दुर्धर आजारा सह जगणार्‍या रुग्णांना कृपाछत्र उपक्रमांतर्गत छत्र्यांचे गरजूंना वाटप

नांदेड ; प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड एआरटी विभागात दुर्धर आजारा सह जगणार्‍या रुग्णांना लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल व भाजप महानगर यांच्यामार्फत धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी सुरू केलेल्या ,कृपाछत्र या उपक्रमांतर्गत छत्र्यांचे वाटप गरजूंना करण्यात आले.

याप्रसंगी विशेष निमंत्रक म्हणून वैद्यकीय महाविद्यालय औषध विभागाचे प्रमुख डॉ. भुरके सर यांची उपस्थिती होती. येणाऱ्या पावसाळा लक्षात घेऊन त्यापासून रुग्णांना आपला बचाव करून प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी या छत्र्या उपयोगी पडतील असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच कृपाछत्र हा उपक्रम समाज उपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की २०२१ छत्र्या वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला असून आणखी साडेअकराशे छत्र्या वाटप करण्यासाठी दानशूर नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमासाठी हरीभाई मेहता, निळू पाटील , रंगनाथ माणिकराव विष्णुपुरीकर,स्नेहलता जायस्वाल यांनी छत्र्या दिल्या आहेत. छत्र्या वितरण करण्यासाठी सुरेश शर्मा , डॉ.स्वाती जीवने डॉ. ज्योती कुलकर्णी व सर्व स्टाफ उपस्थित होता.


कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विहान प्रकल्प समन्वयक कल्पना कोकरे, दिनेश ठाकूर, संतोष शिंदे, आकाश पोले,पल्लवी हनुमंते यांनी परिश्रम घेतले. कृपाछत्र उपक्रमाची भूमिका व आभार विहान प्रकल्प संचालक ऋषिकेश कोंडेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *