कंधार ; प्रतिनिधी
लातूर माध्यमिक व उच्च माध्यमिकचे उपसंचालक गणपतराव मोरे, शिक्षण निरीक्षक वंदना फुटाणे यांनी नुकसान नांदेड दौरा केला.त्या अनुषंगाने ते कंधार तालुक्यातील शेकापुर येथिल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेकापूर येथे भेट देवून वृक्षारोपण केले.व वृक्षारोपण केले त्यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य तथा दैनिक वतनवाला चे पत्रकार मंहमद सिंकदर यांनी भेट घेवून शैक्षणिक बाबीवर चर्चा केली.
कोरोनामुळे गेल्या दोन अडीच वर्षापासुन शिक्षण बंद आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परीणाम होत आहे या विषयानुरुप लातूर माध्यमिक व उच्च माध्यमिकचे उपसंचालक गणपतराव मोरे, शिक्षण निरीक्षक वंदना फुटाणे नांदेड दौऱ्यावर आले होते.दरम्यान प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेकापूर येथे भेट देवून वृक्षारोपण केले.व वृक्षारोपण केले.ही संधी साधुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य तथा दैनिक वतनवाला चे पत्रकार मंहमद सिंकदर यांनी भेट घेवून शैक्षणिक बाबीवर चर्चा करत लवकर शाळा व अभ्यास सुरु करण्यासाठी चर्चा केले.यावेळी माजी उपसभापती तथा ग्रामिण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संभाजी पाटील केंद्रे,सचिव तथा माजी सरपंच शिवाजी पाटील केंद्रे सह मान्यवरांची उपस्थिती होती.