मन्याड खोऱ्यातील धन्वंतरी….. आत्मचरित्रकाराचे मनोगत – डॉ.माधव रणदिवे (M.B. B. S.)

आत्मचरित्र लिहिण्याचे स्वप्न अनेक वर्षे मनात बाळगले होते. ते आज पूर्ण होत आहे. याचा मला परमानंद वाटतो.

‘आत्ममित्रांच्या नजरेतून मी या प्रकरणांतर्गत माझ्या काही आप्त व मित्रांनी माझ्या संदर्भातील आठवणी, लेख पाठविले त्याबद्दल त्या सर्वांचे हार्दिक आभार ! अर्थात् आभार मानणे त्यांना आवडणार नाही.

‘मन्याड खोऱ्यातील धन्वंतरी’ म्हणजे माझ्या आयुष्यातील आठवणींचा खजिनाच आहे.

माझे आत्मचरित्र लिहिण्यास माझी प्रेमळ पत्नी चंदा व माझा मुलगा डॉक्टर स्वप्नील यांनी मला प्रवृत्त केले. कंधारला स्वप्नीलने प्रॅक्टीस सुरू केल्यानंतर तो मला नेहमी म्हणायचा – ‘बाबा, तुमचे आत्मचरित्र लिहा. सर्व लोक आनंदाने वाचतील. कारण तुमचे लोहा – कंधारमधील कार्य खरोखरच अविस्मरणीय व स्फूर्तीदायक आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी आत्मचरित्र लिहावयाचे ठरवले. यामध्ये सिंहाचा वाटा माझी थोरली मेहुणी मराठीच्या प्राध्यपिका, निवृत्त प्राचार्या आशा शिंदे यांचा आहे. त्या इंग्रजीचे प्राध्यापक व कंधारच्या शिवाजी कॉलेजचे कर्तव्यदक्ष माजी प्रिन्सीपल शांताराम शिंदे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी माझ्या या आत्मचरित्राचे शब्दांकन करण्याचे ठरवले व ते मनापासून पूर्णत्वाला नेले.

माझ्या तिन्ही मुलींना, जावयांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना जेव्हा समजले की मी आत्मचरित्र लिहावयास सुरूवात केली आहे, तेव्हा त्यांनाही मनस्वी आनंद झाला. ताबडतोब त्यांनी स्वखुशीने लेख पाठविले. त्या सर्वांनी मला प्रोत्साहित केले. त्यांचे आभार शब्दांपलीकडले आहेत. चित्रकार, प्रकाशक, मुद्रणालय या सर्वांना धन्यवाद !


मन्याड खोऱ्यातील धन्वंतरी…..

• आत्मकथन : डॉ. माधव रणदिवे (M.B. B. S.)
मो. : ९१६८१९१८११

शब्दांकन ;-

प्राचार्या आशा शिंदे (B. Sc. BEd. B. A., M.A. Jr. H. S. S.)

मो. : ९८६०३५०८७८

• प्रकाशक •

महाजन पब्लिशिंग हाऊस

बादशाही लेन, टिळक स्मारक मंदिरामागे, पुणे ३०. फोन नं. : (०२०) २४३३३६६६ मो. : ९८२२९७७७२६

© सुरक्षित •

डॉ. स्वप्नील रणदिवे (M.B.B.S.D.G.O)

रणदिवे हॉस्पीटल, कंधार

• प्रथम आवृत्ती

१ एप्रिल २०१८

अक्षरजुळवणी

रचना टाईपसेटर्स, पुणे -३०.

• चित्रकार • अनिल पवार, बार्शी

•मुद्रक • एस् प्रिंटर्स, धायरी, पुणे.

किंमत : ₹४३०/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *