हल्ली पावसाळ्यातील दिवस आरंभ झालेले आहेत.माझा शैतकरी राजा मृगपेरणीस तयार आहे.जो-तो शेतकरीराजा आपापल्या शेतात पेरणी करण्यास सज्ज आहे.
कृषीप्रधान देशातला एक महाराष्ट्रातील शेतकरी राजा छ.शाहूमहाराज, विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे,थोर समाज सुधारक म.ज्योतीवर फुले,नारीला शिक्षण खुले करणारी ज्ञानमाता सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या छायाचित्रास नतमस्तक होवून आपल्या धनलक्ष्मी तिफणीची पुजा-अर्चना करुन स्वतःच्या शेतातील पेरणीस आरंभ करतो आहे.माझ्या अनुभवात असा ऐतिहासिक पेरणीचा प्रसंग मला पहिल्यांदाच फोटोत पहाता आला.या कल्पक बुध्दीच्या खऱ्या शेतकरीराजास शत-शत नमन करुन माझ्या कंधारी आग्याबोंड सदरातून या बोलक्या क्रांतिकारक छायाचित्राने माझ्या प्रतिभेस पान्हा फोडून लेखनीस तयार केले.
भुतपुर्वी महापुरुषांनी विचारांची पेरणी चंदनासम झिजलेल्या महामानवांनी करुन मानवता धर्मास शिकवण दिली.याची आठवण या बहाद्दर शेतकरीराजास राहिली.म्हणून त्यांनी आपल्या शेतात धान्याची पेरणी करण्यापुर्वी महामानवांना साक्षीला ठेवून त्यांच्या विचाराचे पुजन व सोबत त्या शेतकरीराजास धनलक्ष्मी असलेली तिफणीची पुजा करुन एक आगळा-वेगळा इतिहास निर्माण केला.हे छायाचित्र मला माझ्या मोबाईलवर येताच माझ्या कल्पक कलाविष्कारातून इडीट केले.लागलीच माझ्या प्रतिभेच्या शैलीतून लागलीच या छायाचित्रास शब्दांनी बोलके केले.हे कंधारी आग्याबोंड साकारतांना मनाला नव चेतना मिळाली.
या शेतकरीराजाच्या कल्पकतेचे अनुकरण इतर शेतकरी राजे करतील अशी माझ्या मनाला आशा वाटते आहे.माझे शब्दबिंब, खंदारी वात्रटिका,कंधारी आग्याबोंड, विडंबन काव्य,कविता,दिनविशेष लेखन बोलके शल्य, आत्मकथन,ऐतिहासिक माहीती या लेखनातून सोशल मिडियावर दररोजचे सदर अखंडीत सुरु आहेत.कांहीतरी लेखन केल्या शिवाय मनाला समाधान मिळत नाही.माझे लेखन गोपाळसुत या टोपण नावाने दत्तात्रय एमेकर गुरुजी, क्रांतिभुवन बहाद्दरपुरा या नावाने प्रसिद्ध होत असते.
माझ्या फोटोपेक्षा लेखन शैली सुपरीचीत झाल्याने मनाला आनंद वाटतो आहे.
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार