कंधार ; प्रतिनिधी
कोरोना विषाणुचा जगभर थैमान सूरु असतांना आपल्या देशात राज्यात जिल्हा व तालुक्यात रौद्ररूप धारण केले. ही नाजूक परिस्थिती लक्षात घेऊन श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटी ता. कंधारचे अध्यक्ष, प्रा. डॉ. भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. मन्याड खोऱ्यातील विद्रोही विचारवंत, शे. का. पक्षाचे निष्ठावंत नेते, संस्थापक व संचालक, माजी खासदार व आमदार जे. स्वातंत्र्य सेनानी, मुक्ताईसुत डॉ. भाई केशवरावजी घोंडगे यांच्या जन्म शताब्दीनिमित्त विविध उपक्रम हाती घेवून हा शतकमहोत्सव साजरा करण्यास आरंभ संत योगिराज निवृती महाराज यांच्या पुण्यभुमित सेलू पेंडू येथे जानेवारी २०२० ला आरंभ झाला आहे. पण दोन महीण्या नंतर कोराना महासंकटात अख्ख जग होरपळले त्यानंतर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले.
श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटी, कंधारच्या वतीने कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीत रुपये १ लाखाचा धनादेश मा. ना. अशोकरावजी चव्हाण साहेब यांना दिला. प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी जंगमवाडी पाटी जवळ विव्हळत पडलेल्या एका महिलेला मा. जिल्हाधिकारी साहेब, नांदेड यांना फोनवर बोलून त्या महिलेस दवाखान्यात दाखल केले. कंधार-लोहा येथील सर्व डॉक्टरर्स, पॅथॉलॉजिस्ट, अंब्युलन्स चालक यांना सुरक्षा किटचे वाटप पहिल्यादा करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. गरजू व्यक्तींना संकट समयी योग्य ती मदत केली. गावात लहान मुल क्रिकेटचा चेंडू किंवा बॅट यासाठी आवडीने त्यांना मदत केली. अनेक गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक, त्यांची परिस्थीती पाहून मदत केली. सोनखेड येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्या नराधमाचा निषेध करून त्या पिढीत बालीकेच्या वडीलांना श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटी कंधार या संस्थेतील शाखेत नोकरी दिली व त्यातून समाजिक बांधिलकी दाखवून दिली.
कृतीत आणुन आधार देत महाराष्ट्रात एकमेव उदाहरण कृतीने दाखवले. लोहा तालुक्यात जाणापुरीचे शहीद संभाजी यशवंत कदम या भारतीय शूर शहीदांचे स्मारक श्री शिवाजी विद्यालय, सोनखेड ता. लोहा येथे उभारून देशभक्तीच्या प्रेरणेचा अखंड झरा निर्माण करून शहीद प्रती कृतज्ञता व्यक्त केली. केपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी भरीव मदत करून कंधार प्रिमियम लिग यशस्वी केले.
त्यानंतर देशात करोनाची दुसरीलाट सुरु झाली. कंधार व लोहा तालुक्यातील कोविड़ सेंटरला उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त व्यक्तीना व नातलगांना व रुग्णालयातील पूर्ण कर्मचाऱ्यांना डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या जन्म शताब्दीनिमित्त्याने १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गरजूना सकस आहार म्हणजे “भाऊचा डबा” हा उपक्रम सुरु केला. या भाऊच्या डब्यात पोळी, भाजी, राईस, बॉईल अंडा, मटकी, बिट असे पौष्टीक पदार्थ व दररोज नवनविन पदार्थ देवून रोगप्रतिकारक शक्ती वाढावी व रुग्ण लवकर बरे व्हावेत म्हणून हा उपक्रम सुरू आहे. डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कारोना काळ संपताच शतकपूर्ती न भुतो न भविष्यती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रा. डॉ. पुरुषोत्तमराव धोंडगे, अध्यक्ष श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटी, ता. कंधार तथा माजी जि. प. सदस्य, नांदेड यांनी सांगितले.
या सोबतच कोरोनामहामारीत ज्या ज्या कुटुंबातील व्यक्तीचे जीवन संपले आहे अश्या कुटुंबातील एक हजार पाल्याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटी, कंधार घेणार आहे.