेल्या दिपाली चव्हाण Deepali Chavan दोन वर्षांपूर्वीच राजेश मोहिते यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्या होत्या. राजेश मोहिते हे अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळीचे मूळ रहिवासी असून अमरावती जिल्हा कोषागार कार्यालय येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत.

सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास दिपाली Deepali Chavan यांच्या निवासस्थानावरून गोळी झाडल्याचा आवाज आला. परिसरातील नागरिक, वन कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी धावत पोहोचले. यावेळी दिपाली चव्हाण Deepali Chavan रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. या घटनेची माहिती धारणी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. गोळी झाडण्यापूर्वी दिपाली चव्हाण Deepali Chavan यांनी नऊ पानांची चिठ्ठी लिहून ठेवली आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिपाली चव्हाण Deepali Chavan यांनी लिहीलेली चिठ्ठी जप्त केली आहे.

हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण Deepali Chavan यांनी वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. दीपाली चव्हाण Deepali Chavan यांनी मृत्यूपूर्वी तीन पत्रे लिहिल्याचे समोर आली असून यात त्यांनी आपल्या पतीला लिहिलेले भावनिक पत्र मन हेलावून टाकणारे आहे. पहिले पत्र वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांना, दुसरे पतीला आणि तिसरे आई शंकुतला चव्हाण यांच्या नावे लिहिले आहे. ही तिन्ही पत्रे धारणी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

दीपाली चव्हाण Deepali Chavan यांनी पती राजेश मोहिते यांना लिहिलेले पत्र अतिशय भावनिक आहे. हे पत्र जशास तसं…

प्रिय नवरोबा,
लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला पत्र लिहित आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जास्त कारण आता मी जीव देत आहे…
साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत. तू नेहमी म्हणतोस माझी हार्डडिस्क भरली आहे. खरंच भरली आहे. साहेबाने मला पागल करून सोडलंय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात… मी खूप सहन केलं पण, आता माझी लिमिट खरंच संपली आहे… यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण, सुट्टी देखील तो मंजूर करत नाही. तुझ्याशी बोलायला हवं होतं. मी तुझी वाट पाहत होते घरी यायची… आज आई पण गावी गेली. घरी कोणीच नाहीये. घर खायला उठत आहे. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर. जगातला सगळ्यात चांगला नवरा तू आहेस. माझ्यावर खूप प्रेम करतोस… मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्याचं त्रास देनं कमी झालं नाही.

मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं…मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचनं अर्धवट सोडून मी जात आहे… आपल्या संसाराला नजर लागली… माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण, आज मी तुला सोडून जात आहे. माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार विनोद शिवकुमार, उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे. त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे. आपला संसार अपूर्ण राहिला. पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस मीच कमी पडत आहे. माझी हार्डडिस्क फुटत आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. मला माफ कर. माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार शिवकुमार आहे

  • दीपाली…

दिवंगत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण Deepali Chavan यांना मी कायम सहकार्य आणि मदत केली आहे. त्यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत माझ्याबद्दल असलेला आदर प्रकर्षाने दिसून येतो. माझी पूर्ण चौकशी न करता केलेली बदली ही नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरोधात आहे, असा दावा दीपाली चव्हाण Deepali Chavan मृत्युप्रकरणात बदली करण्यात आले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी केला आहे.

रेड्डी यांना नागपूर येथे वन विभागाच्या मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी शनिवारी राज्याच्या वनबलप्रमुखांना आपली बाजू मांडणारे निवेदन सादर केले आहे. दीपाली यांनी रजा नाकारणे आणि वेतन थांबविणे याबाबत आरोप केला आहे. रजा मंजुरीचे अधिकार उपवनसंरक्षकांचे असतात, असे रेड्डी यांनी म्हटलं आहे. उपवनसंरक्षकांचे कार्यालयाचे स्तरावरून त्यांना मंजूर करण्यात आलेली रजा तसेच नामंजूर करण्यात आलेल्या रजेचा तपशील आपल्या निवेदनात त्यांनी मांडला आहे. त्यांचे वेतन किंवा भत्ते थांबविण्याचे निर्देशही दिले नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

चव्हाण यांची बदली मेळघाटबाहेर व्हावी यासाठी त्यांना सहकार्य केले होते. दीपाली यांनी अश्लील शिविगाळीबाबत लेखी तक्रार केली नव्हती. त्यांच्या तोंडी तक्रारीवरून विनोद शिवकुमार यांना तोंडी समज देण्यात आली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याशी क्वचित प्रसंगीच संबंध येत होता. अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात त्यांना कायदेशीर साहाय्य मिळावे म्हणून प्रयत्नदेखील केले होते. चव्हाण यांना मी कायम प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ अधिकारी म्हणून मी वेळोवेळी सहकार्य केले. असे असतानाही कोणतीही चौकशी न करता तडकाफडकी माझी बदली करणे हे नैसर्गिक न्यायतत्वाला धरुन नाही. त्यामुळे, पुनर्विचार करून माझी बदली रद्द करावी, असेही रेड्डी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

मेळघाटातील गुगामल वन्यजीव विभाग चिखलदराअंतर्गत हरिसालच्या वनपरिक्षेत्राधिकारी (आरएफओ) दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक (डीएफओ) विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांना नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांच्या तक्रारीवरून मध्यरात्री तीनच्या सुमारास धारणी पोलिसांनी शिवकुमार यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. वनविभागातच नव्हे तर, सोशल मीडियावरही ‘जस्टिस फॉर दीपाली चव्हाण’ Deepali Chavanअशी मागणी बुुलंद झाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एम. रेड्डी यांच्या भूमिकेविरोधातदेखील संताप व्यक्त होत आहे.
दीपाली यांनी त्यांच्या हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी छातीवर सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. दीपाली दोन
वर्षांपासून हरिसाल येथे कार्यरत होत्या. त्यांचे पती राजेश मोहिते (३०, रा. मोरगाव, जि. अमरावती) हे चिखलदरा येथे कोषागार कार्यालयात नोकरीला आहेत.

माझ्या मुलीला खूप दिवसापासून या अधिकाऱ्यांचा त्रास होत होता, DFO शिवकुमार हे अधिकारी नेहमीच घराबाहेर चकरा मारत होते आणि दीपालीला शिवीगाळ करत होते, त्यामुळे त्यांना कंटाळून माझ्या मुलीने हे पाऊल उचलले. त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी नाही दिली तर मला फाशी द्या’, अशी मागणी मृत दिपाली चव्हाण यांची आई शकुंतला चव्हाण यांनी केली.

दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी देखील या घटनेबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. त्यांनी असे म्हटले आहे की, ‘माझ्या पत्नीने वारंवार वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत सूचना दिल्या होत्या. सोबतच या प्रकारचे पत्रव्यवहारही केले होते. मात्र त्यांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. माझ्या पत्नीला शिवकुमार अधिकारी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करत होते, त्यामुळे तिने त्रस्त झाल्याने हे पाऊल उचलले.’

अमरावती जिल्ह्यात असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आरएफओ दीपाली चव्हाण Deepali Chavan या तरुण महिला अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावरून राजकीय वातावरण हळूहळू तापताना दिसत असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणावर भाष्य केले असून, नवनीत राणांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा Deepali Chavan जीव वाचला असता, असा दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर Rupali Chakankar यांनी ट्विट करून दीपाली चाकणकर यांनी नवनीत राणा Navnit Rana यांना टोला लगावला आहे. दीपाली चव्हाण Deepali Chavan यांच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली असून, या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी दीपाली चव्हाण Deepali Chavan यांच्या सुसाईड नोटमधील माहितीचा दाखला देत नवनीत राणा यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर माहिती जेव्हा दीपाली चव्हाण Deepali Chavan यांनी स्थानिक खासदार नवनीत कौर राणा यांच्या कानावर घातली तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो, असे ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला. विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला ज्याचा सविस्तर उल्लेख तिच्या पत्रात आहे. DCF शिवकुमार याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा ही प्रयत्न केला. तिला अपमानित केल जात होतं. वांरवार DCF शिवकुमार संदर्भात केलेल्या तक्रारींवर वन संरक्षक रेड्डी यांनी कारवाई का केली नाही त्यांनी जर कारवाई केली असती तर दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. DCF शिवकुमार व वनसंरक्षक रेड्डी दोघांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे

दीपाली चव्हाण Deepali Chavan यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ऑक्टोबर २०२०मध्ये आपण आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करु शकत नव्हते. भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही. त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरचा राग वाढत चालला असल्याचे दीपाली चव्हाण Deepali Chavan यांनी पत्रात म्हटले होते.

दीपाली चव्हाणच नव्हे तर ४ मार्च रोजी भंडारा जिल्ह्यातील लाखनीच्या बालविकास प्रकल्प अधिकारी शीतल फाळके या अवघ्या २८ वर्षीय अधिकाऱ्यानेही गळफास लावून घेत जीवन संपविले. या पाठोपाठ दीपालीची घटना घडली. या घटनांमध्ये महाराष्ट्र हळहळलाच परंतु वरिष्ठांबाबतच्या चिठ्ठीतील उल्लेखाने राज्यभरातील महिला अधिकारी संतापून उठल्या आहेत. एखाद्या पुरुष वरिष्ठाच्या त्रासापायी महिला अधिकाऱ्याने आत्महत्या का करावी? आज तिला तक्रार करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कायदे महिलांच्या बाजूने आहेत. वरिष्ठांकडे दाद मागूनही न्याय मिळत नाही तेव्हा वैफल्यातून काही जणी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत जातात. हे आता होऊ नये. कष्ट करून, खूप अभ्यास करुन अधिकारी पद प्राप्त करायचे आणि काही सहन झाले नाही म्हणून आत्महत्या करायची? नोकरवर्गातील शोषण, हा छळवाद थांबला पाहिजे.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
२८.०३.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *