दोनशे जणांना मास्कचे वाटप ; भीमजयंती मंडळाच्या वतीने भोजनदान
नांदेड – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 130वा भीमजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात शहरातील प्रज्ञा करुणा विहार देगांवचाळ येथे संपन्न झाला. यावेळी परिसरातील दोनशे नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच भीमजयंती मंडळाच्या वतीने भोजनदान कार्यक्रमही घेण्यात आला. यावेळीडॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे विश्वस्त अॅड मा. मा. येवले, ज्येष्ठ नागरिक कामाजी थोरात, महानगरपालिकेचे माजी उपआयुक्त प्रकाश येवले, सामाजिक कार्यकर्ते रमेश गोडबोले, नगरसेविका ज्योत्स्ना गोडबोले, सुभाष लोखंडे, सविता नांदेडकर, निर्मलाताई पंडित, कल्पना ढेपे, शेषेराव गोडबोले, अशोक हाटकर, सिध्दार्थ ढेपे, स्वामी चेपूरी, माणिकराव वाघमारे, सुनील गोडबोले,
जागतिक बौद्ध परिषद बॅंकाॅक थायलंडचे ७५ वे प्रादेशिक केंद्र प्रज्ञा करुणा विहार समिती देगांवचाळ नांदेडच्या वतीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी भीमजयंती महोत्सव हा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यासाठी समितीच्या वतीने बैठक बोलावून भीमजयंती मंडळाची स्थापना करण्यात आली. भीमजयंती मंडळाच्या संपूर्ण कार्यकारिणीत तरुण पिढीला वाव मिळावा म्हणून अध्यक्ष पदी विकी सावंत, उपाध्यक्ष पदी बंटी लांडगे आणि कोषाध्यक्ष पदी माधव गायकवाड, सल्लागार प्रकाश दिपके, राजू गोडबोले, राजू गच्ची, अक्षय नरवडे, अक्षय पंडित, उत्तम गवारे, शोभाबाई गोडबोले, लक्ष्मीबाई नवघडे, कलाबाई नरवाडे, गिरजाबाई हिंगोले, जिजाबाई खाडे, सुमनबाई वाघमारे, छायाबाई थोरात, अॅड. नितीन थोरात यांच्यासह संपूर्ण पदाधिकारी पदी युवकांना संधी उपलब्ध करून देण्यात आली.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यालय येथे वार्डातील ज्येष्ठ नागरिक कामाजी थोरात यांच्या शुभहस्ते आणि आयु प्रकाश येवले, सुभाष लोखंडे, अशोक हाटकर, सिध्दार्थ ढेपे, स्वामी चेपूरी, माणिकराव वाघमारे सुनील गोडबोले यांच्या उपस्थितीत निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर प्रज्ञा करुणा विहार येथे प्रथमतः डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून समितीचे सचिव तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे विश्वस्त अॅड मा. मा. येवले यांच्या शुभहस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महानगरपालिकेचे माजी उपआयुक्त प्रकाश येवले, सामाजिक कार्यकर्ते रमेश गोडबोले, नगरसेविका ज्योत्स्ना सुभाष लोखंडे गोडबोले, सविता नांदेडकर, निर्मलाताई पंडित कल्पना ढेपे शेषेराव गोडबोले यांच्या उपस्थितीत त्रिशरणं पंचशीलाचे सामुदायिक पठण करण्यात आले.
यावेळी कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून अरविंद ढगे यांनी २०० नग मास्क वाटपाचा निर्धार केला हे मास्क महानगरपालिकेचे माजी उपआयुक्त प्रकाश येवले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी अॅड मा. मा. येवले यांनी देगांवचाळीच्या सामाजिक धार्मिक आणि राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतला तर रमेश गोडबोले यांनी कोरोना महामारीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३० वा जयंती महोत्सव साधेपणाने साजरा करण्यामागील उद्देश आणि भीम जयंती मंडळाच्या वतीने सामुहिक भोजनाचे आयोजन केल्याचे सांगून सर्वांनी आनंदाने सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुभाष लोखंडे यांनी केले.