आकुर्डी येथील डी. वाय.पाटील महाविद्यालयात रोबोटिक्स व ऑटोमेशन हा नवीन अभ्यासक्रम सुरू , विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा प्रचार्यांचे आवाहन.

..

फुलवळ बातमीदार ( धोंडीबा बोरगावे )

शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुणे येथील आकुर्डी च्या डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात यावर्षी नव्यानेच रोबोटिक्स व ऑटोमेशन हे दोन नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू झाले आहेत . तेंव्हा त्या त्या भागातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे येथील प्राचार्य डॉ. विजय एम. वाढई यांनी आवाहन केले आहे.


अखिल भारतीय तंत्रशिक्षण प्रशिक्षण परिषद (नवी दिल्ली ) यांची यावर्षी सदर महाविद्यालयाला रोबोटिक्स आणि ऑटोमेशन या दोन नवीन पदवी अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. हा अभ्यासक्रम उपलब्ध करुन देणारे पिंपरी-चिंचवड परिसरातील डी वाय पाटील हे एकमेव महाविद्यालय ठरले आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय एम. वाढई यांनी दिली.


पुढे बोलताना प्राचार्य वाढई म्हणाले रोबोटिक्स आणि ऑटोमेशन हे नाव आजकाल सर्व क्षेत्रात विशेषतः औद्योगिक क्षेत्रात वारंवार वापरले जाते आणि त्याच्या उपयोग सर्वदूर आहे. रोबोटिक्स चा इंडस्ट्री ४.० च्या जगात वाढता वापर लक्षात घेता हा अभ्यासक्रम शिक्षण क्षेत्रात , इंडस्ट्री च्या गरजेप्रमाणे आमूलाग्र बदल घडवणारा आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न असणारा हा अभ्यासक्रम चार वर्षाचा असून प्रवेश क्षमता केवळ ६० आहे

काळानुसार उपयुक्त असणाऱ्या या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन स्वतःचे भविष्य घडवावे असे आवाहन सदर संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. नीरज व्यवहारे आणि डॉ. किशोर टी. जाधव यांनी केले आहे. या अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या सर्व मूलभूत सुविधा येथे उपलब्ध आहेत. तसेच सर्व प्राध्यापक अनुभवी आहेत , अशी माहिती विभाग प्रमुख डॉ. नितीन के. कांबळे यांनी दिली आहे.

या अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील , उपाध्यक्ष व राज्यमंत्री सतेज डी. पाटील आणि डी वाय प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले . तर कुलसचिव प्रशांत एन. भालेराव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *