लिंग निर्धारित रेत सेक्स साॅरटेड सीमेन नांदेड जिल्ह्यातील पशुपालकांसाठी नवीन तंत्रज्ञान

डॉ. आर. एम. पुरी पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 सोनखेड

लोहा प्रतिनिधी :- शैलेश ढेबंरे

गाई व म्हशी व्याल्यानंतर अधिक प्रमाणात कालवडी व्हावे,याकरिता लिंग निर्धारित रेत म्हणजेच सेक्स साॅरटेड सीमेन वापर अधिक फायदेशीर होऊ शकतो. भारतामध्ये विविध प्रकारच्या जातीच्या वळूचा साहिवाल, गीर, एचएफ, जर्सी, लाल कंधारी, मुरहा व जाफराबादी म्हशी इत्यादी लिंग निर्धारित रेत मात्रा उपलब्ध आहेत. सर्वच पशुपालक जास्त दूध उत्पादनासाठी गाई किंवा म्हशी पासून कालवडी किंवा पारडी जन्माची आशा करतात.

या सर्व बाबी लक्षात घेऊन मादी वासरांचा जन्म होण्यासाठी लिंग निर्धारित रेत याचा अत्यंत उपयोग होऊ शकतो. विज्ञानानुसार वळूंच्या वीर्यामध्ये एक्स आणि वाय या दोन प्रकारच्या विशिष्ट गुणसूत्र असणारे शुक्राणू असतात. आणि मादी मध्ये एक्स एक्स प्रकारचे गुणसूत्रांचे प्रमाण असते.

गर्भधारणा होताना वळूच्या विर्या मधील एक्स आणि मादी मधील एक्स गुणसूत्र सोबत संयोग होऊन त्यापासून कालवडी जन्मास येतात. एक्स व वाय गुणसूत्र नुसार नर वासरे जन्मास येतात. लिंग निर्धारित रेत मात्रा उत्पादनासाठी उच्च अनुवंशिक सिद्ध वळू पासून प्राप्त झालेल्या वीर्यातील एक्स,वाय गुणसूत्र असलेले शुक्राणू वेगळे केले जातात.


लिंग निर्धारित रेतनाचे फायदे


गायी व म्हशी मध्ये 90 टक्के इतके शुद्ध मादी वासरे जन्म घेऊ शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उच्च गुणवत्ता अनुवंशिकता आणि उत्पादन क्षमता असलेले कालवडी जन्मास येतात. यामुळे निश्चितच दूध उत्पादन वाढ होऊ शकते. तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रमाणात केल्यास गोठ्यात मादी वासरांचा जन्म होऊन दुधाळ कालवाडी गोठ्यामध्ये तयार होतील.

या सर्व तंत्रज्ञानाची माहिती व ओळख आपल्या भागातील पशुपालकांना समजावून सांगण्यासाठी श्रीकृष्ण गोशाळा पोखरभोसी येथे श्री कार्तिकेयन (IAS)नांदेड, डॉ. मधुसूदन रत्नपारखी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नांदेड, डॉ. भूपेंद्र बोधनकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नांदेड डाॅ.आर.एम.पुरी पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना सोनखेड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. व लिंग निर्धारित रेत जिल्ह्यात उपलब्ध झाल्यानंतर सर्व लोहा तालुक्यातील पशुपालकांनी या लिंग निर्धारित रेतनाद्वारे आपल्या गाई व म्हशी फलित करून घेण्यासाठी आव्हान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *