दत्तात्रय एमेकर यांच्या लेखनीतून
तू कोविड-19 वायरस।
प्रयोगशाळेत जन्मलास॥
तुझ्या वास्तव्याने मात्र
क्षीण प्रकृतीच खल्लास
रोग्यांनी दवाखाने गच्च
बेडचा दुष्काळ केलास
प्रेतांचा पडलाय खच
स्मशानात रांग ठेवलास
हात टेकले संशोधकांनी
डॉक्टरांना तर दमविलास
एचआयव्हीचे प्रमुख अस्त्र
वापरण्यास भाग पाडलास
कोरोना वाॅरियर्सचे कार्य
अखंडीत सुरु ठेवलास
तुझ्या संसर्गाच्या भितीने
बाधीत रुग्ण वाढवलास
जगास लाॅकडाउन करत
तू मात्र मोकाट सुटलास
फुप्फुसात घर बांथल्याने
ह्रदयाच बंद पाडलास
पुर्वी अस्पृश्यतेचे चटके
तू वर्तमानात दावलास
गरीब श्रीमंत हा भेद
तू संपुनच टाकलास
कधीच बंद न होणारे
देवतागृहे लाॅक केलास
संसर्गाच्या तर धास्तीने
झोप मात्र हिरावलास
मानवांचे खरे गर्वहरण
तू तर लिलया केलास
नाते रक्तांचे वा मित्रांचे
क्षणार्धात संपवलास
शाळा बंद झाल्या तर
निबंध कृतीत दावलास
परीक्षा बंद झाल्याने
मार्क्स गोठून टाकलास
मुंबई थांबवण्याचा दम
फक्त तूच दाखवलास
उद्योगधंदे व कारखाने
प्रत्यक्ष बंद पाडलास
सांग ना तू कधी जाणार
तुझे भ्याव मात्र आम्हास
तुझे अन् यमाचे तांडव
कधी होईल रे खल्लास
संशोधकांनी लस शोधली
अँटी बाॅडीज वाढविण्यास
लसीकरण धीम्या गतीने
कधी होशील तू खल्लास
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा