अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा आणि विचाराचा प्रचार आणि प्रसार करणारे प्रशासनातील सनदी अधिकारी : सुनील जी वारे..


मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं काही देणं लागते या भावनेने महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेत काम करत महाराष्ट्राची आणि देशाची सेवा निष्ठापूर्वक करणारे तसेच सामाजिक बांधिलकी मानून समाजासाठी आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्या माणसांसाठी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी मन लावून काम करणारे प्रशासन सेवेतील एक सनदी अधिकारी सुनील वारे यांचे नाव आज महाराष्ट्रात परिचित आहे.
सुनील जी वारे यांचा जन्म ०१ जून १९७० चाली सांगली जिल्ह्यातील बिळाशी या गावी झाला असून घरात शिक्षणाची गोडी असल्यामुळे लहानपणापासूनच अभ्यास, वाचन आणि चिंतन यातूनच ते प्रगल्भ होत गेले.आणि त्यांनी सन 1999 साली भारतीय लोकसेवा आयोग यू.पी.एस.सी. मधून ते आय.आर.एस. या पदावर त्यांची निवड झाली आणि ते आजतागायत देशाच्या आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी तसेच समाजाच्या उत्थानासाठी आणि उद्धारासाठी मला काही देणे लागतो या भावनेने ते अविरत परिश्रमित आहेत.
सुनील जी वारे यांचा ज्या गावात जन्म झाला ते बिळाशी हे गाव इतिहासात प्रसिद्ध असून १०३० साली जंगल सत्याग्रह झाला त्यावेळी बिळाशी हे गाव मुख्य ठाणे म्हणून प्रसिद्ध होते.तसेच पत्री सरकारमध्ये ही बिळाशी हे गाव मुख्य ठाणे म्हणून इतिहासात नोंद असल्याचे ते सांगतात. आणि या गावाने जवळ जवळ शंभरच्यावर स्वातंत्र्यसैनिक या स्वातंत्र्य संग्रामासाठी दिले असून देशाभिमान आणि राष्ट्रप्रेम असणाऱ्या या ऐतिहासिक गावात माझा जन्म झाला हे ते अभिमानाने सांगतात.
सुनील जी वारे यांनी जरी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर फार मोठे लेखन किंवा संशोधन जरी केले नसले तरी ते अण्णा भाऊ साठे यांच्या नात्यातील असून सुनील वारे यांच्या सासूबाई आणि अण्णाभाऊंचे नाते संबंध असल्याचे ते सांगतात.. मी अण्णाभाऊंची” फकीरा” ही कादंबरी लहानपणी अनेकदा वाचली असून घरात वडील ह भ प श्री बाबुराव विठ्ठल वारे हे कीर्तनकार असल्यामुळे सहाजिकच लहानपणापासून सभाधीटपणा अंगी होता त्यामुळे शालेय जीवनात असताना आपल्या गावात लोकांच्या समोर समोर” फकीरा” या कादंबरीचे वाचन करायचो आणि फकिराच्या कर्तृत्वाविषयी ची माहिती मी गावकऱ्यांना सांगत असे ,असे ते सांगतात.”फकीरा” भेडसगावचा खजिना लुटायचा जाताना आमच्या बिळाशी या गावी आले होते असे माझे चुलते आम्हाला सांगायचे असे तेही या निमित्ताने सांगतात.
सुनील जी वारे यांचे बालपण त्यांचे मुळ गावे बिळाशी आणि मुंबईतील माटुंगा येथे गेले त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हणजे पहिली पर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत करून नंतर त्यांचे चुलते श्री जगन्नाथ वारे मुंबईला रेल्वे खात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांनी दुसरी ते चौथीपर्यंत शिक्षण माटुंगा येथील महापालिकेच्या शाळेत पूर्ण करून पुढे पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण त्यांचे मुळ गावी बिळाशी येथील वारणा प्रसाद विद्यालयातून पूर्ण केले. श्री आर वाय माळी सर यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले.

पुढे त्यांनी अकरावी आणि बारावीचे शिक्षण वारणानगर येथील वारणा महाविद्यालयात पूर्ण करून पुढे त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्षे त्यांनी पोलाद उद्योग समूहात ही नोकरी केली असून पोलाद समूहात नोकरी करत असतानाच ते स्पर्धा परीक्षा कडे वळले आणि ते १९९ साली त्यांनी लोकसेवा आयोगाची अत्यंत महत्त्वाची परीक्षा यु. पी.एस.सी. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन रेल्वे प्रशासनात त्यांची निवड झाली…
सुनील जी वारे हे प्रशासकीय सेवेतील सनदी अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी मसूरी आणि बडोदा येथील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना सुरुवातीला भारतीय रेल्वे मध्ये आसाम राज्यात. सहायक वित्त सल्लागार गुवाहाटी आसाम. या पदावर त्यांची नियुक्ती झाली. पुढे त्यांनी आसाम, बिहार पुन्हा आसाम आणि आता महाराष्ट्रात ते भारतीय रेल्वे सेवेत अत्यंत क्रियाशील आणि प्रतिभासंपन्न सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.सुनील वारे हे ३१ मे २०१२ साली महाराष्ट्र राज्यात बदलीने नियुक्त झाल्यानंतर त्यांनी आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेने ते सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चर्चा करून त्यांना एकत्र करून समाजाच्या उत्थानासाठी आपणास काही करता येईल का यासाठी समाजातील काही अधिकारी आणि कर्मचारी तसेच प्रतिभासंपन्न विद्यार्थी यांच्यासाठी आपण काहीतरी करावे यासाठी त्यांनी सुरुवातीला १४ एप्रिल २०१3 साली दादर येथील रेल्वे अधिकारी क्लब येथे पहिली बैठक घेऊन मुंबई येथील अधिकारी ,कर्मचारी यांचे सोबत सर्वप्रथम चर्चा विनिमय करण्याचे ठरविले आणि त्या पद्धतीने त्यांनी ते काम केले आहे….
पुढे त्यांनी दादर येथील रेल्वे अधिकारी क्लब मध्ये १६ जून २०१३ रोजी एम.पी.एस.सी. आणि यू.पी.एस.सी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.
सप्टेंबर 2013 मध्ये पदमश्री मिलिंद कांबळे साहेब यांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. पुढे नोव्हेंबर २०१३ पनवेल येथे सुनील वारे यांच्यासह मातंग समाजातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिळून लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. श्री सुदाम धूपे साहेब यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. याच कार्यक्रमात मातंग समाजातील पहिले आय.ए.एस. अधिकारी माननीय श्री देवणीकर साहेबा यांचा सत्कारही करण्यात आला होता.
१२ जानेवारी २०१४ साली खोपोली येथे मातंग समाज अधिकारी-कर्मचारी चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री सुदाम धूपे साहेब यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. या शिबिरात मातंग समाज अधिकारी कर्मचाऱ्यांचे एक मजबूत संघटन असावे असा सूर निघाला आणि त्यातूनच एम.जी.डी.(MGD) मातंग ग्रुप डेव्हलपमेंट या नावाचे संघटन निर्माण करून समाजासाठी आपणास काही करता येईल का याविषयी चर्चा करून MGD नावाचे संघटन महाराष्ट्रात यापुढे समाजासाठी काम करण्याचे ठरले. डॉ शशिकांत लोखंडे सर संचालक यशदा पुणे यांनी MGD या नावाची निवड ठरवली….
सुनील जी वारे हे प्रतिभासंपन्न सनदी अधिकारी असून ते समाजाच्या अनेक प्रश्नासाठी शासन दरबारी सुद्धा आग्रही असून माजाचे प्रश्‍न निकाली निघावेत यासाठी शासनाकडे आपली भूमिका खंबीरपणे मांडून समाजाच्या प्रश्‍नांसाठी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रयत्न करणारे एक क्रियाशील अधिकारी म्हणूनही त्यांच्याकडे पाहता येते. हे बांधिलकीचं काम करत असताना त्यांच्या सौभाग्यवती आरती वारे मॅडम यांचे मोठे पाठबळ असून मी घर सांभाळते तुम्ही समाजासाठी काम करावं ही त्यांची आत्मबळाची पाठीवरची थाप सुनीलजी वारे यांना अधिक काम करायला ताकद देते.आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समाजासाठीच्या अनेक उपक्रमांस उस्फूर्त प्रतिसाद देणा-या सौ.आरती वारे मॅडम ह्या सुद्धा निश्चितपणे कौतुकास पात्र आहेत..
पुढे 24 जानेवारी २०१४ साली जालिंदर कांबळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे कल्याण मुंबई येथील आयोजनही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री रामकीशन तायडे सर आणि इतर अधिकारी यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.
