२५ जुन १९७५ रोजी भारतात आणीबाणी लादल्याने,
तो काळाकुट्ट दिवस निषेधार्य….!
जागतिक स्तरावर सर्वात विशालकाय लोकशाहीच्या देशात तत्कालीन पंतप्रधान प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणी लावून काळ्या दिवसाची निर्मिती केली.या जाचक आणीबाणीचा देशात कडाडून विरोध झाला.मग मन्याड खोरे मागे कसे राहणार?तत्कालीन कंधारचे आमदार डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या नेतृत्वाखालील १३ आणीबाणीच्या विरोधी वीरांनी १३-१४ महिने नाशिकजेलमध्ये स्थानबध्द राहून शिक्षा भोगली.एवढेच काय आणीबाणीचा विरोध करतांना अनेक वीरांनी विरोध केला.सडके,गाढवे,गाई, म्हशी,कोंबडे,मुकबधीर आणीबाणी सत्याग्रहीरांनी सहभाग नोंदवून देशात ठळक कार्य केले.
जवळपास मन्याड खोर्यातील ४०\५० वीर सत्याग्रहींना केंद्र शासनाने आणीबाणीतील वीर सत्याग्रही म्हणून गौरव करतांना १०००० रु.दरमहा पेंशन मानधन आरंभ केले.पण विद्यमान राज्य शासनाकडून ते सुबुद्धीने बंद केले.दरवर्षीच क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथे डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली मशाल मिरवणुक काढून निषेध करण्यात येतो.कोरोना महासंकटात दोन वर्ष पासून रद्द करण्यात येत आहे.
डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांचे बरोबर भाई गुरुनाथराव कुरुडे,भाई पंढरीनाथ कुरुडे, दिवंगत भाई राजेश्ववरराव आंबटवाड,दिवंगत भाई केरबा पा.पेठकर, दिवंगत भाई रामराव पाटील.पेठकर,दिवंगत भाई बापुराव वाडीकर, दिवंगत भाई रोहिदासराव स्केलवर, भाई बाबुराव पुलकुंडवार, भाई संभाजीराव पाटील केंद्रे,दिवंगत भाई अनंदराव पासून.शिंदे दाताळेकर,दिवंगत भाई गंगाराम पा.जाणापुरीकर,
यांनी नाशिकच्या सेंट्रल जेल मध्ये स्थानबध्द होते.या सर्व आणीबाणी वीर सत्याग्रहींना मानाची कोटी कोटी जयक्रांति!
या आणीबाणीच्या काळाकुट्ट स्मृती दिनावर
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी, क्रांतिभुवन बहाद्दरपुरा यांनी शब्दबिंबातून आठवण ताजी
केली.