कोरोना व्हॅक्सीनची गुढी

यंदाच्या मराठी नववर्ष गुढी पाडवा निमित्त कोरोना व्हॅक्सीनची गुढी सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारने रेखाटली आगरी-वेगळी गुढी…!

कंधार
गेल्या वर्षी पासून कोरोना वायरसने जगभर हैदोस घातला.त्यावेळ पासून जगभरातील संशोधकांनी आकाश-पाताळ एक करुन लस शोधण्याचा चंग बांधला.नोव्हेंबर-डिसेंबर-2020 ला यश भारतीय संशोधकांना या संसर्गजन्य आजार कोरोनावर कोव्हाक्सीन आणि कोविशिल्ड या दोन लसी यशस्वी झाल्या.सध्या देशभर लसीकरण सुरु आहे.पहिल्यां प्रथम कोरोना वाॅरियर्स त्यानंर दुसरा टप्पा साठ वर्षा पर्यंतच्या ज्येष्ठ नागरीकांना तर तिसरा टप्पा पंचेचाळीस वर्ष ते साठ वर्षां पर्यंत लसीकरण सुरु आहे.काल पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींजींनी म.फुले जयंती पासून भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्यंत “लस उत्सव” साजरा करण्याचे आवाहन केले.त्या अनुशंगाने सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारचे सुलेखनकार दत्तात्रय एमेकर गुरुजी, क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांनी अनोखी लसीची गुढी रेखाटून कल्पकतेचे उदाहरण देत,सृजनशील दर्शन दिले.
“लस उत्सव”

म.जोतीराव फुले यांच्या जयंती पासून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्यंत संपुर्ण भारतात लस उत्सवाचे आयोजन पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींच्या संकल्पनेतून

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार यांच्या कल्पनेतून कल्पक”सृजनशील गुढी”
व्हॅक्सीनची…..!
========≈===================≈=
मराठी नववर्षाचा चैत्र गुढी पाडवा…!
नमन करतो.
भारतीय संशोधकांना!
कोरोना प्रतिबंधित,
लस शोधल्याने!
स्वागत करतो,
मराठी नववर्षाचे,
गुढी पाडव्या दिनी,
लसीची गुढी उभारल्याने!

dattatrya yemekar


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
9860809931

2 thoughts on “कोरोना व्हॅक्सीनची गुढी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *