निसर्ग विरुद्ध माणूस _ सुतोवाच …..भाई गुरुनाथराव कुरुडे (माजी आमदार)

:
सुमारे दिड वर्ष होत आले, या महामारी कोरोणा ला सुरुवात होऊन त्यामुळे आमची राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व कामे दौरे बंद आहेत, दररोज घरीच बसून दारेबंद करून थांबने त्यामुळे फारच अवघड झाले आहे. आमचे नेते व राजकीय गुरू डॉ. भाई केशवराव धोंडगे यांनी दिलेल्या आदेशानुसार सतत जनता संपर्क, शैक्षणिक संस्थांशी संबंध भेटीसाठी व राजकीय जनतेची कामे करणे सर्व सोडून घरीच फक्त आणि फक्त बसून राहाणे। किती अवघड!!


बाहेर गावी सुध्दा जाणे बंद मग वेळ कसा घालवायचा ?
पहिले काही महीने प्रमुख चरित्रांची पुस्तके, कथा संग्रह, कादंबऱ्या काही मोठ्या नेत्यांचे चरित्रे वाचुन घालवली,त्यामुळे वेळ कसा बसा गेला. आता त्यालाही कंटाळा आला वृत्तपत्रे ही किती वेळ वाचायचे?
त्यामुळे माझे सहकारी मित्र व खरे सेवक निलेश अशोक गायकवाड याला सारखा म्हणत होतो, काय करावे बसून नुसता वेळच जात नाही तेव्हा तो म्हणाला, तुम्ही लिखाण करू शकता तेव्हा ते काम करा, मी म्हणालो कसले लिखाण करू आमच्या विरोधी पक्षात राहून केलेल्या जनतेच्या कार्याचा आढावा काही पाने लिहून काढाले व ते साप्ताहिक जय क्रांती ते भाई धोंडगे साहेबांनी छापले त्याचा चांगलाच उपयोग झाला. तेव्हा निलेश म्हणाला आता तुम्ही तुमचा कोरोना च्या संकटावर काहीतरी लिहा, बस्स् ठरवलं लिहीवे मी पडलो डॉ.भाई केशवराव धोंडगे यांचा कट्टर शिष्य पुरोगामी, मार्क्सवादी निरइश्वरवादी विचारांच्या धोरणाची कस
असणारे लिखाण हवे म्हणून हा लिहीण्याच्या प्रपंच सादर करीत आहे .आज बुद्ध पौर्णिमा याच तारखेला भूमिपुत्र तथागत भगवान बुद्ध जन्मले .

बोध गया


याच वैशाखी पौर्णिमेला त्यांना ज्ञानाचा साक्षात्कार झाला. वयाच्या 80व्या वर्षात कुशीनगर येथे त्यांचा देहवासन झाले. अशा तीन गुणाने ही वैशाखी बुद्ध पौर्णिमा आणि या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मी हे लिखाण करीत आहे.
कंधारच्या शासकीय आहे हायस्कूलमध्ये आम्ही शिकत असताना ,नव्या व दहाव्या वर्गाला भूगोल शिकवणारे कंधारचे गुरूजी त्यांचे नाव श्री रंगनाथराव महाराज कंधारच्या साधु महाराज संस्थान चे जवळ चे नातेवाईक भूगोलचा पाठ घ्यायचे रंगनाथराव गुरुजी यांची अशी त्यांची वेगळीच ख्याती होती.त्यावेळी ते शिकवताना नेहमी उदाहरण द्यायचे की ,जगातील निसर्गाची एवढी विराट शक्ती आहे ,की त्यापुढे मानवाला हात टेकावे लागतात .अशा अर्थाची म्हण ते नेहमी म्हणत,” मानवाने निसर्गावर केलेली मात व निसर्गापुढे त्याने टेकलेले हात” म्हणजे निसर्गाची शक्ती अगाधच आहे .त्यात शंका नाही त्यामुळे त्या शक्तीपुढे मानवाला केव्हातरी हात टेकावे लागतात त्यावेळी आम्हाला ते पटायचे ही परंतु, जगात विज्ञान (सायन्स )व इतर शास्त्रज्ञ एवढी समृद्ध झाली की, अफाट अशा निसर्गाच्या कोरणा साथीला आटोक्यात येत आहे,हे महान कार्य मानवाने आज जगात करून दाखवले आहे. निसर्ग म्हणजे काही लोक त्यास देवी शक्ती म्हणतात ,आम्ही त्यास पंचमहाभूतांची शक्ती असलेला निसर्ग म्हणतो ,मानव व निसर्गात अखंडपणे संघर्ष चालूच असतो .साथीचे रोग उदाहरणात कोरणा पूर्वी प्लेग, कॉलरा आईमहामारी असे भयानक रोग व प्रचंड वादळे येऊन गेली .त्यामुळे प्रचंड मानवाची सहार झाला, हा इतिहास आहे .मी चौथीत असताना मरीआईचा गाडा कॉलरा महामारी समक्ष पाहण्याचा अनुभवण्याचा योग आला .आमचे बहादरपुरा गाव तीन ते चार हजार लोकसंख्या वस्तीचे होती ,परंतु या महामारी ने दररोज पाच ते सात पर्यंत लोकांचा मृत्यू होत असे, माझे शेजारी विठ्ठल आंबेकर मित्र राहतो त्याच्या आईला या महामारी ने गाठले आणि सकाळी या रोगाची लागण झाली, तर संध्याकाळपर्यंत त्यांच्या आईची मौत झाली .त्या एका दिवशी या साथीच्या रोगाने सात ते आठ लोकांना संपवले ,त्यामुळे विज्ञानाची एवढी प्रगती झाली नव्हती. त्यामुळे खाजगी आयुर्वेदिक औषधाने काहीच झाले नाही. आमच्या गावातच शंभरावर लोकांचा बळी गेला .त्याआधी प्लेग या साथीचा रोगाने असाच कहर केला.उंदरावरील जंतूंमुळे प्लेग व्हायचा बगलेत गाठ आली की दोन दिवसात मृत्यूच ,म्हणून गावेच्या गावे गाव सोडून रानात झोपड्या घालून महिना-महिना राहिले.

या सर्व रोगामुळे मानवात जागृती निर्माण झाली व विज्ञानाच्या साह्याने यावर मात जगातील अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनाने केले .व त्या बिमारीवर यांना पुरेपूर शोध घेऊन त्यावर उपाय केला .लस तयार केल्या त्यामुळे या रोग रोगाचा नायनाट झाला. तेव्हापासून मानवाची महति वाढली .निसर्गावर मात करण्याची शक्ती त्याने आपल्या बुद्धी चातुर्याने प्लेग ,कॉलरा ,देवी गोवर अधीर रोगांवर लशी तयार करून मुल जन्मताच त्यांना ती दिल्यावर तो रोग कायमचा पसार झाला. त्यावेळी मरीआईचा गाडा गावा बाहेर सोडणे देव-देव करणे यापेक्षा दुसरा उपायच नव्हता असो, वरील उदाहरणे साथीच्या रोगासाठी दिली आता आटोक्यात आणण्याचे काम मानवानेच केले आहे. म्हणून तो निसर्गापुढे हात टेकून बसला नाही ,आज कोरोना ने प्रथम चीनमध्ये पदार्पण केले कोणत्यातरी जनावर अथवा पक्षावर या रोगाचे विषाणू तयार झाले, व चीनमध्ये हाहाकार माजवून हजारो लोकांचा बळी गेला .त्याला अमेरिकेने दोष दिला .कोरोना चा विषाणू त्यांनी तयार केला असून ,जगाला किंवा आपल्या विरोधी शक्तीला नष्ट करण्यासाठी त्याचा वापर करीत आहे. असा आरोप झाला हजारो लोकांचा बळी चीन मध्ये घेतल्यावर कोरोना ने अमेरिका ,इंग्लंड ,फ्रान्स ,जपान व भारत आधी सर्व जगभर या रोगाने हाहाकार सुरू केला आहे .यावर मात करण्यासाठी शास्त्रज्ञ, वैज्ञानिक संशोधक तातडीने संशोधनाच्या कामात गुतले, व या कोरोणाला संपवण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू केला. या रोगाने चीननंतर अमेरिका इंग्लंड,ब्राझील आदी देशात धुमाकूळ घातला, त्यात आपला भारत देशात सुद्धा या कोरोना च्या महामारी ने लाखो चा बळी घेतला .व अजूनही चालूच आहे. परंतु मानव हे नुसते पाहत बसून निसर्गापुढे हात टेकले नाही, तर नवनवीन औषधांच्या संशोधन घेत त्यावर मात करण्याचे प्रयत्न अहोरात्र चालू आहेतच. आपल्या भारतात या महामारी ने गेल्या दीड वर्षात पूर्वी प्रवेश केला .व देशातील सर्वच राज्यात काही अधिक हजारोंचा बळी घेतला .सध्याही चालूच आहेत या महामारी ने स्वतः मलाही घेतले दि.2 फेब्रुवारी 2021 रोजी मला असलेल्या साखरेच्या बिमारीला नेहमीप्रमाणे तपासणीस गेलो असताना ,डॉ तळेगावकर यांनी मला तातडीने डॉ. कागदे साहेबांकडे पाठवून तपासणी करण्याची सूचना तिथे एक व तपासणी करताना डॉ.व्यंकटेश काब्दे त्यांना कोरोना या आजाराचा संशय आला .त्यांनी सिटीस्कॅन केला आणि त्यात (१२चा स्कोर) कोरोणा झाल्याचे आढळले. त्यांनी ताबडतोब यशोसाई हॉस्पिटल नांदेड येथे पाठवून प्रवेश दिला .व तेथे डॉक्टररांनी सविस्तर सूचना केल्या. दिनांक 02 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी मला दवाखान्यात दाखल करून घेतले त्या ठिकाणी आमचे अधिक्षक सुर्यकांत कावळे यांनी बरीच धडपड केली.इलाज सुरू केला मला धक्का बसला कारण साखरेची बिमारी व ब्लड प्रेशर मला गेली पंचवीस तीस वर्षापासून आहे.शिवाय सध्या वयाची 90 वय सुरू आहे .त्यामुळे मला जगण्याची आशाच वाटत नव्हती. परंतु आजकालचे संशोधन उपचार पद्धती यावर विश्वास ठेवणाला. त्यात प्रमुख डॉक्टर आमच्या शाळेतील पूरणशैट्टीवार बाई चे चिरंजीव डॉ. पुद्रोड त्यांनीही भेटून धीर दिला. व पहिली रात्र कशीबशी काढली. सर्वच बाबी माझ्या दृष्टीने सोईच्या भेटल्या मीही मनाचा ठाम विचार केला ,आणि इलाज सुरू झाला, मी सकाळचा अर्धातास नेहमी प्रमाणे व्यायाम, प्राणायाम वगैरे सुरू ठेवला .त्रास खूप खूप झाला.माझे जवळचे नातेवाईक आणि माझे दोन मावसभाऊ याच कोरोणा महामारीत निधन झाले.मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले, सिंगल रूम असल्याने कोणी सोबत नाही .त्यावेळी दवाखान्यात जास्त गर्दी नव्हती कसेबसे चार दिवस काढले ,माझा विश्वास आजच्या शास्त्रज्ञ संशोधनावर होताच व मी नक्कीच बरा होईल! याची खात्री बाळगली चौथ्या माळ्यावर रूम मध्ये एकटाच शेजारी कोणी नाही अशावेळी माझा खरा सेवक निलेश गायकवाड तो दररोज दिवसातून दोन वेळा भेटून जायचा आणि मला धीर द्यायचा त्या अवस्थेत माझी सेवा ही त्यांनी केली .त्यामुळे बरे वाटले, त्यांच्यासोबत आमचे ड्रायव्हर श्री बळीराम पाटील पेटकर होते .हे दोघेही माझा मुलगा दत्तात्रय कुरूडे यांच्या घरून सकाळी चहा नाश्ता आणि जेवण व्यवस्थित व वेळेवर पुरवठा केला.

पाचव्या दिवशी सविस्तर तपासणी केल्यावर त्यात कोरणा निल झाल्याचे समजले ,व मला सायंकाळी दि. 07/02/2021रोजी सुट्टी दिली .नांदेडला दत्तात्रेय कुरुडे मुलगा याच्या घरी गेलो .तेथे आमचे स्वागत झाले व तिथून गावाकडे आलो येथे गावकरीही वाट पाहत होते, सरपंच व सर्व प्रमुख यांनी येथे ही स्वागत केले .घरी प्रयाण केले .असा आमचा कोरोना चा प्रवास झाला.त्रास खूप झाला वीकनेस तर भयंकर आलं होतं .परंतु कोरोना वर मात केल्याचा आनंद मनात होता. आज उत्तम प्रकृतीत आहे. या मागे माझे धाडस व जगण्याची इच्छा व जनताजनार्दन यांचे आशीर्वाद होते व आहेत .म्हणूनच मी बरा झालो तेही नवदित विशेष आहे .यानंतर या रोगाचे प्रतिकार लस दोन डोसही मी घेतले.हा प्रकार सुद्धा मानवानेच निसर्गावर मात एक केली असा होत नाही? माणसे हजारो मेली अजूनही मरत आहेत .परंतु कोरोणाला कायमचे समाप्त करून जगण्याचा चंग मानवानेच केला. व करीत आहेत हा मानवी विजय नव्हे का ?
यामहा मारीच्या धाम सुमित भारताच्या पूर्व दिशेला
“तोक्ते “नावाचे भयानक वादळ आले शास्त्रज्ञांनी तारीख वेळेसही जाहीर केले .त्यामुळे त्या भागातील शासनाने जनतेचा बचाव करण्याचे अनंत प्रयत्न केले. त्यामुळे मानवी संहार कमी झाला. घरांची पडझड हे तेथील नुकसान बरेच झाले. त्याबद्दल महाराष्ट्र शासन व गुजरात सरकारने शक्यतो जनतेची सोय करून कमीत कमी मानव हानी कशी कमी होईल याचा प्रयत्न केला, झालेल्या पडझड नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी समक्ष पाहणी करून त्यांची पंचनामे करून त्यांना मदत केली जात आहे. परवा दुसरे “साया “नावाचे अशीच वादळ भारताच्या पश्चिम किनार्‍यावर आदळले. पश्चिम बंगाल ,छत्तीसगड ,ओडिशा आधी राज्यात फार मोठा धक्का बसला नुकसान भरून न येणारे झाले परंतु ,याची माहिती शास्त्रज्ञांनी आधीच जाहीर करून या दोन्ही वादळाचे स्वरूप काळ वेळ वगैरे आकडे वारी माहिती प्रसिद्ध केल्याने त्या त्या राज्यांनी मानवी संहार कमीत कमी कशी बळी पडतील याचा प्रयत्न करून सोई केल्या, त्यामुळे मानवी बळी कमी झाले बाकी नुकसान बरेच झालेआहे, परंतु शास्त्रज्ञांच्या संशोधनात वादळाची माहिती ,तारीख वेळ व त्याचा प्रथम आदेश दिल्याने मानवी मृत्यूचे नुकसान कमी झाले. इथेही मानवाने निसर्गापुढे हात टेकले नाही .कोरोणाच्या महामारी होऊन बऱ्या झालेल्या काही जणांना नवीनच ब्लॅक फंगस काळी बुरशी रोग” म्यूकरमायकोसेस” यारोगामुळे उडवून दिली, त्यामुळे बऱ्याच जणांचे बळी गेले ,व जात आहेत परंतु त्यावर या औषधाचा शोध केला .असून त्या रोग्यांना मोफत उपचार चालू असून मृत्यूची सुटका कमी करण्याचे शक्तीचे प्रयत्न मानवाचे चालूच आहेत .येथेही मानव आणि निसर्ग पुढे हात टेकून शांत राहण्याचे काम केले नाही. त्यावर मात करण्याचेही प्रयत्न होत आहेत ही मानवाची बौद्धिक शक्ती वरचे वर वाढतच राहणार यात शंकाच नाही. त्यामुळे जसे की प्लेग कॉलरा, देवी पोलिओ ,गोवर अशा भयंकर रोगावर मात करून त्यावर लशी तयार केल्याने त्या दिवशी जन्मलेल्या सर्व मुलांना दिल्याने तुरुक कायमस्वरूपी संपुष्टात आलेला आहे .तीच परिस्थिती कोरोना व म्यूकरमाकोसिस रोगाची पण होणार आहे. नक्की एकंदरीत निसर्गाच्या कोपा पुढे मानवाने कायमचे हात टेकून शांत राहण्याचे काम केले नाही तर, त्यावर मात करण्याचा हाच प्रयत्न अजूनही चालू आहे .मानवाची शक्तीही कमी झाली नसून ती वरचेवर वाढतच आहे याचे समाधान वाटते..
जय क्रांती..!


भाई गुरूनाथ कुरूडे
स्वातंत्र्यसेनानि
( माजी आमदार व माजी, सभापती पं.स.कंधार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *