कंधारचे योगगुरु नीळकंठ मोरे योगसाधनेतून उर्जा पुरवणारे रसायन

वाढदिवस विशेष


खरं तर माझ्या भावना प्रत्यक्ष भेटुनच व्यक्त कराव्यात असं ठरवलं होतं, पण कोरोनाच्या या वातावरणात प्रत्यक्ष भेटीत सविस्तर बोलणं होणार नाही यामुळे पत्रस्वरुप मनोगत.
आदरनिय सर मी आपणास अनेक दिवसापासुन म्हणजे जवळ जवळ 2004 – 05 पासून योगगुरु म्हणून ओळखतो…
आपण बालाजी मंदिर कंधार, माईचे मंदिर कंधार येथे योगशिबीर घेत असताना मी मित्रांसमवेत उत्सुकता म्हणुन योगशिबीराला हजेरी लावत असे…
परंतु 5 ते 10 मिनिटे कपालभाती व अनुलोम – विलोम या पलीकडे योग करण्याचा योग काही जुळलाच नाही. तसा मी नियमीतपणे तीन चार कि.मी. चालणे व वरिलप्रमाणे योग करत असे परंतु शरीर हलकं फुलकं राहण्यापलीकडे काहीतरी फायदा होतो हे माहितही नव्हतं…
पण सुदैवाने एक दीड महिन्यापुर्वी आमचे स्नेही, जे मला नेहमीच योगाबाबत तसेच सकारात्मक, निरोगी, निरामय जीवनासाठी प्रोत्साहन देतात ते मा.बालाजीराव पांडागळे सर यांनी आपल्या Yoga Google meet या ग्रुपमध्ये समाविष्ट केले.
कोरोना महामारीची भीती म्हणा किंवा खुप वेळ रिकामा असल्याकारणाने म्हणा मी पुर्ण वेळ आपल्या योगवर्गाला उपस्थित राहिलो, पुर्ण योग प्रकार आपल्या बरोबरीने करण्याचा प्रयत्न केला अन् मला आश्चर्यकारक फरक जाणवला…
माझ्या पोटावरील चरबीमुळे मी पुर्वी करत असलेली शर्ट- ईन करणे बंद केले होते, पण आता पोटावरील चरबी कमी झाल्यामुळे पुन्हा शर्ट ईन करण्यास मला अवघडल्यासारखे वाटत नाही. 96 ते 98 असणारा आॉक्सीजन आता 97 ते 99 राहतो आहे,
काळवंडलेला चेहरा आता टवटवीत वाटतो आहे.
योगवर्ग सुरु करण्यापुर्वीचा व योगवर्ग चालु झाल्यानंतचा असे दोन फोटो पाठवत आहे. फरक स्पष्ट दिसतो आहे…
मी तर म्हणेन पुर्वीच्या काळी ज्या प्रमाणे ऋषी मूनी आश्रम चालवायचे त्याप्रमाणे आपण तीनशे खाटांचं मोफत आॕनलाईन आरोग्यालय चालवत आहात..
आपल्या या योगवर्गात दररोज 90 ते 100 योगसाधक नियमीतपणे योग करत असुन त्यांच्या कुटुंबातील किमान तीन ते चार जन निरोगी जीवनाचे धडे गिरवत आहेत…
केवळ शारिरीक आरोग्यच नव्हे तर मानसिक, सामाजिक आरोग्य जपण्याच्या दृष्टीने योगसजगते सोबतच आहार, विहार, व्यसनाधिनता याबाबत सजग करत आहात.
कोरोनाच्या भीतीदायक, काळ्याकुट्ट वातारणात आत्मविश्वासाच्या तळपत्या सुर्याचा लख्ख प्रकाश दाखवत आहात.
आपण योगसाधकाला समजेल अशा सोप्या भाषेत संवाद साधुन योगसाधकाला योगसाधना करण्यासाठीची साधना सांगत आहात.
असाच योगवर्ग नियमित चालु राहावा व माझ्या सारख्या असंख्य योगसाधकाला योग समजण्याची संधी मिळावी. या शुभकामनेसह आपले शतश: आभार मानतो.
आणि उद्या आपणास वय वर्षे 50 पूर्ण होत असल्यामुळे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.निरोगी निरामय आरोग्य लाभो.🙏

आपलाच योगसाधक
बळवंत मंगनाळे, आशीर्वादनगर नांदेड
मो.नं.9730397491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *