नांदेड – बुद्ध, धम्म आणि संघ जगात महान आहेत. भिक्खू संघ ही पुण्याची शेती आहे. संघ जगभरात बुद्ध धम्म पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. बुद्धाचे तत्वज्ञान अंगिकारल्यास माणसाचा सर्वांगीण विकास होतो. बुद्ध विचारानेच जीवनात क्रांती होईल असे प्रतिपादन येथील युके ट्रिनीटी वर्ल्ड युनिव्हर्सिटीचे मानद कुलपती डॉ. सिद्धार्थ एम. जोंधळे यांनी तालुक्यातील खुरगाव येथे केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो, भंते संघरत्न,भंते चंद्रमणी, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते शिलानंद, भंते सुनंद, भंते संघमित्र, भंते सुमेध, भंते सुदत्त, भंते सुजात, भंते शिलभद्र, भंते सुगत या भिक्खू संघासह डॉ. शुद्धोधन गायकवाड, ऋषिपठणचे सचिव माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले, सुरेखा इंगोले, रेखाताई मस्के,धम्मसेवक गंगाधर ढवळे, पिंपळगाव कोरकाचे सरपंच दामोदर निवडंगे, एस. एच. हिंगोले यांची उपस्थिती होती.
तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे भदंत सत्यशिल महाथेरो यांच्या पुण्यानुमोदनाचा, बुद्ध जयंतीनिमित्त डॉ. सिद्धार्थ जोंधळे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमामाता आंबेडकर तसेच भदंत सत्यशिल महाथेरो यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बुद्ध , धम्म आणि संघ वंदना तसेच परित्राण पाठ विधिवत गाथा पठण भिक्खू संघाच्या वतीने घेण्यात आले. उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना त्रिसरण पंचशील देण्यात आले. पुढे बोलताना डॉ. जोंधळे म्हणाले की, खुरगाव हे बौद्ध धम्म प्रसाराचे एक महत्त्वाचे केंद्र बनत चालले आहे. लवकरच ते जागतिक केंद्र बनेल. डॉ. शुद्धोधन गायकवाड म्हणाले की, ऋषिपठणच्या माध्यमातून इथे फार मोठे ऐतिहासिक कार्य घडत आहे. अनेक बौद्ध उपासक उपासिकांना येथे मनःशांती लाभते तसेच वैचारिक विकास घडून येतो. धम्मगुरू भदंत पंय्याबोधी यांचे अनेक संकल्प यशस्वी होवोत अशी कामना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपासिका सुरेखाताई साहेबराव इंगोले यांनी भिक्खू संघाला आणि उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना भोजनदान दिले. तत्पूर्वी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. गायक कलाकार, वाद्यवृंदांनाही सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सुभाष लोकरे आणि संचाचा भीमबुद्ध गीतगायनाचा प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सिद्धांत इंगोले, अपेक्षा इंगोले, चंद्रमणी निवडंगे, केशव खिराडे, मोहन ठाकूर, खाजामियाँ, भुजबळे, कावळे, सोनकांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मसेवक गंगाधर ढवळे यांनी केले तर आभार एस. एच. हिंगोले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी आप्पाराव नरवाडे, नागोराव नरवाडे, भीमराव नरवाडे, कृष्णा नरवाडे राजरत्न नरवाडे, आकाश नरवाडे, राहुल नरवाडे, उमाजी नरवाडे रामा नरवाडे, सुरेखा नरवाडे, अनिता नरवाडे, कपिल नरवाडे आदींनी परिश्रम घेतले.
यांनी केले भिक्खू संघाला आर्थिक दान