यावेळी आ. शिंदे यांनी विविध विषयावर प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधला, बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळेत पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश आ. शिंदे यांनी दिले, लोहा, कंधार तालुक्यतील बँक अधिकाऱ्यांनी पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण न केल्यास त्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचा सज्जड इशारा आमदार शिंदे यांनी बैठकीत बोलताना दिला. शेतकऱ्यांना पेरणी अगोदर पीक कर्ज वाटप करण्यास सर्व बँकांनी प्रथम प्राधान्य द्यावे अशा सूचना यावेळी बँक अधिकाऱ्यांना आ. शिंदे यांनी दिल्या, लोहा व कंधार तालुक्यात सोयाबीन व कापूस बियाणे इतर पिकांचे सर्व बी-बियाणांचा मुबलक साठा व खतांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे कंधार व लोहा तालुका कृषी अधिकारी यांनी बैठकीत बोलताना दिली, कोणत्याही परिस्थितीत बी- बियाणे व खतांची ब्लॅक मार्केटिंग होणार नसल्याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी व खत,बी- बियाणांची चढ्या दराने विक्री झाल्यास व ब्लॅक मार्केटिंग झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल असा सज्जड इशारा आमदार शिंदे यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना बोलताना दिला. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील लोहा व कंधार तालुक्यतील काही सार्वजनिक विहिरींची कामे होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कंधारचे उपविभागीय पाणीपुरवठा अभियंता डिकळे यांचा आढावा बैठकीत आ .शिंदे यांनी समाचार घेतला ,कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठ्याची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा अन्यथा कारवाईला सामोरं जा असा सज्जड इशारा आमदार शिंदे यांनी अधिकाऱ्यांना बोलताना दिला, या बैठकीत नवीन विहीर ,नवीन बोअर ,अधिग्रहण प्रस्ताव ,प्रधानमंत्री जल जीवन योजनांची कामे संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आमदार शिंदे यांनी प्रमुख अधिकाऱ्यांना दिले,या आढावा बैठकीस उपस्थित काही कामचुकार अधिकाऱयांचा आमदार शिंदे यांनी खरपूस समाचार घेतल्याने कामचुकार अधिकाऱयांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे पहावयास मिळाले.