मे २०१४ साली माननीय आनंदराव सूर्यवंशी यांच्या लोणंद सातारा याठिकाणी समाजाच्या काही निवडक अधिकारी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे विचार मंथन शिबीर आयोजित केले होते आणि त्या दोन दिवसाचे शिबिरांमध्ये समाजाच्या प्रश्नांवर आणि समाजाच्या हितासाठी काही करता येईल का या विषयीचे चिंतन या दोन विशेष शिबिरातून करण्यात आले होते.पुढे १८ जानेवारी २०१५ रोजी माननीय अमितजी गोरखे यांच्या नोवेल इन्स्टिट्यूटमध्ये डॉ योगेश साठे सर यांच्या नेतृत्वात इंजिनिअर परिषदेचे योजन करण्यात आले होते. आणि जून २०१५ एमजीडी मिशनच्या माध्यमातून वकील आणि न्यायाधीश परिषदेचे आयोजन ऍड श्री राम चव्हाण सर यांच्या नेतृत्वात झाले होते.
माननीय सुनील जी वारे यांच्या मार्गदर्शना खाली आणि त्यांच्यासोबतच्या सर्व सन्माननीय अधिकारी-कर्मचार्‍यांच्या संगनमताने या अनेक उपक्रमांची सुरुवात त्या त्या ठिकाणी होत गेली आहे.
एम.जी.डी.च्या वतीने लोणंद येथे नोव्हेंबर २०१५ रोजी शिक्षक-प्राध्यापक अधिकारी कर्मचारी यांचे दोन दिवशीय चिंतन शिबीर येथे संपन्न झाले. या लोणंद येथील चिंतन शिबिरामध्ये शिक्षकांची आणि प्राध्यापकांची समाजाप्रती कोणती बांधिलकी असावी याविषयीचे सखोल चिंतन होऊन समाजातील सगळ्यात गरीब घटकापर्यंत ,उपेक्षित असणाऱ्या आपल्या समाज बांधवांपर्यंत कोणत्या पद्धतीने जाता येईल ह्याचा विचार या चिंतन शिबिरामध्ये करण्यात आला होता……
श्री अविनाश कंबिकर सर यांनी मुक्ताई विद्यादान उपक्रम समाजात शिक्षण प्रसारासाठी मांडला.
एम.जी.डी. मातंग ग्रुप डेव्हलपमेंट च्या वतीने २७-२८ मे २०१६ रोजी पुणे येथील काने फाटा येथे एम.जी.डी. चे दोन दिवशीय चिंतन शिबीर झाले. डॉक्टर बाबासाहेब यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने कान्हे फाटा पुणे येथे एमजीडी मधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय चिंतन शिबिर संपन्न झाले. त्या शिबिरामध्ये मातंग समाजातील समस्या आणि समाजाचे वेगवेगळे प्रश्न आणि ते सोडवण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजना यासाठी सखोल असे चिंतन करून ते सोडविण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न या विषयी चर्चा करण्यात आली. याच कार्यक्रमांमध्ये मातंग समाजातील स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या काही मान्यवर अधिकारी कर्मचाऱ्यांचाही गौरव करून समाजाच्या प्रश्‍नासाठी आपण सगळ्यांनी आग्रही राहिले पाहिजे ही भूमिका घेऊन काम करण्याचे ठरले. पुढे २०१६ रोजी ठाणे येथील रेल्वे अधिकारी क्लब मध्ये सांगली येथील वसतिगृहाचे उद्घाटन आणि ठाणे येथील एमजीडी ग्रंथालयाचे उद्घाटन यावेळी संपन्न करण्यात आले. सांगली येथे एमजीडी वसतिगृहासाठी श्री संभाजी विठ्ठल वारे वरिष्ठ अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी स्वतःचे घर दिले आहे .एमजीडी परिवाराच्या वतीने २०१८ साली नाशिक येथील ओझर येथे श्री आनंद साळवे साहेबांच्या नेतृत्वाखाली चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले…
सुनील जी वारे हे अण्णा भाऊ यांच्या साहित्याच्या संदर्भामध्ये आणि अण्णाभाऊंचे विचार भारत आणि भारताच्या बाहेर घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये मोठे आग्रही असून त्यांनी आपल्या काही अधिकाऱ्यांसोबत अनेक वर्ष रशियन दूतावासासोबत चर्चा करून त्यांनी ०४ ऑक्टोबर २०१७ रोजी रशियन दूतावासात अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर ची एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करून अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर वेगवेगळ्या अंगानी आंतरराष्ट्रीय परिषदेत चर्चा करण्यात आली. या परिषदेमध्ये भारत आणि भारताच्या बाहेरील मान्यवरांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर शोध निबंधाचे वाचन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेले सर्व मान्यवर सुटबूटात होते.ही आंतरराष्ट्रीय परिषद अत्यंत सूत्रबद्धपणे डॉ. बी.एन.गायकवाड आणि सुनील वारे यांनी हाताळून यशस्वीपणे पूर्ण केली आहे.ही बाब समाजाच्या दृष्टीने गौरवाची आणि अभिमानाची आहे.
२०१८ शिर्डी येथील दोन दिवसीय चिंतन शिबिरात मातंग समाजाच्या अनेक प्रश्न संबंधांमध्ये आणि अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रश्नांच्या बाबतीत विचार-विनिमय करून ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी चिंतन करण्यात आले.
श्री संजय शिर्डीकर सर श्री भारत पवार सर श्री नितिन दिनकर सर यांचे याबाबत योगदान होते.
एमजीडी परिवाराच्यावतीने आतापर्यंत अण्णा भाऊ साठे यांचे पाच अर्धा कृती पुतळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बसविण्यासाठी सुनील वारे हे आग्रही राहीले आहेत. श्री अरविंद मंगल सर आर्ट प्राध्यापक शांतिनिकेतन बंगाल यांनी आपली कला समाजासाठी उपलब्ध केली. त्यासाठी आवश्यक मदत मार्गदर्शन श्री सुनील वारे यांनी दिले.
१३ जानेवारी २०१८ रोजी वाशी येथील शेरेटोन या पंचतारांकित हॉटेलमध्ये एमजीडी च्या वतीने उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आणि या परिषदेमध्ये मातंग समाजामध्ये उद्योजक अशा पद्धतीचे तयार होतील आणि कोणते उद्योग सुरू करता येतील याविषयीचे चिंतन या परिषदेमध्ये करण्यात आले.
अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या साहित्यावर रशिया या देशात राष्ट्रीयस्तरावर चर्चा व्हावी यासाठी ते आग्रही होते. ते कामालाही लागले.त्यांनी १३ फेब्रुवारी २०१८रोजी रशिया तयारीसाठी चेन्नई येथे इंडो रशियन चेंबर्स ऑफ कॉमर्स इन्स्टिट्यूट यांचे सोबत श्री आनंद कांबळे सर, श्री क्रांतीचंद्र भावे सर आशा काही मान्यवर मंडळी सोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बरोबरच त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड ,औरंगाबाद, पुणे ,अहमदनगर, सांगली ,कोल्हापूर ,सातारा ,कराड, हैदराबाद, बेंगलोर, तेलंगणातील विजयवाडा येथेही ही रशियाच्या पूर्वतयारी संदर्भात बैठका घेऊन जास्तीत जास्त अधिकारी-कर्मचारी रशिया येथील राष्ट्रीय परिषदेसाठी कसे उपस्थित होतील या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली.वरील सर्व ठिकाणी स्वतः सुनील वारे आणि इतर काही अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन रशियाच्या पूर्वतयारीसाठी ची बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.
सुनील जी वारे हे रशिया येथील संपन्न होणार असलेल्या परिषदेच्या पूर्व तयारी संदर्भात नांदेडला आले होते. नांदेड येथील बैठक आटोपून मी त्यांना सोडविण्यासाठी लातूर रोड पर्यंत सोबत होतो.बैठक उशीरापर्यंत चालल्यामुळे पोहचायला थोडा वेळ झाला होता. आम्ही लातूर रोड ला पोहचण्या अगोदरच गाडी दोन नंबर वर स्टेशनवर येऊन थांबली होती. आम्ही एक नंबर वर होतो.गाडी पकडण्यासाठी सुनीलजी वारे यांनी केलेली धडपड मी जवळून पाहिलो पाहिलो आहे. २७ व २८ मे २०१८ रोजी शिर्डी येथे मातंग समाज अधिकारी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय शिबीर आयोजित करून या शिबिराच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांच्या संदर्भामध्ये हे चर्चा विनिमय करण्यात आला होता….
रशिया मॉस्को येथे दि.१६ आणि १७ सप्टेंबर २०१९ रोजी मास्को शहरात संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावरील परिषदेसाठी अविरत आणि परिश्रमपूर्वक परिश्रमित राहणारे सुनीलजी वारे यांनी ही परिषद यशस्वी करण्यासाठी रात्रीचा दिवस करून अवघ्या महाराष्ट्राला संबोधित करत राहून या परिषदेसाठी अहोरात्र महाराष्ट्रभर फिरताना दिसले आहेत. ही बाब महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी जवळून अनुभवलेली आहे.अण्णा भाऊ साठे ज्या पंचतारांकित “सोव्हियत स्काय” नावाच्या हॉटेलमध्ये थांबले होते. त्या हॉटेल मध्ये अण्णा भाऊ साठे यांची प्रतिमा भेट देऊन ती प्रतिमा हाॅटेल मध्ये लावण्यात यावी त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय असेच राहिले आहेत. ही अण्णाभाऊंची प्रतिमा तयार करण्याची जबाबदारी सुनील जी वारे यांनी माझ्यावर सोपविली होती.व ती मी समर्थपणे पेललीही,औरंगाबाद येथे तयार केलेली ही प्रतिमा आम्ही नांदेडकरांनी औरंगाबाद पासून रशिया मास्को पर्यंतचा प्रवास अगदी जिवापाड जतन करत आणि जपत ती प्रतिमा आम्ही “सोव्हियत स्काय” हॉटेलमध्ये पोहोचती केली.आणि सोव्हियत स्काय हॉटेलच्या प्रशासनाने ती प्रतिमा घेऊन शानदार समारंभात त्या प्रतिमेचे विमोचन केले .ही अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब मला अण्णाभाऊंविषयीची बांधीलकी आणि अण्णाभाऊंचे खरे वारसदार म्हणून सुनील वारे हे मला खुप मोठे वाटतात..
सुनील जी वारे यांनी गेली अनेक वर्ष अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि अण्णाभाऊंचा विचार महाराष्ट्रासह भारत आणि भारताच्या बाहेर कसा घेऊन जाता येईल याचा रात्रंदिवस विचार करणारे एक प्रशासकीय सेवेतील एक क्रियाशील सनदी कार्यकर्ते अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहता येते.प्रशासकीय सेवेतील एक सनदी अधिकारी म्हणून काम करत असताना महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या सतत संपर्कात राहून महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात काय चालू आहे, कोणत्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कोण कोण काम करते आणि आणि स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी आपणास काय करता येईल येईल या संदर्भामध्ये सतत प्रयत्न करणारे महाराष्ट्रातील सगळ्यांसोबत सतत संपर्कात असणारे एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणारे अधिकारी म्हणून सुनील जी वारे यांचीही ओळख आहे. रेल्वे विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील मातंग समाजातील तरुणांनी स्पर्धा परीक्षा द्यावी याच्यासाठी आवाहन केले होते. जे विद्यार्थी परीक्षेला बसतील त्यांच्यासाठी एमजीडी आणि वैयक्तिक पातळीवर अनेक जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेतील मुलांना मोफत पुस्तके वाटप करण्याचे काम त्यांनी केले आहे. नांदेड येथील १५० विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर १५० विद्यार्थ्यांना रेल्वे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील पुस्तकांचे मोफत वाटप कार्यक्रम नांदेड येथे घेऊन आपली बांधिलकी शुद्ध केली होती. त्याचा मी साक्षीदार आहे.
सुनील जी वारे यांनी समाजातील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यात येणा-या विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी मार्गदर्शन केले असून त्यांनी काही पुस्तकाची निर्मिती केली आहे. “आपणच स्पर्धा जिंकत आहोत” हे अत्यंत महत्वाचे पुस्तक महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असून स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या मुलांच्या दृष्टीने हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे.
सुनील जी वारे यांना केंद्र सरकारच्या वतीने आणि महाराष्ट्रातील अनेक संघटना आणि संस्थांच्या वतीने अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे.. त्यात भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा “जनरल मॅनेजर अवार्ड” २००९ आणि २०१४ साली दोन वेळा हा पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.तसेच दलित महासंघाचा “समाज भूषण पुरस्कार”,आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे समाज प्रबोधन मंच आणि एमजीडी परिवार नागपूरचा “समाज भूषण पुरस्कार” आणि नांदेड येथील दलित मित्र घोडजकर समाज भूषण पुरस्काराने अकरा हजार रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. सुनीलजी वारे यांनी पुरस्कारासाठी मिळालेले अकरा हजार रुपये त्यांनी त्याच वेळी मातंग समाजातील स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात यावेत म्हणून एमजीडी चे कार्यकर्ते कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांच्याकडे सुपूर्त केले होते. ही सगळ्यात मोठी बांधिलकीची भावना मी जवळून पाहिली होती. ….
प्रशासकीय सेवेत सनदी अधिकारी म्हणून त्यांचे काम उत्कृष्ट असून त्यांची अण्णा भाऊ साठे आणि समाजाविषयची बांधिलकी निश्चितच प्रेरणादायी…सलाम तुमच्या त्यागाला आणि धडपडीला …..
आणि
आपणास वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा आणि शुभकामना…
*** शुभेच्छुक ***


शिवा कांबळे, नांदेड
( राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक )
तथा
( सदस्य: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *