कंधार ता.प्रतिनीधी
खासदार सुधाकर श्रंगारे यांना निवडून येऊन दोन वर्षे झाली पण लोहा-कंधार मतदार संघाला कोरोना काळात मात्र त्यांनी वाऱ्यावर सोडला असुन दोन वर्षे च्या काळात दोन वेळा तरी ते मतदार संघात फिरकले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा संचालक कृ.उ.बा.स राजकुमार केकाटे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
लोहा-कंधार मतदार संघाने भाजपाच्या खा.सुधाकर श्रंगारे यांना भरघोस मतांची लिड दिली.परंतु ह्या खासदार महाशयानी मतदारांची घोर निराशा केली आहे.जगात कोरोणा माहामारीने थैमान घातले असून या महामारीत लोहा-कंधार मतदार संघातही असंख्य कोरोना रुग्ण असून अनेकांना सोयसुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. कोरोना महामारीत शकडो रुग्ण या बिमारी चे शिकार ठरले त्यात कित्येक जनांना आपले प्राण गमवावे लागले मात्र खा.सुधाकर श्रुंगारे साधे मतदार संघात फिरकले पण नाहीत.
मतदार संघात बेरोजगार,पाणी टंचाई ,आरोग्य यासह शकडो प्रश्न, अडचणी आहेत त्यातल्या त्यात विद्युत,कृषी,
रस्ते,निराधारांना वेळेवर अनुदान अशा महत्वाच्या अनेक प्रश्न मतदार संघात आहेत. खा.सुधाकर श्रृंगार यांना कसल्याच प्रकारचे देणेघेणे दिसुन येत नाही त्यांनी कोरोना महामारीत नागरीकांना रामभरोसे सोडले असल्याची टिका राजकुमार केकाटे यांनी आपल्या पत्रकातून केली आहे.